कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी झाला. माडखोलकर यांचे वडील त्र्यंबकराव मुंबईत भिक्षुकी करीत. त्यांच्या आई पार्वतीबाई या त्याकाळी शिक्षित असलेल्या स्त्रियांपैकी एक होत्या. आईने केलेल्या संस्कारामुळे लहानपणीच माडखोलकरांनी मराठी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांचे सर्व शिक्षण झाले होते. राष्ट्रसभेच्या अधिवेशना- पासून स्फूर्ती घेऊन […]
धीरूभाई हिराचंद अंबानींचा जन्म २८ डिसेंबर १९३३ रोजी झाला. धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी धीरुभाई हे गुजराती, भारतीय उद्योजक होते. धीरुभाई यांचे वडील हिराचंद हे एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. शिक्षण अर्धात सोडल्यानंतर धीरुभाई मुंबईत आले. उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर फळे विकण्याचे काम केले. दुकानांमध्ये काम केले. त्यानंतर ते यमन येथे गेले. तिथे त्यांना एका […]
उद्योग जगातला संत रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. टाटा.. भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटी आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभी, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढय़ांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटा संस्कृती! टाटांनी केलेली संपत्ती निर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम. सालंकृत, तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत, तशीच […]
डॉ. रामचंद्र शंकर उर्फ रा. शं. वाळिंबे हे थोर समीक्षक म्हणून ओळखले जातात. ते व्यासंगी विद्वान आणि आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणारे ख्यातनाम वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. […]
दूरदर्शनवरील ‘बंदिनी’, ‘दामिनी’ यासारख्या मालिकांतून अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या सोनाली खरेनं अल्पावधीतच मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमरगर्ल म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. या मालिकांमुळे सोनालीचा चेहरा महाराष्ट्रभर घराघरात पोहोचला. आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मालिकांनंतर थेट हिंदी रुपेरी पडद्यावरून सोनालीनं रसिकमनावर मोहिनी घातली. […]
हिंदी सिनेमांतील पहिली संगीतकार जोडी म्हणून ओळख असलेले हुस्नलाल-भगतराम पैकी हुस्नलाल यांचा जन्म १९१६ मध्ये जालंधर येथे झाला. हुस्नलाल व भगतराम हे दोघेही लाहोरच्या सुप्रसिद्ध संगीतकार पंडित अमरनाथ शर्मा यांचे धाकटे बंधू. हुस्नलाल उत्कृष्ट व्हायोलिन वादक होते. वयाच्या १७-१८ व्या वर्षीपासून त्यांनी लाहोर, अमृतसर, दिल्ली येथील बर्यानचशा मैफिली व्हायोलिनवर शास्त्रीय संगीत वाजवत गाजवल्या होत्या. त्या व्यतिरिक्त ते उत्तम […]
भारताचे अर्थमंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी नवी दिल्ली येथे झाला. अरुण जेटली हे भारतीय जनता पक्षाचा एक महत्त्वाचा नेता म्हणून ओळखले जातात. आधी पेशाने वकील, पण त्यानंतर पूर्ण वेळ राजकारणात उरतले. अरुण जेटली यांचे वडिल महाराज किशन जेटली हे प्रख्यात वकील होते. दिल्लीतील सेंट झेव्हियर्स शाळेतून त्यांनी […]
रवी जाधव… आजचा आघाडीचा चित्रपट दिग्दर्शक… पण त्याच्या जडणघडणीत भक्कम असलेला त्याच्या कलेचा पाया महत्त्वाचा ठरतो… ‘टाइमपास’, ‘बालक पालक’, ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ या मराठी सिनेमांनी केवळ राज्यातच नव्हे तर देश-परदेशातल्या सिनेरसिकांवर आपली भुरळ घालत कोटय़वधी रुपयांचा गल्ला जमवला.आपल्या दिग्दर्शनात सातत्य राखत विक्रमांचे अनेक थर रचून मराठी सिनेसृष्टीत नवी क्रांती घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून रवीकडे पाहिलं जातं. […]
मेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करतो त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश जिच्यात होतो ती विकृती म्हणजे कंपवात. हातांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे. १८१७ साली जेम्स पार्किन्सन याने प्रथम ही स्थिती लोकांच्या नजरेस आणून दिली. या आजाराला ‘पार्किन्सन रोग’ असे म्हणतात. या आजाराचा शोध लावणाऱ्या जेम्स पार्किन्सन याच्या नावाने हा आजार ओळखला जातो. […]
मराठी अभिनेत्री गिरिजा ओकचा जन्म २७ डिसेंबर १९८७ रोजी झाला. हिंदी-मराठी चित्रपट तसेच मराठी मालिका आणि नाटक यातून मोजक्याच पण उत्कृष्ट भूमिका सादर करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री गिरिजा ओक ही प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची कन्या. १५ वर्षाची असताना मोठ्या तिने पडद्यावर पदार्पण केले. मानिनी हा गिरिजा ओक यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. […]