नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

लोकनायक….. राज ठाकरे !

सत्तेच्या राजकारणात निवडणूका या अत्यंत महत्वाच्या असल्या तरी जनमाणसांच्या मनात आपुलकीचं नातं निर्माण करणारा नेता हाच खरा लोकनायक समजला जातो. प्रत्येक राजकीय पक्षाला संघर्ष हा करावाच लागतो. निवडणुकीत जय – पराजय हा नित्याचाच आहे. उतार चढाव हा तर राजकारणाचा स्थायीभावच आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. आणि सध्या अशा संघर्षातून राज ठाकरे नावाचा योद्धा तावून सुलाखून बाहेर पडत आहेत. […]

टेबलटेनिस चॅम्पियन ममता प्रभू

वयाच्या आठव्या वर्षी सुरू झालेला टेबल टेनिसचा खेळ अगदी सहज सोपा करत कॉमन वेल्थ स्पर्धेत रौप्यपदक, साऊथ एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक, दहा वेळा महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिपचा विक्रम आणि अशा अनेक स्पर्धांत बाजी मारत ममता प्रभू या जिद्दी खेळाडूने टेबल टेनिसच्या खेळात आपला वेगळा दराराच निर्माण केला. तिच्या या खेळाचा सन्मान ‘शिवछत्रपती’ या मानाच्या पुरस्कार देऊन करण्यातदेखील आला. […]

लक्ष्मीकांत बेर्डे

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. कसदार अभिनय करणाऱ्या या अभिनेत्याकडे त्यांच्या अभिनयक्षमतेला वाव मिळू शकतील असे चित्रपट अपवादानेच मिळाले. वास्तविक अनेक गंभीर भूमिकांमधूनही त्यांनी आपली […]

सुशिक्षित सभ्य सज्जन अभिनेता – देवेन वर्मा

ह्या माणसाने आपल्या “अभिनेता” असल्याच्या स्टेटस चा बाऊ केला नाही. त्याने मला सुरवातीला फोन केला तेव्हा मी फिल्म अभिनेता “देवेन वर्मा” असे सांगितले नाही. माझ्यासाठी दोन दिवस थांबला.त्याच्या घरी गेल्यावर आक्रस्ताळेपणा नाही, आपण गाडीचे काम करून द्या ही आपली अपेक्षा मोकळेपणाने सांगितली. त्याशिवाय व्यवस्थित पाहुणचार आणि गप्पा. निरोप घेताना, निघताना ” फिर वापस कभी भी आना भाई” म्हणून निरोप दिला. […]

अभ्यासू दिग्दर्शक – विजू माने

विजू माने हे मराठी सिनेइंडस्ट्रीतलं जुनं-जाणतं नाव. एक अभ्यासू दिग्दर्शक म्हणून विजूची ओळख आहे. माझी आणि विजूची ओळख साधारणपणे बारा-पंधरा वर्षांपूर्वीची. विजूचा तेव्हा ‘डॉटर’ नावाचा सिनेमा येऊ घातला होता. एकदा वृत्तसंकलनाच्या निमित्ताने ही ओळख झाली आणि दिवसागणिक ती गुणोत्तराने वाढतच गेली. […]

टायरच्या रबरी ट्युबचा शोध शोध लावणारे स्कॉटिश संशोधक जॉन बॉईड डनलॉप

१८८८ मध्ये डनलॉप कंपनीने पोकळी रबरी धावा (न्युमॅटिक टायर्स) ची कल्पना अस्तित्वात आणली. त्यामुळे मोटारींना टायर ट्यूब बसविणे शक्य झाले. […]

चित्रपट सृष्टीतील एक अपूर्ण कहाणी

आज स्मिता जीवंत असती तर आम्ही तिच्या ६३ व्या जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या असत्या…. मेंदूत स्मृती नावाची गोष्ट शाबूत असे पर्यंत तरी स्मिता तुला नाही विसरू शकत आम्ही….कधीच नाही…….मन:पूर्वक अभिवादन […]

डॉ . मानसी आपटे : एक जिद्दी मुलगी

शालांत परिक्षेत मराठीत सर्वाधिक गुण मिळाल्यावर साहजिकच मानसीने कला विभागाकडे जाणे अपेक्षित होते. परंतु विज्ञानाची रंजकता अनुभवल्यामुळे तिने विज्ञान शाखेत केळकर कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिच्या विज्ञान संशोधकवृतीला खरा फुलोरा आला तो पदवीसाठी सूक्ष्मजीवशास्त्र हा विषय घेऊन राम नारायण रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर […]

त्वचा रोग तज्ञ डॉ. पल्लवी उत्तेकर – तेलवणे

सौंदर्यशास्त्रात ज्याला कांती म्हणून संबोधिले जाते त्यास शरीर शास्त्रात कातडी अथवा त्वचा म्हंटले जाते. मानवी शरीरातील कातडी हे सर्वात मोठे इंद्रिय आहे. त्वचेत जर दोष अथवा रोग निर्माण होऊन तिचे जर रंग रूप बदले तर त्या व्यक्तीचे जगणे काही वेळा कठीण होऊन जाते. शारिरीक दोषापेक्षा मानसिक आघात त्या व्यक्तीला खच्ची करून जाते . अशा वेळीस त्यास गरज असते ती मानवी संवेदनशीलतेची आणि सर्जनशिलतेची. अशी एक ठाण्यातील वैद्यकीय त्वचा तज्ञ आहे डॉ. पल्लवी उत्तेकर तेलवणे. […]

तारकांचे जन्मरहस्य संशोधिणारा : डॉ गुरुराज वागळे

आकाश दर्शनाचे संस्कार जर शालेय वयात झाले तर या कुतुहलाचे रुपांतर जिज्ञासात होऊ शकते. तसे झाले तर खगोल शास्त्राचा अभ्यास करण्याचा ध्यास त्या विद्यार्थांना शालेय वर्षातच लागतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सरस्वती सेकंडरी स्कूलचा माजी विद्यार्थी डॉ. गुरुराज वागळे. […]

1 226 227 228 229 230 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..