शूर आम्ही सरदार, हे खेळ नशिबाचे, आधार, वैभव लक्ष्मी, सून लाडकी सासरची, सासर माझे मंदिर यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच चंचल, वक्त से पहेले, हो सकता है यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये मिलिंद गवळी झळकले आहेत. मिलिंद आणि अलका कुबल यांनी तर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. […]
देशविदेशातल्या प्राच्यविद्येतल्या संशोधन करणाऱ्या अनेक विद्वानांशी त्यांचे मैत्रीपूर्ण, जिव्हाळ्याचे संबंध आहेत. देशोदेशातल्या हस्तलिखितांचा शोध घेणं, त्यांचे जतन आणि संवर्धन करणं तसेच त्यातील ज्ञान विशेषतः भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी त्या त्याअभ्यासकांना माहिती पुरवणं, त्यांची वेगवेगळ्या प्रकारे ओळख करून देणं अशी अनेक कामे ते अत्यंत दृढ सेवाभावाने करत आहेत. […]
‘देवमाणूस’, ‘बैजू’, ‘अशी बायको हवी’, ‘वऱ्हाडी माणसे’, ‘संगीत सौभद्र’, ‘मानापमान’, ‘एकच प्याला’, ‘ब्रह्मचारी’, ‘लग्नाची बेडी’, ‘संशयकल्लोळ’, ‘सुवर्णतुला’, ‘मैलाचा दगड’ ‘भावबंध’सारख्या संगीत नाटकांमधून त्यांनी विविध भूमिका केल्या. ‘देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर’ हा ‘प्रीतिसंगम’ नाटकातील त्यांनी गायलेला अभंग अजरामर ठरला. […]
डॉ. प्रभाकर माचवे यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अमेरिकेतील अनेक विद्यापीठांत त्यांनी भारतीय साहित्य, धर्म आणि संस्कृती, तत्वज्ञान, गांधीवाद शिकवले. त्यांना जर्मनी, रशिया, श्रीलंका, मॉरिशस, जपान आणि थायलंड इत्यादी देशांच्या व्याख्यानमालेसाठी आमंत्रित केले गेले होते. […]
आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, “देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय यात शंका नाही.“ […]
कादंबऱ्या न वाचलेला रसिक मराठी वाचक दुर्मीळच! वनवास, शारदा संगीत, पंखा आणि झुंबर या चार कादंबऱ्यांमधून लंपन आणि त्याची मैत्रीण सुमी, इतर मित्रमंडळी, लंपनच्या मनातली सुमीविषयीची हुरहुर, प्रेम हे सर्व संतांनी तपशीलवार, पण सुंदर प्रकारे रेखाटलंय आणि या चारही कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात एक वेगळंच स्थान राखून आहेत. […]
आपल्या करीयर मध्ये त्यांनी ११० हून अधिक चित्रपटात अभिनय केला. १९९८ साली आलेल्या ‘रामायण’मालिकेत चंद्रशेखर यांनी आर्य सुमंत यांची व्यक्तिरेखा साकारली होती. चंद्रशेखर व रामानंद सागर चांगले मित्र होते. त्यांच्या आग्रहाखातर चंद्रशेखर यांनी आर्य सुमंतची भूमिका स्वीकारली होती. […]
माई मंगेशकर या मूळच्या धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावच्या होत. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची अपत्ये होय. […]
शुभांगी यांनी रेडिओ स्टेशन वर तसेच टेलिव्हिजन वाहिन्यांसाठीही काम केले आहे. गेल्या त्या काही वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अशोक पत्कीची संगीत कार्यशाळा घेत असतात. शिवाय शुभांगी यांनी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली काही नवीन गाणीही गायली आहेत. […]
पं.यशवंत महाले नावाचं चैतन्यानं सळसळणारं झाड लखनौच्या विद्यानगरीत संपन्न झालं. १९७४ साली अण्णासाहेबांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ गुरुबंधू पं. गिंडे यांचीही खास तालीम त्यांना मिळाली. गिंडे आणि पं.यशवंत महाले यांना अण्णासाहेबांच्या हृदयात मानसपुत्राचं स्थान होतं. अण्णासाहेब आणि नातू यांच्याकडून महालेंनी बंदिशी रचण्याची प्रेरणा घेतली. सुजनदास या टोपण नावानं त्यांनी विविध भावरंग चित्रित करणाऱ्या १४० बंदिशी बांधल्या. […]