नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

महेश्वरची महाश्वेता… अहिल्याबाई होळकर

प्रत्येक मराठी मनात ‘माळव्या’ बद्दल एक वेगळीच जवळीक आणि हळवं आकर्षण आहे. इंदूर … धार … देवास … मांडू .. जीवनदात्री…गूढरम्य नर्मदा …. ही आकर्षणं तर मराठी मनात खूप आहेतंच पण अजून मोठं आकर्षण म्हणजे नर्मदेच्या तीरावरचं महेश्वर आणि अहिल्याबाई होळकर. […]

द रियल हिरो – हिमांशू रॉय

मुंबई हल्ल्यानंतर रॉय यांनी भारतावर वाकडी नजर ठेवणाऱ्यांच्या हातचे बाहुले बनलेल्या अनेक दहशतवाद्यांकडून अत्यंत महत्त्वाची माहिती काढून घेतली होती. पुन्हा असा हल्ला होणार नाही, यासाठी त्यांनी स्वत:च एक अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला होता. त्यामुळे ते खूपच आत्मविश्वासाने म्हणत होते की, मी मुंबईत असेपर्यंत आता कुणी मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. […]

००७ जेम्स बॉन्डला सर्वप्रथम पडद्यावर आणणारा….

तुम्हा सर्वानाच जेम्स बॉन्ड साकारणारे सर्वच अभिनेते माहित आहेत. मात्र “शॉन टेरेन्स यंग‘’ हे नाव कदाचित आठवणार नाही. यंग हा सुरूवातीच्या तिनही बॉन्डपटाचा दिग्दर्शक होता. डॉ. नो(१९६२), फ्राम रशिया विथ लव्ह (१९६३ ) आणि थडंर बॉल(१९६५) हे तिनही बॉन्डपट तुफान गाजले. […]

संगीतकार गुलाम मुस्तफा दुराणी उर्फ जी.एम. दुराणी

संगीतकार गुलाम मुस्तफा दुराणी उर्फ जी.एम. दुराणी हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक, अभिनेता व संगीतकार होते. त्यांचा जन्म १९१९रोजी झाला. सुधीर फडके यांचा पहिला चित्रपट हा हिंदीच होता आणि त्याचे नाव होते गोकुल. ज्याची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली होती. या चित्रपटातील जी. एम. दुराणी यांनी गायलेले ‘कहां हमारे श्याम चले’ हे अतिशय सुंदर गीत होते. मोहम्मद […]

लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर

सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. लावणीच्या इतिहासात आजही ठळकपणे समोर येणाऱ्या नावात सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी लावणीसाठी वा गायकीसाठी लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. वयाच्या १० व्या वर्षीच त्यांच्यातल्या संगीत कलेची जाणीव झाली. त्यांनी बालवयातच एकट्याचे लावणी सादरीकरण केले. त्यानंतरच्या काळात गोदावरीबाई पुणेकर यांच्या नेतृत्वाखालील लावणी गटात त्या […]

जेष्ठ हिंदी-मराठी अभिनेत्री लीला चिटणीस

लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्चशिक्षित, प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. त्यांचा प्रेम विवाह डॉ. चिटणीस ह्यांच्यांशी झाला होता. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता. लीला चिटणीस यांची रुपेरी पडद्यावरची कारकीर्द जशी […]

शायर जिगर मुरादाबादी

जिगर मुरादाबादी यांना उर्दू शायरी चे या विसाव्या शतकातील महान शायर म्हणून मानले जाते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १८९० रोजी मुरादाबाद येथे झाला. जिगर मुरादाबादी यांचे खरे नाव अली सिकन्दर. लखनौला जिगर मुरादाबादी कसेबसे मॅट्रिक उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे शिक्षण पूर्णही करू न शकणारे जिगर मुरादाबादी यांना अलिगढ विद्यापीठाने पुढे डी.लिट. पदवी दिली. जी पूर्वी फक्त […]

खतरों के खिलाडी अक्षय कुमार

अक्षय कुमार ह्याचे खरे नाव राजीव हरीओम भाटिया आहे. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९६७ रोजी झाला. अक्षयचा बॉलीवूडमध्ये इथपर्यंत झालेला हा प्रवास त्याच्या निरंतर संघर्षाचे आणि मेहनतीचे फळ आहे. अन्यथा कोणतेही ग्लॅमरस आडनाव न लाभलेला अक्षय बॉलीवूडमध्ये यशस्वी ठरलाच नसता.’शेफ’ म्हणून कारकिर्दीची सुरवात करणारा अक्षय आता बॉलीवूडमधला ‘सबसे बडा खिलाडी’ ठरला आहे. सुरवातीला एक्शनपट करणारा अक्षय […]

प्रतिभावान संगीतकार व गायक श्रीधर फडके

मराठी संगीतातील सुधीर फडके तथा बाबूजी या अजरामर नावाचा वारसा समर्थपणे पेलणारे गायक आणि संगीतकार म्हणजे श्रीधर फडके. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९५० रोजी झाला. गीत-कवितेतील अर्थाला, शब्दांतील सौंदर्याला अधोरेखित करण्याची सुधीर फडके यांची गायनशैली श्रीधर फडके यांनी जाणीवपूर्वक आत्मसात केली असली तरी त्यांनी स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांना घरचा समृध्द वारसा असला तरी संगीतकार […]

जयदेव-एक अपयशी संगीतकार!!

खरतर, जयदेवला “अपयशी” संगीतकार म्हणण तस योग्य नव्हे, कारण, त्याने असे स्वत: कधीच म्हटल्याचे मी तरी वाचलेले/ऐकलेले नाही. आयुष्याचा बराच काळ सचिन देव बर्मन यांचा सहाय्यक म्हणून भूमिका बजावली. त्यामुळे, सतत त्यांच्या सावलीतच त्यांचे जीवन व्यतीत झाले असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. अर्थात, जेंव्हा, केंव्हा स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून संधी मिळाली, तेंव्हा मात्र, त्यांनी स्वत:चा दर्जा दाखवून दिला. […]

1 228 229 230 231 232 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..