महान धावपटू फ्लाइंगसीख मिल्खासिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. मिल्खा सिंग यांचा जन्म गोविंदपुरा स्थित शीख कुटुंबात झाला होता. मिल्खा सिंग यांनी आपल्या जीवनात ८० शर्यतीत भाग घेतला. त्यात ते ७७ वेळेस विजयी झाले. तीन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १९५८ मधील कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटरच्या शर्यतीत गोल्ड मेडल मिळवलं […]
लवासा विरोधी आंदोलन, पश्चिम घाट संवर्धन, भूसंपादन कायदा, शाश्वत विकास, लोकाधिकाराच्या चळवळी ते अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनात आंदोलनात तसेच आम आदमी पार्टीच्या स्थापनेत सक्रिय सहभागी राहिलेले आहेत. […]
१९८०च्या दशकात प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी एका संगीत समारंभात जयपुर-अत्रौली घराण्याचे मल्लिकार्जुन मन्सूर यांचे गाणे ऐकले आणि त्या मंत्रमुग्ध झाल्या आणि काही वर्षांनंतर त्यांचे पुत्र आणि शिष्य राजशेखर मन्सूर यांना भेटल्या आणि त्यांना गाणे शिकवण्याची विनंती केली. हे शिकणे पुढे दहा वर्षे चालले. […]
टीना तांबे यांनी रंजना ठाकुर, डॉ सुचित्रा हरमलकर, व पंडित रामलाल यांच्या कडून कथ्थकचे शिक्षण घेतले,पुढे २००१ मध्ये मुंबईत येऊन त्यांनी गुरु उमा डोगरा यांच्या कडे शिक्षण घेतले. त्यांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडल, मुंबई येथून नृत्य अलंकार शिक्षण घेतले आहे, तसेच त्यांनी देवी अहिल्या विश्वविद्यालयतून ‘कथ्थक’ या विषयात एम ए केले आहे. […]
मराठीत ‘उत्तरायण’, ‘एवढंसं आभाळ’, ‘नटरंग’, ‘बालक पालक’, ‘बाल गंधर्व’, ‘मुळशी पॅटर्न’ आदी चित्रपट महेश लिमये यांनी केले. सलमान खानच्या ‘दबंग’साठी ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून महेश लिमये यांना खास बोलावून घेण्यात आले. हिंदीतील ‘बिग बजेट’ आणि ‘१५० कोटी’ क्लबमध्ये गेलेला एक मोठा चित्रपट त्यांच्या नावावर जमा झाला. पुढे त्यांनी ‘दबंग २’साठी ही काम केले. ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘कॉर्पोरेट’, ‘हीरोईन’, ‘दबंग’, ‘दबंग २’ हे त्यांचे हिंदीतील गाजलेले चित्रपट होत. […]
गोळवलकर गुरुजींच्या निधनानंतर १९७३ साली त्यांनी संघाचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या सरसंघचालक पदाच्या कारकिर्दीत संघाला एक नवी दिशा मिळाली आणि संघाने पूर्वांचल राज्यातून वनवासी क्षेत्रांतून सेवाकार्याला सुरुवात केली. त्यांनी २१ वर्ष सरसंघचालकपद भूषविले. […]
१९५५ मध्ये समाजवादी पक्षाने पुकारलेल्या गोवा मुक्तीसंग्रामात दिनू रणदिवे सक्रिय होते. तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता. या लढ्यात त्यांनी आचार्य अत्रे यांच्यासोबत तुरुंगवासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र पत्रिका या नावाचे अनियतकालिक सुरु केले. […]
इंग्रजी आणि मराठीमधील वैज्ञानिक नियतकालिकांत त्या सातत्याने लेखन करीत असत. ‘समाजविकासासाठी व्यक्तिविकास’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. महाराष्ट्रातील एक विचारवंत व शिक्षणतज्ञ गोवर्धन पारीख यांच्या त्या पत्नी होत. […]
गायिका, निवेदिका, निर्मात्या नीला रविंद्र यांचा जन्म १७ जूनला मुंबईत झाला. नीला रविंद्र भिडे हे त्यांचे पूर्ण नाव. आपल्याला त्या नीला रविंद्र म्हणूनच माहीत आहेत. माहेरच्या त्या नीला जोशी. उत्तम निवेदिका आणि आयोजिका म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच गायनातही त्यांनीआपला स्वतःचा ठसा उमटला आहे. पार्ल्यातील महात्मा गांधी रोडवरील ज्या भिडे कुटुंबियांच्या वास्तूत सुरवातीच्या काळात नुकतीच […]
नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमधून वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या सुनील अभ्यंकर यांना नाटकात भूमिका करणेच अधिक आव्हानात्मक वाटते. अभिनयाचा खरा कस हा रंगमंचावरच लागतो असे त्यांचे मत आहे. त्यांच्या वाट्याला आता पर्यंत विनोदी अंगाने जाणाऱ्या भूमीकाच आल्या असल्यातरी त्यांना गंभीर भूमीका करणेही आवडते. एका गंभीर भूमिकेच्या प्रतीक्षेत ते आहेत. तसेच खलनायकी ढंगाची भूमिका करणेही त्यांना आवडते. मात्र अद्याप त्यांना तशी संधी मिळालेली नाही. […]