मनमोहन देसाई यांचे वडिल किकुभाई देसाई हे चित्रपट निर्माते व फिल्मालय या स्टुडिओचे मालक होते व बंधू सुभाष देसाई निर्माते होते.त्यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला. मनमोहन देसाई यांना बॉलीवुड मध्ये मनजी या नावाने ओळखले जायचे. मनजीनी बॉलीवूड मधील सुरवात आपले बंधू निर्माते सुभाष देसाई याच्या ‘छलिया’ या चित्रपटापासून केली. मनमोहन देसाई यांनी २० चित्रपट बनवले त्यातील १३ […]
बॉलिवूडमध्ये दिग्गज तारकांना घेऊन चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांची कमी नाही. दिग्दर्शक प्रकाश झा यांनी शबाना आजमी आणि दीप्ती नवल पासून या काळातील काजोल, माधुरी दीक्षित, करिना कपूर, बिपाशा बसू, दीपिका पदुकोण, कॅटरिना कैफ आणि प्रियंका चोपडा अश सर्व स्टार नायिकांसोबत चित्रपट बनविले आहेत. दिग्दर्शक म्हणून प्रकाश झा यांचा पहिला चित्रपट ‘दामुल’ होता. यात दीप्ती नवलने मुख्य भूमिका […]
दिव्या भारती हे चित्रपटसृष्टीला पडलेलं एक स्वप्न होतं असं म्हटलं तर अतिशोयक्ती वाटू नये. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला.कारण वयाच्या अवघ्य़ा १९ वर्षीच तिनं सर्वांची मनं जिंकली होती. विश्वात्मा हा हिंदीतला तिचा पहिला सिनेमा. राजीव राय यांनी तिला या चित्रपटातून हिंदीत ब्रेक दिला. यातलं “सात समंदर पार तेरे ” या दिव्यावर चित्रित केलेल्या गाण्यानं तर धमालच केली […]
बीटल्स या प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या बँडच्या चार आधारस्तंभांपैकी एक म्हणून जॉर्ज हॅरिसन यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवली. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४३ रोजी झाला.जॉन लेनन, पॉल मॅकर्टनी, जॉर्ज हॅरिसन आणि रिंगो स्टार या चौघांनी ‘बीटल्स’ या नावानं जे काही सर्वसाधारणपणे केलं, ते मात्र यापेक्षा पुष्कळच सौम्य, मध्यममार्गी बहुसंख्य श्रोत्यांना रुचेल असं होतं. त्यामुळेच ते गाजले. आजही ‘बीटल्स’चे चाहते जगभर पसरलेले […]
आज २७ फेब्रुवारी. `अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला’, असे स्पष्टपणे सांगणारी अजरामर कविता लिहिणाऱ्या कविवर्य मा.कुसुमाग्रजांची जयंती. वि.वा.शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन करत. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्नव असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते […]
नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्य त्यांच्याबद्द्लच्या जागवलेल्या आठवणी. आयुष्यभर अभिनयकलेची व्रतस्थपणे सेवा करून त्या कलेचे अनेकांना दान करून कलाकारांची ललाटरेखा कालातीत बनविणारे मराठी रंगभूमी व रुपेरी पडद्यावरील नायक,खलनायक,चरित्र नायक आणि दिग्दर्शक नटश्रेष्ठ जयशंकर दानवे हे असंच एक अनोखं व्यक्तिमत्व…….. कोल्हापूर-कलानगरी, मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर,पंचगंगेचा अवखळपणा आणि सह्याद्रीचा कणखरपणा असा विलोभनीय संगम असलेल्या या नगरीने महाराष्ट्रालाच […]
एक उत्तम अभिनेत्री म्हणून भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांना रिमा यांचं नाव सुपरिचित आहे. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.त्यांचं नाव घेताच डोळ्यांपुढे त्यांचा हसरा, गोल चेहरा, घारे डोळे आणि त्यांची अभिनयाची मोठी कारकीर्द तरळून जाते. हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ […]
भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचा माजी विद्यार्थी असलेल्या संजय भन्साळी यांनी विधू विनोद चोप्राचा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटांमध्ये भाग घेतला. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९६३ रोजी झाला.१९९६ साली त्यांनी स्वत: प्रमुख दिग्दर्शक बनून खामोशी ह्या चित्रपटाची निर्मिती केली. तेव्हापासून त्यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. आज बॉलीवूडमध्ये संजय […]
आत्ता पर्यत तब्बल ६५० चित्रपटांसाठी हजारोंच्या संख्येने गीतांचे लेखन करणारा आणि तरीही अंतरंगात कुठे तरी कातर, हळव्या मनाचा कवी अशीच गीतकार समीर अंजान पाण्डेय ऊर्फ शीतल पांडे” उर्फ मा.समीर यांची ओळख. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.ज्येष्ठ गीतकार मा.अंजान हे समीर यांचे वडील. इंडस्ट्रीचा बेभरवशीपणा अनुभवला असल्याने मा.अंजान यांनी मा.समीर यांच्या गीतकार होण्याला विरोध केला. पण समीर यांचा […]
लव्ह इन टोकियो’, “शागीर्द’, “लव्ह इन सिमला’, “जिद्दी’, “एक मुसाफिर एक हसीना’ अशा गाजलेल्या चित्रपटांनी रसिकप्रिय झालेले जॉय मुखर्जी यांचे वडील शशधर मुखर्जी हिंदी चित्रपटनिर्माते होते; अंधेरीतील फिल्मालय स्टुडिओ त्यांच्या मालकीचा होता. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९३९ रोजी झाला.”लव्ह इन सिमला’ हा जॉय मुखर्जी यांचा पहिला चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटातील “रोमॅंटिक’ नायकाच्या भूमिकेमुळे ते प्रसिद्ध झाले. पुढे त्यांच्या वडिलांनी […]