भारती आचरेकर या मणिक वर्मा यांच्या जेष्ठ कन्या. त्यांचे पूर्ण नाव सौ.भारती विजय आचरेकर. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९६० रोजी झाला. भारती आचरेकर यांचे लहानपण पुण्यात गेले. भारती आचरेकर यांना भावना प्रधान भूमिका करून प्रेक्षकांना रडवण्यापेक्षा दणदणीत संघर्षमय आणि विनोदी भूमिका करायला आवडते. मणिक वर्मा यांना त्यांनी अनेक कार्यक्रमांतून साथ केली. वयाच्या १० व्या वर्षी जेव्हा […]
विजय कोपरकर संगीतातील नावाजलेले व अवघ्या महाराष्ट्राला माहिती असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९६२ रोजी झाला. वडील कीर्तनकार असल्यामुळे,विजय कोपरकर यांच्यावर लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाले. वयाच्या आठव्या वर्षापासून गायनाला सुरुवात करून सुरवातीला मधुसूदन पटवर्धन त्यानंतर सुमारे पाच वर्षे डॉ. वसंतराव देशपांडे आणि मग पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे सात वर्षे त्यांनी गायनाचे शिक्षण घेतलं.विजय कोपरकर एका मुलाखतीत […]
अमीर खॉं यांचा महाराष्ट्रातील अकोला गावी जन्म झाला असला तरी त्यांचे बालपण मध्यप्रदेशात, इंदोरमधेच गेले. उण्यापुर्याव साठ वर्षाच्या आयुष्यातील चाळीस वर्षे त्यांनी शास्त्रीय संगीतात घालवली आणि एका गायकीला जन्म दिला. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१२ रोजी झाला. त्या घराण्याचे नाव झाले “इंदोर घराणे“. अमीर अलीचे पूर्वज हरियानातील कालनौर नावाच्या गावचे. ते तेथून इंदोरला येऊन स्थायिक झाले होते. साहजिकच अमीरअलीचे […]
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आँवला गावात जन्मलेल्या अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार यांच्या कुटुंबात लष्करी सेवेची परंपरा होती. त्यांचा जन्म १६ जून १९३६ रोजी झाला. अशा वातावरणात शहरयार यांना शायरीची गोडी कशी लागली याचे अनेकांना आश्चर्य वाटते. त्यांचे शिक्षण बुलंदशहर आणि अलीगड मुस्लीम विद्यापीठात झाले. अंजुमन तरक्की ए उर्दू या संस्थेत त्यांनी कारकीर्द सुरु केली. त्यानंतर ते अलिगड […]
आपल्या कसदार अभिनयाने रसिकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९२० रोजी झाला. प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ हे खऱ्या अर्थाने बॉलिवूडचा प्राण होते. दमदार आवाज आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी एकेकाळी बॉलिवूड गाजवले. खलनायक म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. कामामुळे वडिलांची सतत बदली होत असल्याने मा.प्राण यांचे शिक्षण कपूरथळा, उन्नाव, मेरठ, डेहराडून आणि रामपूर या […]
कमल अमरोही यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून, महल, पाकीज़ा, रज़िया सुलतान असे भव्य कलात्मक चित्रपट स्क्रीनवर दिले. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९१८ रोजी झाला.कमल अमरोही हे सर्वोत्तम गीतकार, पटकथालेखक आणि संवाद लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी भारतीय चित्रपटसुर्ष्टीत खूप मोठे योगदान दिले आहे. कमाल अमरोही व मीनाकुमारीचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अशीच एक दंतकथा. आणि त्यातील सारी गाणीही. खरंतर एका पातळीवर […]
एक चित्रपट १४ वर्षे! पाकिजा प्रदर्शित झाला १९७२ साली, पण खरंतर त्याची सुरुवात झाली १९५८ मध्ये. पाकिजा बनायला १४ वर्षांचा वेळ लागण्याचे मुख्य कारण होते ते दिग्दर्शक कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी असलेली पाकिजाची नायिका मीनाकुमारी यांच्यातील तणाव आणि नंतर तलाक. खरंतर हा चित्रपट पूर्णच झाला नसता, पण सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर अखेर दोघे […]
अलाहाबाद विद्यापीठात अध्यापनशास्त्र आणि इंग्रजी मध्ये एम.ए केले. १९५३ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी आकाशवाणीत नोकरी सुरु केली. त्यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९१३ रोजी उत्तर प्रदेशतील जहागीरपूर येथे झाला.१९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा ’ऑल इंडिया रेडिओ’ नावाचा स्वतंत्र विभाग माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आला. ’ऑल इंडिया रेडिओ’चे अधिकृतरीत्या ’आकाशवाणी’ हे नाव १९५७ साली […]
बिहारमध्ये आलेल्या भयानक पुराने असंख्य नागरिकांचे जीवन उध्वस्त झाल्यामुळे व्यथित झालेल्या एका मुलीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा ध्यास घेतला. स्वतःच पुढाकार घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी म्हणून एका संगीत मैफलीचे आयोजन केले. या संगीत मैफलीत येण्याचे अनेक मान्यवर गायक तसेच वादकांनी मान्य केले होते. मात्र ऐनवेळी त्यांच्यापैकी कोणीच फिरकले नाही. मात्र ही मुलगी मुळीच विचलित […]
त्यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. मुंबईच्या १९ व्या शतकातील इतिहासाचे प्रणेते म्हणून मा. नाना शंकरशेट यांना ओळखले जाते. जगन्नाथ शंकरशेट यांचे खरे नाव नाना मुरकुटे. मुरकुटे कुटुंब हे मुळातच सधन. नानांचे एक पूर्वज बाबूलशेट हे कोकणातून १८ व्या शतकात मुंबईत आले. म्हैसूरच्या १७९९ च्या टिपू-इंग्रज युद्धात वडिलांना खूप पैसा मिळाला. आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली. नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे […]