शोभना गोखले यांनी विदर्भातील वाशिम (प्राचीन वत्सगुल्म) जवळील हिस्सेबोराळा येथे वाकाटक राजवंशातील देवसेनाच्या ब्राह्मी लिपीतील लेखाचा शोध लावून त्यामध्ये शक ३८० हा उल्लेख असल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे वाकाटककालीन इतिहासाच्या अभ्यासात या लेखाने मोलाची भर घातली. तसेच जुन्नर येथील नाणेघाटातील लेण्यामधील सातवाहन सम्राज्ञी नागनिका हिच्या ब्राह्मी लिपीतील लेखावर संशोधन करून लेखातील २८९ हा आकडा आणि त्याचे वाजपेय यज्ञातील महत्त्व अधोरेखित केले. […]
प्रसिद्ध साहित्यिक मधूसुदन कालेलकर आणि संगीतकार राम कदम यांच्या सोबतच्या बैठकीत पुणेकरांनी अवघ्या १५ मिनिटात हे गाणं लिहिलं होतं. हे गाणं गोविंद म्हशीलकर आणि पुष्पा पागधरे यांनी गायलं होतं. तर प्रसिद्ध अभिनेते निळू फुले, शरद तळवळकर आणि उषा चव्हाण यांच्यावर हे गाणं चित्रित झालं होतं. हे गाणं ऐकल्यानंतर निळू भाऊंनी पुणेकरांना जवळ बोलावून घेतलं. छान लिहिलंस. असंच लिहीत राहा, प्रगती करा, असं निळूभाऊंनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं. हा किस्सा ते आजही अभिमानाने सांगतात. […]
‘वस्त्रहरण’चा पाच हजारावा प्रयोग कुणीही विसरू शकणार नाही, असा ‘न भूतो न भविष्यती’ असा झाला. सर्वच मोठय़ा कलाकारांनी यामध्ये भाग घेतला आणि या नाटकाचे ५०० रुपयांचे तिकीट काळाबाजारात तब्बल १२ हजार रुपयांना विकले गेले होते. […]
नातवंडांच्या कविता हा सामाजिक जाणीव असलेला कार्यक्रम (वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी कवितावाचन) आदित्य दवणे यांच्या संकल्पनेतून सुरू झाला असून मुंबई, पुणे, गोवा येथे या कार्यक्रमांचे प्रयोग सादर झाले आहेत. […]
९३९ साली हंस पिक्चर्सचा ‘देवता’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात बाबूराव पेंढारकरांनी प्रथमच नायकाची भूमिका केली आणि आपल्या समर्थ अभिनयाच्या बळावर ‘सुखाचा शोध’, ‘देवता’, ‘पैसा बोलतो आहे’, ‘पहिला पाळणा’ अशा अनेक चित्रपटांत नायकाची व्यक्तिरेखा साकारली. वाढत्या वयाला लक्षात घेत त्यांनी चरित्र भूमिकाही प्रभावीपणे अभिनित केल्या. […]
भानुविलास चित्रपटगृह येथे १९५८ मध्ये ‘सौभद्र’ नाटकातील छोटय़ाशा भूमिकेने भारती गोसावी यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. या नाटकात पं. छोटा गंधर्व (कृष्ण), गानहिरा हिराबाई बडोदेकर (सुभद्रा) आणि भार्गवराम आचरेकर (अर्जुन) अशा दिग्गजांबरोबर त्यांना शिकता आले. त्या भूमिकेसाठी भारती गोसावी यांना चक्क पाच रुपये मानधन मिळाले होते. […]
नरहरी झिरवाळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दिंडोरी तालुक्यातील वनारे हे त्यांचं गाव. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवाळ यांची ओळख आहे. […]
महाविद्यालयात असताना स्नेहलने अनेक एकांकिकांमध्ये काम केले आणि उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिकही पटकावले. ‘चला हवा येऊ द्या’ साठी तिने सहज ऑडिशन दिली आणि ती हे पर्व जिंकली देखील. त्यानंतर मात्र स्नेहलने मागे वळून पाहिलं नाही. […]
ज्येष्ठ अभिनेत्री व कळसुत्रीकार मीना नाईक यांचा जन्म १९ जून १९५१ रोजी झाला. मीना या समाजभान असणारी रंगकर्मी व कळसुत्रीकार म्हणून ओळखल्या जातात. मीना नाईक या माहेरच्या मीना सुखटणकर होत.मीना नाईक यांचे शिक्षण मुंबईत झाले असून, त्यांनी १९७२ मध्ये मुंबईतील जे जे इंस्टिट्यूशन ऑफ एप्लाइड आर्ट येथून जे डी आर्टस् पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले तसेच […]
गायिका पद्मा वाडकर यांचा जन्म १९ जून १९७२ रोजी झाला. पद्मा वाडकर या मुळच्या केरळच्या आहेत. त्यांनीही अनेक गाणी गायली आहे. दहा वर्षाच्या असताना पद्मा या आचार्य जियालाल वसंत (सुरेशजी यांचे गुरु) यांच्या कडे गाणे शिकत होत्या. १९८५ मध्ये गुरुजींचे निधन झाल्यावर त्या सुरेशजींच्या संपर्कात आल्या. रूपारेल कॉलेज शिकत असताना कॉलेजला दांडी मारून त्या सुरेशजींच्या रियाझाला […]