मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असताना असताना इंग्लिश चित्रपट हिंदी मध्ये डबिंग करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये फ्रोझन या इंग्लिश अनिमेटेड चित्रपटाला ‘ॲना’ या पात्राला आवाज देण्याची संधी मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी ‘बिग हिरो 6’ या चित्रपटातील एका पात्रा ला सुद्धा आवाज दिलेला आहे. […]
लोकमान्य टिळकांनी १८९५ साली म्हणजे १२५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी मागील दहा वर्षांपासून पांडुरंगजींवर आहे. […]
१९९५ ची निवडणूक म्हणजे त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा होता. माझगांवातल्या या निवडणुकीत छगन भुजबळ हे प्रस्थापित राजकिय नेते त्यांच्या विरुध्द होते. त्यांना बाळा साहेबांनी निवडणूक रिंगणात उतरवले होते. माझगांवकरांच्या आशिर्वादाने, तळागळातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे, पदाधिकाऱ्याच्या मुळे ते छगन भुजबळ यांच्या विरुद्ध निवडणूक जिंकले. बाळा नांदगांवकर या नावामागे जायंटकिलर ही उपाधी लागली. […]
सोनी टीव्हीवर गाजलेल्या ‘परवरिश’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वात गौतमी काम केले होते. सातत्याने हिंदीत काम करीत राहिल्याने आपल्याला मराठी चित्रपटांमध्ये रस नाही, असा बहुधा लोकांचा समज झाला असावा. मला खरोखरच मराठी चित्रपटात काम करायचे आहे, असे गौतमीने एका मुलाखतीत सांगितले होते. […]
डॉ. मीना नेरूरकर या जितक्या नृत्यात, लिखाणात तरबेज आहेत तितक्याच त्या अभिनयातही निपुण आहेत. ‘इंग्लिश विंग्लिश’ या हिंदी तर ‘स्लीपवॉक विथ मी’ आणि ‘मिस्टर रवी अँड मिस्टर हाईड’ या हॉलीवूडपटात अमेरिकेतील टीव्ही मालिका ‘One life to Live’ यात व इतर मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. त्यांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यात त्यांनी ‘वाऱ्यावरची वरात’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘सख्खे शेजारी’ यांसारख्या नाटकातही त्यांनी कामे केली आहेत. […]
‘सांस्कृतिक समृद्धीसाठी’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘अंतर्नाद’ या वाङमयीन मासिकाच्या त्या गेल्या दीड दशकाहून अधिक काळ ‘व्याकरण सल्लागार’ आहेत. ‘अंतर्नाद’ची मुद्रितं त्या अजूनही म्हणजे वयाच्या नव्वदीतही तपासतात. त्या ‘अंतर्नाद’च्या केवळ मुद्रित तपासनीस नाहीत, तर ‘व्याकरण-सल्लागार’ आहेत. […]
“केसरी’ गणेशोत्सवातील दहा दिवसांचे सांस्कृतिक कार्यक्रम लोकप्रिय करण्यात खेर यांचा मोठा वाटा असे. जयंतराव टिळक, वि. स. माडीवाले, हरिभाऊ कुलकर्णी, रामभाऊ जोशी आदींच्या “केसरी’च्या आवारात जमणाऱ्या मैफिलीतील गप्पा, हास्यविनोद आणि एकमेकांची थट्टा हा एक अविस्मरणीय अनुभव होता. स. गर्गे यांनी संपादित केलेल्या “यशवंतराव चव्हाण आणि पत्रकार’ या पत्रसंवाद ग्रंथांतील भा. द. खेर आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील पत्रव्यवहार वाचल्यानंतर खेरांच्या ’लेखनध्यास’ किती होता हे ध्यानात येते. […]
मा.रेगे यांना साहित्य आणि कलांविषयी खोल आस्था होती. साहित्यिक, कलावंत यांच्याविषयी त्यांच्या मनात प्रेम होते, जिव्हाळा होता आणि भक्ती होती. मर्ढेकर, ठोंबरे, दिवाकर, केशवसुत, सार्त्र, काम्यू, काफ्का, मान्देलस्ताम, व्हॅन गॉफ, पॉल गोगँ, मॉदिन्लिआनी, सॉक्रेटिस, मार्क्स, मुंक, केसरबाई, गडकरी इत्यादी कविता विषय पाहिले की कलावंतांविषयी असलेल्या आस्थेचा प्रत्यय येतो. तसेच त्यांच्या लेखनातील संदर्भातूनही ही आस्था जाणवते. […]
प्रवीण तरडे व प्रणित हे दोघं खूप वर्षापासूनचे मित्र आहेत. सर्जनशील निर्मिती करण्याच्या वेडानं त्या झपाटलेल्या दोघांनी देऊळबंद हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. सिनेमाचं लेखनही त्यांनी मिळूनच केलं होते. देऊळबंद , मुळशी पॅटर्न , सरसेनापती हंबीरराव, आ रा रा खतरनाक, उन उन वठातून, आभाळा आभाळा, गुरूचरीत्राचे कर पारायण, हबीर तु खंबीर तु अशी अनेक सुपरहिट गाणी लिहिली होती. […]
नाटकाचे वेड असलेल्या, महाराष्ट्रात सिनेमासारखी नवी विज्ञानाधिष्ठित कला रुजवण्याचे खडतर काम सुधीर नांदगावकर यांनी केले. त्यांनी महाराष्ट्रात आणि भारतातही फिल्म सोसायटीची चळवळ पसरवली. सुधीर नांदगावकर यांचा प्रवास छापील माध्य्माकडून दृकश्राव्य माध्यमाकडे असा झालेला दिसतो. […]