नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते प्रभाकर पणशीकर

प्रभाकर पणशीकर उर्फ पंत यांचे नाव उच्चारताच डोळयांसमोर अनेक व्यक्तिरेखा उभ्या राहतात. त्यांचा जन्म १४ मार्च १९३१ रोजी झाला. लखोबा लोखंडे, औरंगजेब, प्रो. विद्यानंद अशा कितीतरी भूमिका पंतांनी आपल्या अभिनय सामर्थ्याने अजरामर करून ठेवल्या आहेत. प्रल्हाद केशव अत्रेलिखित ‘तो मी नव्हेच’ ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे मा.प्रभाकर पणशीकर हे महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. ‘इथे ओशाळला मृत्यू’ ह्या […]

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ख्यातनाम निर्माते-दिग्दर्शक शक्ती सामंत

‘कटीपतंग’, ‘अमरप्रेम’, ‘आराधना’ आदी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी आपल्या कारकीर्दीत ४३ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यात ३७ हिंदी , ६ बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचा जन्म १३ जानेवारी १९२६ रोजी झाला. त्यांचे डेहराडून येथे प्रारंभीचे शिक्षण झाले. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली व नंतर हिंदी चित्रपटात अभिनेता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने ते मुंबईला आले. दापोली येथे […]

प्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार शर्मा

संतूर या तंतुवाद्याची ओळख- शिवकुमार शर्मा यांनी संतूर हे वाद्य जगासमोर आणले. सिनेमा संगीतमध्ये एक काळ असा होता की, या वाद्याशिवाय पार्श्व संगीताला पूर्णत: येऊच शकत नसे. रम्य हिमपर्वत दाखवायचा, तर तिथे संतुर हवेच! लोकसंगीतात वापरल्या जाणार्याा संतुरमध्ये पं. शिवकुमार शर्मांनी आपल्या संगीताच्या गरजेनुसार काही सुधारणा केल्या आणि फार मोठ्या अपेक्षेने हे वाद्य शास्त्रीय संगीताच्या दरबारात […]

जेष्ठ रंगकर्मी गोपीनाथ सावकार

अशोक सराफ यांचे गोपीनाथ सावकार हे मामा. अशोक सराफ यांनी गोपीनाथ सावकार यांच्यावर लोकसत्ता मध्ये लिहिलेला लेख. कलेशिवाय ज्यांनी आयुष्यात कशालाच महत्त्व दिले नाही, असे गोपीनाथ सावकार माझे मामा होते आणि मामापेक्षा म्हणाल तर त्यांचं आणि माझं कलेच्या क्षेत्रातलं नातं द्रोणाचार्य-एकलव्यासारखं होतं. सबंध आयुष्यात त्यांनी नाटक व सिनेसृष्टीतील माणसं, तिथली अवस्था प्रत्यक्ष पाहिली होती, अनुभवली होती. […]

स्मरणीय भूमिका करणा-या दुर्गा खोटे

चित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टोकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी झाला. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते. दुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात येऊ शकतात असा एक प्रकारे संदेशच त्यांनी दिला. सुरूवातीस […]

मूकचित्रपटाचे नायक भाऊराव दातार

मूकचित्रपटाचे नायक भाऊराव दातार यांचा जन्म १४ जानेवारी १९०३ रोजी सातारा येथे झाला.  कृष्णाजी विश्वनाथ दातार ऊर्फ भाऊराव दातार यांचा जन्म एक श्रीमंत कुटुंबात झाला पण काही कारणाने त्यांच्या वडीलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आणि त्यांना नाशिकला जाण्यास भाग पाडले. तेथे त्यांच्या वडिलांनी विजयनंद थिएटरच्या जवळ एक चहाचे दुकान सुरु केले. आपल्या वडिलांना चहा देण्यासाठी मदत करताना, […]

संवेदनशील कवी सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’

उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे एका जमीनदाराच्या घरी कैफी आझमी यांचा १४ जानेवारी १९१९ रोजी जन्म झाला. नातेवाईकांच्या हट्टामुळे धार्मिक शिक्षणासाठी लखनौच्या सुलतान-अल-मदरिस मध्ये दाखल व्हावे लागलेल्या कैफी यांना त्याच्या बंडखोर स्वभावामुळे तिथून हाकलून देण्यात आले. ते अत्यंत संवेदनशील होते. लहानपणापासूनच जो माणूस अलम दुनियेतील दु:खे संपवणा-यांच्या गटात सामील झाला, सर्वांच्या दु:खाला आपल्या गीतांमधून ज्याने शक्ती दिली आणि […]

संगीतकार चित्रगुप्त

अर्थशास्त्र आणि जर्नालिझम मध्ये एम.ए केलेले व पाटण्यात करीत असलेली प्राध्यापकी सोडुन मुंबईला संगीताला वाहून घेण्यासाठी चित्रगुप्त यांचे पुर्ण नाव चित्रगुप्त श्रीवास्तव. त्यांचा जन्म१६ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. काही काळ एस. एन. त्रिपाठी यांचे सहाय्यक म्हणून काम केले. मा.चित्रगुप्त यांनी आपली सांगितिक वाटचाल ब्रम्हचारी या नावानं सुरु केली होती. खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द भाभी ह्य़ा चित्रपटापासून सुरू झाली. एव्हीएम […]

प्रसिद्ध बंगाली साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी

महाश्वेता देवी यांचे वडील मनीष घटक एक कवी आणि कादंबरीकार होते. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९२६ रोजी ढाक्यात झाला. महाश्वेतादेवी किशोरवयीन असतानाच त्यांचे कुटुंबीय पश्चिम बंगालमध्ये स्थायिक झाले. तिथेच त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. लहान वयातच त्यांनी लिखाणाला सुरुवात केली होती. इंग्रजी विषयातून पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी शिक्षिका आणि पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात […]

ग्वाल्हेर घराण्यांचे गायक पंडित उल्हास कशाळकर

पंडित उल्हासस कशाळकर यांचे शिक्षण M.A.(L.L MUSIC). त्यांचा जन्म १४ जानेवारी १९५५ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा गावी येथे झाला. पंडित उल्हास कशाळकर यांची ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत आहे. त्यांना संगीताचे सुरुवातीचे शिक्षण व्यवसायाने वकील असलेल्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या आपल्या वडिल नागेश दत्तात्रेय कशाळकर यांचेकडून मिळाले. नागेश कशाळकर हे उल्हास […]

1 241 242 243 244 245 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..