आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये अभिनेता व दिग्दर्शक म्हणून मोलाची कामगिरी त्यांनी बजावली. “मृगजळ”, “उन्मेष” यांसारख्या अनेक नाट्यस्पर्धांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत. […]
आग्रा गायकीमध्ये अनेक राग ठराविक पद्धतीने गायले जातात. काणेबुवाही अगदी त्या ठराविक पद्धतीनेच ते राग शिकवत. त्यामुळे ते तसेच गळ्यावर चढायचे. डोळस पद्धतीने गाणं ऐकायला आणि मग ते गायला काणेबुवांनी त्यांना शिकवलं. विलायत हुसेन खान साहेब इचलकरंजीला असताना काणेबुवांना जी तालीम द्यायचे ती बघण्याचं आणि अनुभवण्याचं भाग्य पं शरद जांभेकर यांना मिळाली होती. […]
डॉ.सदानंद मोरे घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ‘तुकाराम दर्शन’ या त्यांच्या ग्रंथासाठी साहित्य अकादमीसह १५ संस्थांचे पुरस्कार मिळाले होते. तसेच डॉ.सदानंद मोरे यांच्या’उजळल्या दिशा’ या नाटकासाठी राज्य शासनासह १० संस्थांचे पुरस्कार मिळाले होते. […]
त्यांनी दैवत कोशांची निर्मिती केली. जीवनसंग्राम, ताई अन् भाऊ, वटपत्र, राष्ट्रसेवकाची शिदोरी, राम बंधू त्याग सिंधू, उक्तीविशेष, साहित्य सरिता, अज्ञाताची वचने, वंदे मातरम, किशोर मित्रांनो, देवादिकांच्या गोष्टी, हनुमान कोश, श्रीराम कोश, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. […]
‘झपाटलेला’, ‘खतरनाक’, ‘चश्मेबहाद्दर’, ‘डम डम डिगा डिगा’, ‘आबा झिंदाबाद’, ‘सालीनं केला घोटाळा’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बाबा लगीन’, ‘लाडी गोडी’, ‘पकडापकडी’, ‘वन रुम किचन’, ‘पुणे व्हाया बिहार’, ‘लावू का लाथ?’ हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट. किशोरी अंबिये यांनी १५० हून अधिक चित्रपटात अभिनय केला आहे. […]
आत्मनिर्भर म्हणजे जगापासून अलिप्त नाही, ‘आयात नाही’ असे नाही, ‘जगाशी व्यापार संबंध तोडणे’ असा नाही. तर आपल्या अर्थव्यवस्थेला आवश्यक असे धोरण ठरविणे होय. आपले SWOT (Strengths, Weaknesses, Opportunities and Threats) ध्यानी घेऊन, यांचा अभ्यास करून आमच्या विकासाच्या संकल्पनेशी सुसंगत आणि आमच्या संसाधनांचा विचार करून ठरविलेले धोरण म्हणजे ‘आत्मनिर्भर भारत’ होय. […]
शिक्षणाच्या बाबतीत विजयदुर्ग मध्ये माध्यमिक विद्यालय होण्यासाठी अविनाश गोखले यांनी जीवाचे रान करुन परवानगी आणली. त्या वेळी मंत्रालयात परवानगी साठी ते दादा राणेंच्या आमदार निवासात त्यांचे विजयदुर्गतील मित्र गुंडू वाडये यांच्या सोबत दिवस दिवस काढून तत्कालीन मंत्री भाई सावंत आणि विजयदुर्ग मधील इतर शिक्षक याचे मदतीने ती परवानगी मिळवली. […]
दादा कोंडकेंच्या चित्रपटांनी आईची ही प्रतिमा बदलून रागात प्रेम व्यक्त करू पाहणारी, आपल्या मुलाच्या भल्यासाठी त्याला अस्सल गावरान शिव्या घालणारी आई रत्नमाला यांच्यारूपाने चित्रपटसृष्टीला दिली. आईच्या रूपातील रत्नमाला यांनी या आईच्या बदललेल्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिला, म्हणूनच त्यांनी साकारलेली ही ‘आये’ चित्रपटसृष्टीत अजरामर झाली. किंबहुना रत्नमाला यांचे दादा कोंडकेंची ‘आये’ हेच नाव चित्रपटसृष्टीत रूढ झाले आणि आजतागायत ते तसेच आहे. […]
मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली नाट्यसंस्थेत त्यांनी व्यवस्थापक म्हणून काही काळ काम केले रातराणी, पांडगो इलो रे ब इलो, आई रिटायर होतेय अशा अनेक नाट्यप्रयोगांचे त्यांनी व्यवस्थापन केले नंतर १९९२ मध्ये चंद्रलेखा या मान्यवर संस्थेत त्यांना मोहन वाघांनी बोलावून घेतले आणि २०१० पर्यंत(चंद्रलेखा संस्था बंद होई पर्यंत) ते चंद्रलेखामध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. […]