‘मधुमती’ची सगळीच गाणी परत परत, ऐकावीत अशी. ‘आजा रे परदेसी’, ‘सुहाना सफर’ आणि ‘दिल तडप तडप के..’ ‘घडी घडी मेरा दिल धडके’, रफी साहेबांचे दर्द-भरे ‘टूटे हुवे ख्वाबों ने’ आणि ‘दैया रे दैया रे चढ गयो पापी बिछुवा..’ स्वतःच्या चालीबद्दल काटेकोर असणारा संगीतकार म्हणजे सलील चौधरी. […]
अमूक एका चौकटीत बसणारा अभिनेता असं कुशलचं वर्णन करता येत नाही. कुशलचा अभिनय, त्याचं भाषेवरील प्रभुत्व, संवादांची फेक, अभिनयाची उंची हे सारं पाहता कुशल येणाऱया काळात छोटय़ा पडद्यापेक्षा रूपेरी पडदा चांगलाच गाजवेल, अशी खात्री मला वाटते. कलाकार चेहऱयापेक्षा त्याच्या अभिनयाने ओळखला जातो, ही जाण असलेले दिग्दर्शक पुढे आले की कुशलचा हात अभिनय क्षेत्रात कोणी धरणार नाही, हे नक्की! […]
ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे झाला. असरानी यांनी जवळपास पाच दशकापासून ते आजपर्यंत सिनेरसिकांना आपल्या विनोदी अभिनयाने खळखळून हासायला भाग पाडले आहे. असरानी हे सिंधी परिवारातील आहेत. त्यांचे वडील फाळणीनंतर जयपूर येथे स्थलांतरीत झाले. असरानी यांना चार बहिणी आणि तीन भाऊ होत. त्यांचे शिक्षण सेंट झेव्हिअर्स स्कूल आणि राजस्थान […]
बलवंत संगीत मंडळीतील प्रमुख स्त्रीपार्टी नट मास्टर अविनाश यांचा जन्म १ जानेवारी १९०९ रोजी मिरज येथे झाला. मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे शालेय शिक्षण मिरज येथेच इयत्ता पहिलीपर्यंत झाले. वडील लक्ष्मणरावांना संगीताची आवड होती. संगीताचे भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांकडे ते थोडीफार गायकी शिकले होते. गणपतरावांना २ भाऊ आणि ५ बहिणी. मोठा बळवंत हा बळवंतराव मराठे यांच्या ‘हिंदी नाटक […]
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, संगीत गुरू व आग्रा घराण्याचे गायक पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर यांचा जन्म १ जानेवारी १९०० रोजी झाला. त्यांचे वडील श्री नारायण गोविंद रातंजनकर हे ब्रिटिश राजवटीत पोलिस अधिकारी होते, तसेच उत्तम सतारवादकही होते. वयाच्या सातव्या वर्षी श्रीकृष्ण नारायण रातंजनकरांनी कारवारच्या पं. कृष्णम् भट्ट (कृष्णभट्ट होनावर) यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास प्रारंभ […]
महात्मा गांधींची भूमिका अजरामर करणारे अभिनेते सर बेन किंग्जले यांचा जन्म ३१ डिसेंबर १९४३ रोजी झाला. बेन किंग्जले हे मूळत: भारतीय वंशाचेच आहेत आणि त्याचं मूळ नाव कृष्णा भानजी. ते मूळचे गुजरातीच. त्याचे वडील गुजराती होते. किंग्जले यांच्या वडीलाचां जन्म केनियात झाला.त्यांचे आजोबा व्यापारी म्हणून जांजीबार स्थायिक झाले. किंग्सले यांचा जन्म जांजीबारचा ते वयाच्या १४ व्या […]
भावगीताची राणी असा वंदना विटणकर यांचा लौकिक होता. मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ’वंदना थिएटर्स’च्या त्या संचालिका होत्या. त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली रॉबिनहूड, टिमटिम टिंबू बमबम बगडम, बजरबट्टू इत्यादी बालनाट्ये गाजली. त्यांच्या रॉबिनहूड या नाटकातून शिवाजी साटम, विलास गुर्जर, मेधा जांबोटकर, विजय गोखले, विनय येडेकर अशा अनेक कलाकारांनी रंगभूमीवर पर्दापण केले. वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी […]
ब्रिटिश कथाकार, कवी आणि कादंबरीकार व मोगली व जंगलबुकचे लेखक जोसेफ रडयार्ड किपलिंग यांचा जन्म ३० डिसेंबर १८६५ रोजी मुंबई येथे झाला. जोसेफ रडयार्ड किपलिंग हे रडयार्ड किपलिंग या नावानेच प्रसिद्ध होते. जोसेफ रडयार्ड किपलिंग हे पाच वर्षांचा झाल्यावर त्याला आई-वडिलांनी इंग्लंडला शिकण्यासाठी नेलं होतं. पुढे ते वयाच्या १८व्या वर्षी पुन्हा भारतात परतले आणि त्यांनी पत्रकारिता केली. […]
मराठीतील प्रसिध्द शाहीर पिराजी रामजी सरनाईक यांचा जन्म २८ जुलै रोजी झाला. शाहीर तिलक, शाहीर विशारद आणि करवीर दरबारचे शाहीर व ‘लहरी हैदर गुरूजी माझे शीघ्र कवी थोर! त्यांच्या कृपेने शाहीर पिराजी पोवाडा लिहिणार!’असे म्हणणा-या पिराजी रामजी सरनाईक या शाहिराने आपल्या खडय़ा आवाजात अनेक चित्रपटांतून, नाटकांतून, वीररसाने ओथंबलेले पोवाडे म्हटले आणि पिचलेल्या मनगटातही जान आणली, छातीत स्फुरण आणले. कोल्हापुरात […]
हास्यकवी अशोक नायगावकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९४७ रोजी वाई येथे झाला. मोठाल्या मिशांचे कवी अशोक नायगावकर हे घरोघरी हास्याची कारंजी फुलवत असतात. अशोक नायगावकर यांचे लहानपण गरीबीमुळे कष्टात गेले. त्यांची आई जी कामे करत असत त्याला ते मदत करत. आईबरोबर पापड करणे, मसाले कुटणे अशी सर्व कामे अर्थार्जनासाठी केली. याचवेळी प्र. के. अत्रे, लोहिया, दादासाहेब जगताप […]