दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणार्या कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ रोजी झाला.कमलाबाई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा ‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले॰ हे पुस्तक किर्लोस्करांनी प्रकाशित केले॰ या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली॰ केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — […]
बाप्पानेच मला ही संधी दिली. आजही तोच ताकद, हिम्मत देतो आणि समाधानही! गणेश चतुर्थीला विशेष मान असतो तो उकडीच्या मोदकांचा. अकरा किंवा एकवीस मोदकांचा हा नैवेद्य देवाला दाखवायचा तर तो ताजाताजाच असायला हवा शिवाय एकाच आकाराचा, एकाच चवीचा हवा. ते काम अति कौशल्याचं. मग हे मोदक आयते हातात मिळाले तर? पुण्याच्या भारती मेढी दरवर्षी गणेश चतुर्थीला […]
साने गुरुजी यांचा `श्यामची आई’ हा चित्रपट प्रथम चित्रपटगृहात चौसष्ठ वर्षापुर्वी ६ मार्च १९५२ रोजी दाखवला गेला. साने गुरूजींच्या अजरामर `श्यामची आई’’ पुस्तकावर आधारित त्याच नावाचा व तितकाच अनमोल चित्रपट प्रदर्शित झाल्याला आज ६५ वर्षे झाली. पण या चित्रपटाची गोडी व आकर्षण आजही कायम आहे. ‘श्यामची आई’चे दिग्दर्शन व निर्मिती मा.आचार्य अत्रे यांनी केले होते. चित्रपटाच्या […]
“देवकी पंडित”….मराठी संगीत जगतातलं, सध्याचं एक आदरणीय नाव…..सारेगमप मधला त्यांचा “पण” नेहमीच अचूक असयचा…..एखाद्या गाण्याबद्दलचं त्यांचा अभ्यास अगदी वाखडण्याजोगा असतो.त्यांचा जन्म ६ मार्च १९६५ रोजी झाला. आभळमाया, वादळवाट, अवघाची संसार….आणि अश्या अनेक सीरियल्स ची टाइटल गाणी देवकीजींच्या आवाजात अगदी सुरेल आणि सुमधुर वाटतात. ह्रदयाच्या तारा छेडणाऱ्या आणि आज आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहोचलेल्या देवकी पंडित. वयाच्या […]
जलाल आगा हे सुप्रसिद्ध विनोदी नट आगा यांचे चिरंजीव. उच्च शिक्षणानंतर पुण्यातील F.T.I मध्ये शिक्षण घेतले. जलाल आगा यांनी मुगल-ए-आझम या चित्रपटातल्या बालपणातल्या जहांगीराची भूमिकेद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. जलाल आगा यांनी १९६७ साली के.ए.अब्बास यांच्या बंबई रात की बाहो में या चित्रपटा द्वारे हिरो म्हणून पदार्पण केले. त्यांचे शोले मधील गाणे मेहबुबा मेहबुबा अजुन ही लक्षात आहे. […]
“कन्नड कोकिळा” अशी गंगूबाई हनगळ यांची ओळख होती, त्यांचे वडील चिक्कूराव नाडगीर व्यवसायाने वकील होते. त्यांचा जन्म ५ मार्च १९१३ धारवाड येथे झाला.त्यांची आई अंबाबाई कर्नाटकी पद्धतीचे गाण छान गात असे. पण गंगूबाईंना मात्र उत्तर हिंदुस्थानी संगीतच जास्त आवडे. गंगुबाईंचा कल पाहून त्यांच्या आईनेही संगीत क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी म्हणून खूप मेहनत घेतली. गंगूबाईंच पाळण्यातील नाव गांधारी अस […]
सुप्रसिध्द अभिनेत्री वत्सला देशमुख यांची कन्या असलेल्या रंजना देशमुख यांनी लहानपणीच कलाक्षेत्रात पदार्पण केले. १९७०-८०च्या दशकांत अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांमधून रंजना देशमुखांनी विविधांगी भुमिका साकारल्या. व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटातून प्रमुख नायिकेची भूमिका साकारली. […]
जेष्ठ गायिका अमीरबाई कर्नाटकी बिजापूर जिल्ह्यातील बेलागी मध्ये जन्मल्या. अमीरबाई यांचे संगीत आणि नाटक प्रेमी कालाराकारांचे घराणे. अमीरबाई पंचवीस वर्षांच्या असताना त्यांसनी एच. एम. व्ही. कंपनीसाठी एक कव्वाली गायली. त्यामुळे त्यांचा तेथील कलाक्षेत्रात प्रवेश सुलभ झाला. अमीरबाई यांचा चित्रपट क्षेत्रात प्रवेश झाला तो गोहरबाईंमुळे. अमीरबाई मूक चित्रपटापासून बोलपटापर्यंत सहजपणे काम करू लागल्या. त्या वेळेला कंपनी नाटक […]
प्रांत आणि भाषेची बंधने संगीताच्या सुरेल स्वरावर ओलांडून हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड भाषिक रसिकांची लोकप्रियता मिळवणारे अशी संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे. भारतीय चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन करणाऱ्या शंकर एहसान लॉय यातील ते एक सदस्य आहेत. त्यांचे ब्रेथलेस साँग तर पुन:पुन्हा ऐकावेसे वाटते. मन उधाण वाऱ्याचे हे ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटातील गाणे शंकर […]