नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

उद्योगपती गौतम अदानी

ते जसे नेहमी सांगतात की, यशाची गुरुकिल्ली दडली आहे सातत्यपूर्णतेने काहीतरी शिकत राहण्यात. त्यांचा हा मंत्र घेऊनच त्यांची वाटचाल सुरू आहे आणखी लक्षावधी डॉलर्सच्या उद्योगांना गवसणी घालण्यासाठी! […]

मानवी रक्तगट शोधणारा कार्ल लँडस्टायनर

त्यांनी संशोधन करेपर्यंत सर्व मानवजातीच्या शरीरात एकाच प्रकारचे रक्त असते असा समज प्रचलित होता; परंतु त्या काळी युरोपातील रुग्णालयात जखमी सैनिक आणि इतर रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्यास सरसकट कोणाही रक्तदात्याचे रक्त दिले जाई. रुग्णाच्या शरीरात हे दुसऱ्याचे रक्त गेल्यावर बहुतेक वेळा रक्तात गुठळ्या तयार होत आणि रुग्ण किंवा सनिक दगावण्याच्या घटना होत असत. अशा अनेक घटना घडल्यावर व्यक्तीव्यक्तींच्या रक्तात काही तरी फरक असला पाहिजे अशी लँडस्टायनरना शंका येत होती. रक्तविषयक संशोधनाचा त्यांनी ध्यास घेतला. […]

रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज

रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला. महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या […]

गोविंद मोरेश्वर पेंडसे उर्फ आप्पा पेंडसे

गोविंद मोरेश्वर पेंडसे उर्फ आप्पा पेंडसे यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९१० रोजी बडोद्याजवळील व्यास गावी झाला. आप्पा पेंडसे यांचा जन्म बडोद्यात झाला असल्याने गुजराती भाषेतून त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. घरातील आर्थिक अडचणीमुळे त्यांना नोकरीच्या शोधात ते मुंबईला आले. मुंबईत आल्यावर त्यांनी वृत्तपत्रसृष्टीत प्रवेश केला. ‘विविधवृत्त’, सिनेसाप्ताहिक तारकांमध्ये उपसंपादक, संपादक अशी कामे त्यांनी केली. त्याचबरोबर निर्माते दादासाहेब […]

भारतीय संगीत ग्रामोफोनवर उमटवणारी पहिली गायिका गौहरजान

त्याकाळी त्या एका रेकॉर्डिंगमागे सुमारे तीन ते चार हजार घेत असत. त्यांचे राहणीमान आणि आयुष्य असे होते की असे जगणे इतर स्त्रियांसाठी केवळ स्वप्नातच शक्य होते. गौहर जान यांच्या अंगावर हजारो रूपयांचे हिऱ्याचे दागिने असायचे. राहणीमान अतिशय भपकेबाज होते. शेवटी त्यांना दवाखान्यात अकाली मृत्यू आला तेव्हा ते बिल भरायला तिच्याकडे पैसे नव्हते. […]

ज्येष्ठ अभिनेत्री नलिनी कृष्णराव चोणकर

चित्रपट निर्मितीत अपयशी ठरूनही नलिनी चोणकर यांनी आपली अभिनयाची कारकिर्द सुरूच ठेवली, म्हणूनच प्रेक्षकांना त्यांच्या भूमिका असलेले ‘भाभी’, ‘पारसमणी’, ‘बाजे घुंघरू’ हे चित्रपट पाहण्याचा आनंद घेता आला. ‘पारसमणी’ चित्रपटातील ‘हसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे रंग सुनहरा….’ हे नलिनी चोणकर यांच्यावर चित्रित झालेले गाणे आजही प्रेक्षकांना भुरळ घालते. […]

काव्य शास्त्र विनोद गुंफणारी चतुरस्र लेखिका इंद्रायणी सावकार

इंद्रायणी सावकार यांनी लिहिलेली The White Dove ही कथा, इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ’एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रियांसाठी लिहिलेल्या कथा’ या प्रकारच्या कथासंग्रहांत समाविष्ट झाली आहे. Our Inheritance of Spirituality (आपला संस्कृतिक वारसा) या त्यांच्या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. […]

दिग्दर्शक, निर्माते किरण शांताराम

१९७५ साली साहाय्यक दिग्दर्शक झाल्यावर शांतारामबापूंनी त्यांना दिग्दर्शनाची संधी दिली. १९७६ साली जगदीश खेबुडकरांचे संवाद व गीते आणि राम कदम यांचे संगीत असलेला ‘झुंज’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. […]

गोवा मुक्ती मोर्चा सेनानी पद्मश्री मोहन रानडे

गोवा मुक्ती संग्रामातील रानडे यांची कामगिरी धाडसी आणि रोमांचक अशी होती. त्यांनी शिक्षक म्हणून गोव्यामध्ये आपले बस्तान बसवले आणि पोर्तुगीजांविरोधात सशस्त्र बंड उभारले. या कारवायांमध्ये बेती येथील पोलीस चौकीवर केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. त्यानंतर या कारवाईविरोधात त्यांना अटक झाली. त्यानंतर पुर्तुगीज पोलिसांनी त्यांना पोर्तुगालमधील लिस्बन येथे तुरुंगात ठेवले. […]

स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन

दुसऱ्या महायुद्धानंतर निवडून आलेल्या क्लेमंट ऍटर्लीच्या मजूर पक्षाच्या शासनाने भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरविले. हे मोठे जटील काम होते तसेच मुस्लिमांच्या मागणीप्रमाणे वेगळे राष्ट्रही निर्माण करायचे होते. ही कामगिरी लॉर्ड माउंटबॅटन यांच्यावर सोपविण्यात आली. मार्च १९४७ मध्ये ते शेवटचे व्हाइसराय म्हणून भारतात आले. त्यांनी ३ जून १९४७ रोजी भारतास १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. […]

1 27 28 29 30 31 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..