नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु

काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचा जन्म ६ एप्रिल १९१७ रोजी झाला. कवी सुधांशु यांनी आध्यात्मिक (प्रामुख्याने दत्तविषयक) आणि मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. १९३७ पासून सुधांशु यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कविता किर्लोस्कर, स्त्री, मनोहर आदी मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कवितांचे पुढे पुस्तकरूपाने संग्रह झाले. मराठी कवी कुंजविहारी यांनी ह. न.जोशी यांना सुधांशु […]

निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री व्ही.शांताराम

निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री व्ही.शांताराम यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०१ रोजी कोल्हापूर येथे झाला. शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपट सृष्टीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं नाव. शांताराम बापू या नावानं ते ओळखले जात. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला खोल ठसा उमटवला. दिग्दर्शक म्हणून अनेक नवीन संकल्पना त्यांनी पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत वापरल्या. जवळजवळ […]

अण्णासाहेब किर्लोस्करांचे ‘संगीत सौभद्र’

आजच्या दिवशी सन १८८२ साली, अण्णासाहेब किर्लोस्करांचे ‘संगीत सौभद्र’ हे नाटक रंगभूमीवर आले होते. नाटककार अण्णासाहेब किलरेस्करांचं १८ नोव्हेंबर १८८२ साली रंगभूमीवर आलेलं ‘संगीत सौभद्र’ हे नाटक आज तब्बल १३५ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटूनही तितक्याच आवडीनं रसिक उचलून धरतात यातच या नाटकाची अभिजातता दडलेली आहे. कलावंतांच्या अनेक पिढय़ांनी आपल्या गान-अभिनयानं हे नाटक तोलून धरलं, त्यात आपले […]

जेष्ठ हार्मोनियमवादक पं.तुळशीदास बोरकर

बोरकर यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९३४ रोजी गोव्यातील बोरी येथे झाला. पं.तुळशीदास बोरकर उर्फ बोरकर गुरुजी संवादिनी वादन क्षेत्रातील ऋषितुल्य नाव. आज घडीला संवादिनी अर्थात पेटीवर प्रभुत्व असणारी जी काही मान्यवर मंडळी आहेत त्यातील हे अग्रगण्य नाव होते. प्रतिकूल परिस्थितीतून काम करत गुरुजींनी स्वताला घडवलं होते. त्यामागे त्यांचा रियाज तर होताच पण संवादिनी प्रतीचं प्रेम अधिक […]

बंदिशकार पं. बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर

पं. हळदणकर यांनी संगीतविषयक संशोधन आणि लेखनही केले होते. आग्रा घराण्याचे गायक आणि बंदिशकार म्हणून पंडित बबनराव हळदणकर यांची ओळख होती. यांचा जन्म २७ सप्टेंबर १९२७ रोजी झाला. हळदणकरानी ५० वर्षांहून अधिक काळ शास्त्रीय गायनाने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले. रस पिया हे त्यांचे टोपणनाव होते. ते नव्वदीच्या वयातही संगीताची साधना करत असत. हळदणकरांनी सुरुवातीला मोगूबाई कुर्डीकरांकडून जयपूर/अत्रौली घराण्याची तालीम घेतली. […]

जेष्ठ हार्मोनियमवादक पं.तुळशीदास बोरकर

जेष्ठ हार्मोनियमवादक पं.तुळशीदास बोरकर बोरकर यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९३४ रोजी गोव्यातील बोरी येथे झाला. पं.तुळशीदास बोरकर उर्फ बोरकर गुरुजी संवादिनी वादन क्षेत्रातील ऋषितुल्य नाव. आज घडीला संवादिनी अर्थात पेटीवर प्रभुत्व असणारी जी काही मान्यवर मंडळी आहेत त्यातील हे अग्रगण्य नाव होते. प्रतिकूल परिस्थितीतून काम करत गुरुजींनी स्वताला घडवलं होते. त्यामागे त्यांचा रियाज तर होताच पण संवादिनी […]

जेष्ठ अभिनेत्री खुर्शीद उर्फ मीना शौरी

जेष्ठ अभिनेत्री खुर्शीद उर्फ मीना शौरी यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९२१ रोजी झाला. सोहराब मोदी यांचा चित्रपट ‘सिकंदर’ मध्ये काम करुन मीना शौरी यांनी आपल्या करीयरची सुरवात केली. सोहराब मोदींनीच खुर्शीदचे मीना नामकरण केले. ‘सिकंदर’ नंतर मीना यांना शौरी यांनी ‘शालीमार’ व महबूब खान यांनी ‘हुमायूं’ मध्ये काम करण्याचा प्रस्ताव दिला. पण अचानक सोहराब मोदी यांनी मीना यांना एक […]

रत्नाकर मतकरी

रत्नाकर मतकरी यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. रत्नाकर मतकरी गेली अनेक वर्षे अविरत लेखन करणारे नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, बालनाटय़ चळवळीचे अध्वर्यु, साहित्यिक, स्तंभलेखक, चित्रकार, चित्रपट व मालिका लेखक, एकपात्री कथाकथनकार अशा विविधांगी भूमिका लीलया निभावणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. प्राथमिक शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये तर माध्यमिक शिक्षण राममोहन इंग्लिश स्कूल मध्ये झालं. १९५४ साली एस. एस. […]

मराठीतील लेखिका व समालोचक कुसुमावती देशपांडे

मराठीतील लेखिका व समालोचक कुसुमावती देशपांडे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९०४ रोजी झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रावबहादुर रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. प्राथमिक शिक्षण अमरावतीला व पुढचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. शिष्यवृत्तीसह त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या परीक्षेत त्यांना सुवर्णपदक मिळाले, आणि मध्य प्रांत-विदर्भ सरकारची (सी.पी. ॲन्ड बेरार सरकारची) विशेष शिष्यवृत्ती मिळवून त्या […]

साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार जेमिनी गणेशन

साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार जेमिनी गणेशन यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९२५ रोजी झाला. जेमिनी गणेशन यांची मुलगी अभिनेत्री रेखा.१९५७ साली त्यांनी ‘मिस मेरी’ या सिनेमाद्वारे बॉलिवूड डेब्यू केले होते. त्यांची या सिनेमात मीना कुमारीसोबत जोडी होती आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यांनी ‘देवता’, ‘राज तिलक’, ‘नजराना’ या सिनेमांमध्ये अभिनय केला. जेमिनी गणेशन यांचे २२ मार्च, २००५ साली निधन […]

1 222 223 224 225 226 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..