नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

मराठी शाहीर व लोककलाकार विठ्ठल उमप

मराठी शाहीर व लोककलाकार विठ्ठल उमप यांचा जन्म १५ जुलै १९३१ रोजी झाला. आपल्या भारूडाने समस्त मराठी रसिकांना वेड लावणा-या विठ्ठल उमप यांनी आपल्या बहुआयामी कलासाधनेने अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घातली होती. राज्याच्या लोककलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यामध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं मोठं योगदान आहे. विठ्ठल उमप यांचा मूळचा गळा विदर्भाचा असला, तरी नगर जिल्ह्यातील एका खेड्यात त्यांच्या घराण्याने भेदिकाची […]

मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे

मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे यांचा जन्म ३ जुलै १९२५ रोजी झाला. पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न १२ जून १९४६ रोजी झाले. करारी व्यक्तिमत्त्वाच्या व शिस्तीच्या भोक्त्या सुनीताबाई या पुलंची मूक सावली म्हणूनच केवळ वावरल्या नाहीत तर पुलंच्या जडणघडणीतही त्यांचा अत्यंत क्रियाशील वाटा होता. पुलंचे […]

प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर

प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्म २४ जुन १८९७ रोजी गुजराथ मधील भंडारण जिल्ह्यातील जहाज या गावी झाला. पंडित ओंकारनाथ ठाकुर हे ग्वाल्हेर घराण्याचे एक प्रसिद्ध गायक होते. ओंकारनाथजी चौथे व शेवटचे अपत्य. ओंकारनाथजींचे बाल आयुष्य अतिशय कष्ट, गरिबी व हालअपेष्टांनी भरलेलं होते. ओंकारनाथ ठाकूर यांचे आजोबा पं. महाशंकर ठाकुर व वडिल पं. गौरीशंकर हे […]

अभिनेता भारत भूषण

भारत भूषण यांना लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करायची आवड होती. त्यांचा जन्म १४ जुन १९२० रोजी उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यात झाला.पण त्यांच्या वडिलांना ते पसंत नव्हते म्हणून मग त्यांना घर सोडावे लागले. चित्रपटांमध्ये काम करायच्या उद्देशाने भारत भूषण कलकत्याला निघून गेले. त्यावेळेला तेथे मोठमोठे चित्रपट बनत होते. तेथे त्यांना संघर्ष करावा लागला. एक दिवस त्यांच्या कष्टाचं चीज […]

सिने-अभिनेत्री किरण खेर

१९८८ सालच्या पेस्तनजी ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या किरण खेर यांनी देवदास, हम तुम, वीर-झारा, फना, रंग दे बसंती, कभी अलविदा ना कहना, ओम शांती ओम इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म १४ जून १९५५ रोजी झाला. १९८५ साली किरणने बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर सोबत विवाह केला. २००९ मध्ये किरण खेरने भारतीय […]

भारतीय बनावटीचे एकमेव ऑर्गन उत्पादक उमाशंकर दाते

उमाशंकर उर्फ बाळा सुरेश दाते यांचे शिक्षण १२ वी आर्टस पर्यंत. त्यांचा जन्म १४ जून १९७६ रोजी कोकणातील आडिवरे येथे झाला. बाळा दाते यांचा वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत संगीताशी तसा संबंध नव्हता. पण १९९४ साली उदय गोखले यांचे श्री. महाकाली मंदीरात भजन होते ते गाणं ऐकताना या सुरांशी आपले काहीतरी अनामिक नाते आहे याची त्यांना पहिली […]

अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल

१९२६ साला पासून या जोडीनी खरी धमाल सुरू केली. त्यांचा जन्म १६ जुन १८९० रोजी झाला. लॉरेल हा सडपातळ, काहीसा कुरकु-या आणि हार्डी लठ्ठ नि मस्तमौला. दोघांची एकमेकांवर चाललेली कुरघोडी, त्यांचा एकत्र गोंधळ आणि मस्ती यावर प्रेक्षक तुडूंब प्रसन्न होते. सा-या जगभर या जाड्या-रड्याचा धुमाकूळ चालू होता. जगातल्या सुमारे वीस भाषांमध्ये हे लघु-चित्रपट अनुवादित झाले आणि […]

मराठी लेखक श्रीपाद काळे

लौकिक अर्थाने म्हणाल, तर शालेय शिक्षण नाही, व्यवसाय भिक्षुकीचा. वास्तव अगदी आडखेड्यात. त्यांचा जन्म ८ जुलै १९२८ रोजी वाडा, सिंधुदुर्ग येथे झाला.पण पंचेचाळीस र्वष निष्ठेने साहित्यसेवा, चोपन्न कादंब-या, तेराशे कथा अशी थक्क करणारी कामगिरी करणारे लेखक म्हणजे  श्रीपाद काळे. वडिलांचा पारंपरिक भिक्षुकीचा व्यवसाय त्यांनी निष्ठेने सांभाळला. वडिलांनी घरीच भिक्षुकीचं प्राथमिक शिक्षण दिलं. मात्र, पुढील शिक्षण साता-याच्या […]

नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक चंद्रकांत गोखले

अभिनयातलं कर्तृत्व आणि सार्वजनिक जीवनातलं दातृत्व अशा दोन्ही आघाड्यांवर श्रेष्ठ ठरलेले अभिनेते म्हणजे चंद्रकांत गोखले. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. त्यांचे बालपण मिरज इथेच गेले. अभिनयाचं बाळकडू त्यांना मिळालं ते आपली आजी दुर्गाबाई आणि आई कमलाबाई यांच्याकडून. “चित्ताकर्ष’ ही त्यांची घरची नाटक मंडळी होती. वडिलांच्या अकाली निधनामुळे कमलाबाई आपल्या मुलांना बरोबर घेऊन विविध नाटक कंपन्यांमधून […]

ख्यातनाम अभिनेत्री आणि दिग्दर्शक मृणाल देव-कुलकर्णी

मृणाल कुलकर्णी यांनी मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, टेलिव्हिजन या तिन्ही क्षेत्रात काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांचा जन्म २१ जुन १९७१ रोजी पुणे येथे झाला.तसेच ‘रमा माधव’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून त्यांनी दिग्दर्शिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षण घेत असताना ‘स्वामी’ या मालिकेतून मृणाल कुलकर्णी यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ‘राजवाडे अँड सन्स’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘रमा माधव’, ‘प्रेम […]

1 231 232 233 234 235 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..