मराठी अभिनेता प्रसाद ओक यांचे शालेय शिक्षण भावे स्कूल, व बीएमसीसी पुणे येथे झाले. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमासारखाच एक कार्यक्रम पुण्यात चारुदत्त आफळे सादर करायचे. यात चंद्रशेखर महामुनी गायक होते. त्यांच्या टीमसोबत प्रसाद ओक कोरस म्हणून गात असत. प्रसाद ओक यांनी करिअरची सुरुवात नाटकांपासून केली होती. रणांगण, भ्रमाचा भोपळा या नाटकांमधून प्रसाद ओक यांनी आपल्या अभिनयाची […]
पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे वडील कृष्णराव कोल्हापुरे हे नामांकित गायक आणि पट्टीचे बीनवादक होते. त्यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९३० रोजी पंढरपूर येथे झाला. ते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासमवेत बलवंत संगीत मंडळी या नाटक कंपनीचे भागीदार होते. वडिलांकडून प्राथमिक पाठ गिरवल्यावर, पंढरीनाथांनी मधुसूदन जोशी आणि खां साहेब अता हुसेन या आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायकांकडून तालीम घेतली. बडोद्यातल्या ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये […]
निवृत्तीबुवा सरनाईक जयपूर-अत्रौली घराण्याचे मराठी गायक होते. त्यांचा जन्म ४ जुलै १९१२ रोजी झाला. निवृत्तीबुवांनी संगीताचे प्रारंभिक शिक्षण गोविंद विठ्ठल भावे व आपले काका शंकरराव सरनाईक यांचेकडून घेतले. त्यानंतरचे सांगीतिक शिक्षण त्यांनी रजब अली खान व सवाई गंधर्व यांचेकडे घेतले. त्यांच्या गायकीवर सर्वाधिक प्रभाव त्यांचे संगीत गुरू व जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक अल्लादिया खान साहेब यांचा होता. […]
पंडित सुरेशबाबू माने ऊर्फ अब्दुल रहमान यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी रोजी झाला. ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व ताराबाईंना गाणे शिकवत होते. दोघांचे प्रेम जुळले व […]
मिर्ज़ा असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ “ग़ालिब” हे एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी झाला. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे […]
रणधीर कपूर यांची एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध अभिनेता व करीश्मा व करीना कपूर यांचे वडील व राजकपुर यांचा मुलगा अशी ओळख आहे. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४७ रोजी झाला. रणधीर कपूर यांना चित्रपट क्षेत्र हे वारसाने मिळाले आहे. त्यांचे वडील राज कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. तर रणधीर कपूर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात ‘श्री ४२०’ चित्रपटात बालकलाकार […]
आशुतोष गोवारीकर यांनी उमेदवारीच्या काळात सी.आय.डी.मालिकेतून शिवाजी साटम यांच्या साहाय्यकाचे काम केले. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. अमोल पालेकरच्या ‘कच्ची धूप’ या मालिकेतून आशुतोष अभिनेता म्हणून लोकांना प्रथम दिसले. पुढे तो ‘होली’, ‘गूँज’, ‘कभी हां कभी ना’, ‘सलीम लंगडे पे मत रो’ सारख्या सिनेमांत काम केले. पण त्यांना अभिनय-कारकिर्दीत घट्ट मुळे रोवता आली नाहीत. मग दिग्दर्शन […]
मधुबाला म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले स्वप्न. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला. भारतीय सौंदर्याचा प्रवास मधुबाला यांच्याजवळ येऊन थांबतो. अत्यंत सुंदर रूप घेऊन जन्माला आलेल्या मधुबाला यांची कारकीर्द मात्र शापित ठरली. आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला यांचे खरे नाव मुमताज जहान बेगम दहलवी. लहानपणी बेबी मुमताज म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या. बाबुराव […]
‘दम मारो दम’, ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ अशा सदाबहार गीतांमध्ये महत्त्वाचे योगदान देणारे, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ संगीत संयोजक केरसी लॉर्ड यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३५ रोजी झाला. केरसी लॉर्ड. हिंदी चित्रपटसंगीताला सदाबहार सुरांचे चैतन्य बहाल करून अजरामर करणारे एक मनस्वी व्यक्तिमत्त्व. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तालवादक मा. कॉवस लॉर्ड हे मा.केरसी लॉर्ड यांचे वडील. “कावस […]
ज्येष्ठ संगीतज्ञ, वादक, म्युझिक अॅtरेंजर केरसी लॉर्ड यांच्यासमवेत अनेक चित्रपटांत संतूरची साथ करणाऱ्या पं. उल्हास बापट यांनी सांगितलेल्या केरसी लॉर्ड यांच्या आठवणी. भारतीय सिनेसंगीत क्षेत्रासाठी रविवार.. १६ ऑक्टोबरची सकाळ झाली; पण उजाडले नाही. कारण या दिवशी ज्येष्ठ संगीतज्ञ, वादक, अॅलरेंजर आणि जगन्मित्र केरसी लॉर्ड यांचे निधन झाले. त्यांना सांगीतिक विद्वत्तेचा ‘सूर्य’ म्हणू या, की प्रत्येक कामात […]