नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

सोळा हजारांत देखणी – प्रियांका शेट्टी

प्रियांका शेट्टी… लावणीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही या लोककलेत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय… नृत्यसमशेर माया जाधव यांच्या तालमीत तयार होऊन गेली तीन दशकं याच कलेचा ध्यास घेत ही कला जीवापाड जपत, त्यावर प्रेम करत आणि ती जगावी यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करणारी कलावती म्हणजे प्रियांका शेट्टी. […]

‘भाजप’चे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे

कुशाभाऊ ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे ४ थे अध्यक्ष तसंच या पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी १९९८ ते २००० या कालावधीत पक्षाचे अध्यक्षपद भूषविले. कुशाभाऊ ठाकरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी १९४२ पासून निगडित होते. […]

अपनेपे भरोसा है तो ये दाँव लगा ले

१९४७ साली फाळणी झाली आणि एकसंध असलेल्या हिंदुस्तानाची शकलं झाली.त्यामुळे कित्येक लोक कायमचे पाकिस्तानात गेले व आपलं भाग्य थोर म्हणून सध्या पाकिस्तानात असलेल्या ठिकाणी जन्म घेऊन पण कित्येक कलाकार भारतात येऊन स्थाईक झाले.अशाच एका कलाकाराची ही हकीगत….. […]

Photogenic – नम्रता गायकवाड

मधाळ हसणारी, गालावर गोड खळी असलेली, बोलक्या डोळ्यांची, सुरेख केसांची वळण लाभलेली, तरतरीत नाकाची अन् कलावतीला शोभेल अशीच उंची लाभलेली नम्रता गायकवाडची लोभस व्यक्तिरेखा सर्वांच्या डोळ्यात भरेल अशीच आहे. एखाद्या प्रकल्पावर काम करत असताना त्या प्रकल्पाची गरज ओळखून त्याला साजेसा ठरेल असा चेहरा छायाचित्रकाराला निवडायचा असतो. मात्र काही चेहरे असे असतात त्याला कोणताही मेकओव्हर केला तरीहि […]

ज्यांच्या बॉर्न फ्री पुस्तकावर चित्रपट निघाला अशा वन्यजीव लेखीका जॉय अॅडम्सन

ज्यांच्या बॉर्न फ्री पुस्तकावर चित्रपट निघाला अशा वन्यजीव लेखीका जॉय अॅडम्सन यांचा जन्म २० जानेवारी १९१० रोजी ऑस्ट्रियामध्ये रोजी झाला. जॉय अॅडम्सन या आपल्या एल्सा सिंहिणीवरच्या पुस्तकामुळे सर्व निसर्गप्रेमी आणि जंगलप्रेमी मंडळींमध्ये विशेष प्रसिद्ध असणारी लेखिका. जॉर्ज अॅडम्सन या वन्यरक्षकाशी लग्न करून त्या केनियामध्ये स्थायिक झाल्या. एकदा जॉर्ज अॅडम्सन यांनी स्वसंरक्षणार्थ मारलेल्या सिंहिणीचे तीन छावे त्यांना मिळाले. त्यातले दोन […]

सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी

सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी यांचा जन्म १९ जानेवारी १८९२ रोजी झाला. ‘सुधारक’ या पत्राचे संपादक वि. रा. जोशी हे त्यांचे वडील. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण. फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. (१९१३), एम्.ए. (१९१६) झाले. पाली भाषेचा विशेष व्यांसग. १९२० पासून बदोद्यात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य. प्रथम आठ वर्षे बडोदा कॉलेजात पाली, इंग्रजी आणि मराठी या भाषांचे प्राध्यापक. […]

नखशिल्पाचा जादुगार – अरविंद सुळे

नखाच्या सहाय्याने कागदावर कमीअधिक दाब देऊन आखीव-रेखीव असं नखशिल्प साकारणारा जादुई कलाकार. गेल्या तब्बल पाच दशकांहून अधिक काळ आपली ही नखशिल्प कला जिवापाड जपणारा सच्चा कलावंत. आपल्या कलेतून अनेक मनं जिंकणारे अन् जोडलेली मनं टिकवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले अरविंद सुळे म्हणजे नखशिल्प कलेतलं दादा नाव. […]

कंप्यूटरच्या “कोबोल” या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर

संगणकविज्ञान आत्मसात करून “प्रोग्रॅमिंग’मध्ये अजरामर योगदान देणाऱ्या ग्रेस मरे हॉपर या पहिल्या महिला शास्त्रज्ञ! आपल्या असामान्य बुद्धीवैभवाने त्या अमेरिकन नौदलातल्या पहिल्या “नेव्हल ऑफिसर’ ठरल्या. संगणकशास्त्र आणि नौदलातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी नावाजलेली ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ म्हणजे रिअर ऍडमिरल ग्रेस मरे हॉपर. संगणक प्रोग्रॅमिंगच्या भाषेची पहिली संकलक अशी ग्रेसची ओळख आहे. […]

संवेदनशील कवी कैफी आझमी

लहानपणापासूनच जो माणूस अलम दुनियेतील दु:खे संपवणा-यांच्या गटात सामील झाला, सर्वांच्या दु:खाला आपल्या गीतांमधून ज्याने शक्ती दिली आणि न्यायाच्या लढाईत ज्याची गाणी पुढच्या रांगेत असत, तो स्वत:चे दु:ख कधीही व्यक्त करीत नसे. कैफी फार मोठे कवी होते. आपल्या भावाची गझल पूर्ण करण्यासाठी त्यांनी १२ व्या वर्षी जी गझल लिहिली ती अमर झाली. नंतर तीच गझल बेगम अख्तर यांनी गायिली. ‘इतना तो जिंदगी में किसी की खलल पडे, हंसने से हो सुकून न रोने से कल पडे’. […]

विश्वासराव पेशवे

विश्वासराव पेशवे हे नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव. त्यांचा जन्म २ मार्च १७४२ रोजी झाला. नानासाहेब व गोपिकाबाई यांचा पुत्र विश्वासराव पेशवे हे सर्व पेशव्यांत फार सुंदर होते. हे लहानपणापासून राज्यकारभारांत पडला होता व युध्दाच्या मोहिमांवरहि जात असे. निजामावरील सिंदखेडच्या स्वारींत विश्वासराव यांना मुख्य सरदार करून दत्ताजी शिंद्यास याचा कारभारी नेमलें होतें. विश्वासराव व जनकोजी जवळ जवळ सारख्याच वयाचे असल्यानें त्यांच्यांत […]

1 204 205 206 207 208 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..