चिंतामणराव कोल्हटकर यांचे वडील हे वर्तमानपत्र लेखक आणि वक्ते होते. त्यांचा जन्म १२ मार्च १८९१ रोजी नेवरे रत्नागिरी येथे झाला.चिंतामण कोल्हटकरांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणी अभ्यासात अधिक गती नसल्याचे पाहून काही वर्षे त्यांनी पिढीजात असलेली शेती केली. सातारा येथे ‘तुकाराम’ या नाटकात त्यांनी ‘मंबाजी’ची भूमिका साकारून (१९०७) रंगभूमीवर प्रवेश केला. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर याचं […]
कसबा पेठेतून न्यू जर्सीपर्यंतची वेगवान आगेकूच. एक भन्नाट यशोगाथा. अथक परिश्रमाने आकाराला आलं एक अफलातून चाकोरीबाहेरचं व्यक्तिमत्त्व. ‘दीपक सखाराम कुलकर्णी.’याव्यतिरिक्त लेखाला वेगळं शीर्षक असण्याचं काहीच कारण नाही. एवढय़ा तीन शब्दांतून यशाचं संपूर्ण डीएसके विश्व डोळय़ांसमोर उभं राहतं. मजला क्रमांक २६. दुर्गामाता टॉवर्स. दक्षिण मुंबई. उजव्या हाताला मुकेश अंबानींचं पेंट हाऊस, हेलिपॅड. डावीकडे ताज, गेट वे सकट […]
म्यानमार (वर्मा) मधील असंख्य आबालवृद्धांची ही अजूनही ‘शान’ आहे.त्यामुळेच तेथील युवक-युवतींच्या टी शर्टवर तिचे छायाच असते, तसेच इतर जीवनोपयोगी वस्तूंवरही तिच्या छायाचित्रांचे दर्शन होते. कारण एकच म्यानमारमधील जुलमी राजवटीविरुद्ध तिने सुरू केलेला संघर्ष. या संघर्षाला तेथील जनतेने अभूतपूर्व पाठिंबा दिला होता. या शांततापूर्ण चळवळीबद्दलच तिला १९११ मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. त्या महिलेचे नाव […]
मनोहारी सिंग यांचे घराणे वादकांचेच असल्यामुळे बालपणापासून त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. त्यांचा जन्म ८ मार्च १९३१ रोजी झाला.त्यांची वाद्यवादनाची सुरुवात पाश्चात्त्य बासरी (क्लॅरोनेट) आणि मेंडोलीन या वाद्यांपासून झाली. अखेर सॅक्सोफोन या वाद्याला त्यांनी आपलेसे केले व त्यावर हुकूमत मिळविली. १९५८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सितारों से आगे’ या चित्रपटातील गाण्यांसाठी संगीतकार एस. डी. बर्मन यांनी मनोहारी सिंग यांना संधी दिली. […]
साहिर लुधियानवी यांचे खरे नाव अब्दुल हयी. त्यांचा जन्म ८ मार्च १९२१ रोजी लुधियाना येथे झाला. लुधियानात साहिर यांनी शिक्षण घेऊन काही काळ दिल्लीत राहून मग मुंबईकडे मोर्चा वळवला. प्राचार्यांच्या हिरवळीवर एका मुलीसोबत बसल्यामुळे त्यांना कॉलेजमधून काढूनही टाकलेले होते. साहिर यांच्या आयुष्यात अनेक प्रेमिका आल्या. मात्र त्या सर्वांमध्ये ज्ञान पीठ पुरस्कार विजेत्या ‘अमृता प्रीतम’ हे नांव सर्वात वर! नौजवान […]
प्रसिद्धी पैसा यांसाठी कलाकार काम करतात परंतु काहीजण केवळ कलेसाठी जगतात त्यातील एक शाहू मोडक होते. त्यांचा जन्म २५ एप्रिल १९१८ रोजी झाला. शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट ‘श्यामसुंदर’ आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण झालेला हा पहिला बोलपट होता. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. मुंबईच्या ‘वेस्टएन्ड’ (नाझ) या चित्रपटगृहात तो सलग २७ आठवडे पडद्यावर झळकत होता. […]
पद्मा खन्ना या ट्रेंड ड्रान्सर असून वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पंडीत बिरजू महाराज यांच्याकडे कथ्थकचे धडे गिरवले. त्यांचा जन्म १० मार्च १९४९ रोजी बनारस येथे झाला.अभिनेत्री पद्मिनी आणि वैजयंती माला यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. वयाच्या १२ व्या वर्षी त्या पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकल्या. १९६१ मध्ये ‘भैय्या’ या भोजपुरी सिनेमाद्वारे पद्मा यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरवात […]
‘माझ्या आवाजाला शोभेल असं स्वत:चं गाणं मी बनवलंय. मी रंगभूमीवर कुणाचीही नक्कल करीत नाही. आय काण्ट इमिटेट एनी बडी बट आय फॉलो बालगंधर्व. त्यांचा जन्म १० मार्च १९१८ रोजी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे झाला.माझं गाणं माझ्या चिंतनातून आलं आहे. असा हा आध्यात्मिक प्रवृत्तीचा, कवी मनाचा, प्रसिद्धीपासून दूर असलेला आणि साधी राहणी असलेला अत्यंत मोठा कलाकार म्हणजे मा.छोटा गंधर्व! […]
लौकिक अर्थाने संगीतकार रवी यांची कारकीर्द कोणत्याही संगीतकाराला हेवा वाटावा अशी होती. त्यांचा जन्म ३ मार्च १९२६ रोजी झाला.त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांनी बंपर यश मिळवले आणि त्यातील गाण्यांनाही अफाट लोकप्रियता मिळाली. रवी यांनी स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून काम सुरू केले तो काळ चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाचा उत्तरार्ध म्हणता येईल. अतिशय सोप्या आणि ओठांवर सहज रूळणाऱ्या चाली हे रवी यांचे वैशिष्ट्य. त्यांच्या […]