दामले आणि फत्तेलाल यांनी मिळून १९३६ मध्ये ‘संत तुकाराम’ हा बोलपट दिग्दर्शित केला. सर्व भारतभर हा बोलपट झळकला व या बोलपटाने नाव कमावले. हा बोलपट मराठी भाषेत असला तरी भाषेची अडचण कुठेही न येता भारतातील सर्वभाषिक प्रेक्षकांनी त्याला उत्तम दाद दिली. ‘संत तुकाराम’नंतर दामले-फत्तेलाल यांनी ‘संत ज्ञानेश्वर’ (१९४०), ‘गोपाळकृष्ण’ (१९४०) आणि ‘संत सखू’ (१९४१) असे चित्रपट दिग्दर्शित केले.‘संत तुकाराम’ हा चित्रपट व्हेनिस फिल्म फेस्टिवलला पाठवला होता. त्या प्रसंगी तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असा त्याचा सन्मान झाला. […]
उपहास, माझे नाव रमाकांत वालावलकर, नवऱ्याचे संगोपन, प्रेमाची देणीघेणी, मोठ्या माणसांच्या गमतीदार गोष्टी, पन्नास वर्षांत मुंबई समुद्रात बुडेल, स्वयंसूचना, आटपा रे आटपा लवकर, पोटिमा (पोटावर टिचकी मारा), हसत खेळत मनाची ओळख अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. […]
त्यांचं ‘मातीची चूल’ हे आत्मचरित्रही स्पष्ट आणि रोखठोक विवेचनामुळे चर्चिलं गेलं. लहान मुलांसाठी त्यांनी ‘इसापनीती’ आणि ‘हितोपदेश’सारखी पुस्तकं लिहिली. ‘नरेंद्र : रुक्मिणी स्वयंवर’ हे नाटकही त्यांच्या नावावर आहे. […]
लता मंगेशकर हा त्यांचा विक पॉइंट. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील सर्व गायक-गायिकांच्या गाण्यांचे पारायण तर ते त्या वेळी करतच होते, पण लता मंगेशकरांच्या गाण्यांसाठी मनाचा एक कोपरा कायम राखून ठेवलेला होता. […]
प्रिन्सेस डायना यांची विविध नावांनीही ओळख होती. प्रिन्सेस ऑफ वेल्स म्हणून त्या ओळखल्या जात होत्याच. पण, त्याशिवायही त्या डचेस ऑफ कॉर्नवल म्हणूनही ओळखल्या जायच्या. हेअरस्टाईलपासून ते अगदी ड्रेसिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीत सर्वजण प्रिन्सेस डायना यांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचं पाहायला मिळालं होतं. […]
ज्येष्ठ बालशिक्षणतज्ञ गणेश हरी पाटील उर्फ ग. ह. पाटील यांचा जन्म १९ ऑगस्ट १९०६ रोजी झाला. ग. ह. पाटील हे लहान मुलांना आवडणाऱ्या कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी! ‘कळीचे फूल झालेले पाहणे व लहान मुलांच्या मनाचा विकास झालेला पाहणे यासारखे सुंदर व मनोहर दृश्य नाही,’ असं ते म्हणत असत. केशवसुतांनी म्हटल्यानुसार ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे हा बाणा […]
त्यांनी सरोद व इलेक्ट्रॉनिक गिटारचे फ्युजन केले आहे. त्यासंबंधी वाद्य निर्माण केले आहे. झीरॉड असे नामकरण तौफीक कुरेशी यांनी या वाद्यासंबंधी केले आहे. फ्युजन म्हणजेच शास्त्रीय संगीतातला पुढला भाग किंवा आवृत्ती. युवकांना फ्युजन अधिक आवडते. त्याचा प्रसार करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. […]
२००१ साली ‘पांडुरंग फुलवाले’हे पहिलं व्यावसायिक नाटक रंगभूमीवर आणलं. त्यानंतर ’वन रूम किचन’ आणलं. दुधावरची साय, चॉईस इज युवर्स, जाऊ दे ना भाई, कथा, मदर्स डे, टाईम प्लीज या नाटकांची निर्मिती केली. […]
सुदेश भोसले आणि बॉलीवूडचे ‘बीग बी’ अर्थात अमिताभ बच्चन यांचे अतूट असे नाते आहे. अमिताभ बच्चन यांची ‘मिमिक्री’करता करता सुदेश भोसले यांचा आवाज अमिताभ बच्चन यांचा आवाज झाला. सुदेश भोसले यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी “चुम्मा चुम्मा‘, “शावा शावा‘, “सोना सोना‘, “मेरी मखना‘ ही गाणी गायली आहेत. […]