९ मार्च १९५९ हा बार्बीचा जन्मदिन! आज बार्बी डॉल अठ्ठावन्न वर्षाची झाली. लहान माझी बाहुली, मोठी तिची साऊली घारे डोळे फिरवीते, लुकूलुकू ही पाहाते नकटे नाक उडवीते, गुबरे गाल फुगवीते कविवर्य दत्तांची ही कविता वाचताना त्यांनी बार्बीला पाहिले होते का, असा प्रश्न पडतो. त्यांनी बार्बीला पाहिले असण्याची शक्यता नाही. बार्बीला ज्यांनी जन्माला घातले त्यांनी दत्तांची ही […]
देविका राणी चौधरी हे मा.देविका राणी यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ३० मार्च १९०८ रोजी झाला.रवींद्रनाथ टागोरांच्या भगिनी सुकुमारीदेवी या त्यांच्या आजी. देविका राणी जेव्हा लंडनमध्ये स्थापत्यशास्त्र शिकत होत्या तेव्हा त्यांचा परिचय तेथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मा.हिमांशु रॉय यांच्याशी झाला. हिमांशु रॉय यांना नाटक आणि चित्रपटांत अतिशय रस होता. त्यांनी देविका राणीला आपल्या ‘लाइट ऑफ एशिया’ या चित्रपटाच्या […]
तबल्याचा ठेका आणि द्रुत लयीत जुगलबंदीचा शेवट करताना एका उन्मनी अवस्थेत मानेला वारंवार झटका दिल्याने लयीत डोलणारे डोईवरचे केस, ही तबला नवाज झाकीर हुसेन यांची रसिकजनांच्या मनांवर ठसलेली प्रतिमा. त्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रजी झाला. त्याच प्रतिमेच्या प्रेमात पडून सहज उमटणारी ‘वाह उस्ताद’ ही दाद आणि या सदासतेज, हसतमुख चेहरा व त्यांचे भारतीय संगीताला वैश्विक परिमाण मिळवून देणारे योगदान […]
उषा मराठे हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म २२ एप्रिल १९२९ रोजी झाला.एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या उषा किरण यांची घरची आर्थिक स्थिती बेताची होती. उषा आणि तिची मोठी बहीण लीला मराठे यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांचे वडील बापूसाहेब मराठे यांनी आपल्या दोघी मुलींना नाटकांत काम करण्यासाठी पाठवावयाचे ठरवले. वयाच्या बाराव्या वर्षी उषा मराठे यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. लवकरच […]
इटावामध्ये करीमुद्दीन आसिफ उर्फ के. आसिफ यांचे वडील फाजल करीम हे डॉक्टर होते. त्यांचा जन्म १४ जून १९२२ रोजी झाला.चित्रपट क्षेत्रात करिअर करण्यासाठी के. असीफ नंतर मुंबईला गेले. तेथे त्यांनी फेमस फिल्म लॅब येथे नोकरी केली. त्यांच्या मनात चित्रपट काढण्याचे खूळ होते. या संस्थेचे मालक सिराज अली हकीम यांनी त्यांच्या गोष्टी ऐकून त्यास भांडवल द्यायचे कबूल केले. त्या वर […]
एक अग्रगण्य लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि कवी म्हणून साहित्याच्या प्रांतातली प्रसिद्ध व्यक्तीमत्व म्हणजे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर तथा आरती प्रभू. त्यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई या गावी झाला.आपल्या बहारदार शब्दसंवेदनेतून मराठी मनाला भुरळ घालणार्याल मा.आरती प्रभूंच्या यांच्या वडिलांना अर्थार्जनासाठी कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी स्थलांतर करावं लागलं. सावंतवाडीत प्लेगच्या साथीमुळे त्यांना ताबडतोब तेथून ही स्थलांतर […]
साधना सरगम यांचे खरे नाव साधना घाणेकर. त्यांचा जन्म ७ मार्च १९७४ दाभोळ येथे झाला.बालपणापासून संगीताची आवड असलेल्या साधना यांच्या मातोश्री नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका होत्या. नीला यांची संगीतकार अनिल मोहिलेंसोबत ओळख होती. तर अनिल संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांच्यासाठी म्युझिक अरेंजिंगचे काम बघायचे. त्यांनीच साधना यांची कल्याणजी-आनंदजींसोबत भेट घालून दिली होती. त्यानंतर साधना सरगम यांनी १९७८ मध्ये […]
शेक्सपिअरच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांतील नायकांच्या भूमिका अजोडपणे वठवणारे गणपतराव जोशी. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८६७ रोजी रत्नागिरी, राजापूर येथे झाला. गणपतराव जोशी हे मराठी रंगभूमीवरील एक असामान्य नट. त्यांनी शाहूनगरवासी नाटक मंडळीची स्थापना १८८१ साली केली. तेव्हापासून ती मराठी रंगभूमीच्या गद्य शाखेतील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली. शेक्सपिअरच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांतील नायकांच्या भूमिका अजोडपणे वठवून गणपतरावांनी अतिशय लोकप्रियता संपादन केली. […]
डोक्यावर भरपूर वाढलेले अस्ताव्यस्त केस, शिडशिडीत अंगकाटी असलेला मकरंद देशपांडे म्हणजे अभिनयाचा बंदा रूपाया. त्यांचा जन्म ६ मार्च १९६६ रोजी रत्नागिरी येथे झाला.‘दगडी चाळ’ आणि ‘स्वदेश’, ‘सत्या’ ‘कयामत से कयामत तक’ या हिंदी सिनेमांसह अनेक मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेते मकरंद देशपांडे यांचे दिग्दर्शन हे वेगळे असते. त्याचसोबत लूक, व हेअर स्टाईल यामुळेही त्यांची एक वेगळी ओळख […]
अनुपम खेर यांचे वडील सरकारी क्लार्क होते. मा.खेर यांचे प्राथमिक शिक्षण सिमला येथील D.A.V प्रशालेत झाले. त्यांचा जन्म ७ मार्च १९५५ रोजी झाला.नंतर महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली विद्यापीठातून केले. कलेची आवड असल्यामुळे नाटक व रंगमंचाची आवड त्यांना होती. अभिनयात करियर करण्याच्या हेतूने ते मुंबईला आले. हॉलीवूड, बॉलीवूड दोन्ही आघाडय़ांवर कार्यरत राहून निर्माता, दिग्दर्शक, शिक्षक आणि अगदी लेखकाच्या भूमिकेतूनही वावरणाऱ्या अभिनेता […]