स्पष्ट शब्दोच्चार,खर्जातील घनगंभीर स्वर,आणि भावपूर्ण गायन ही रवींद्र साठे यांची खासीयत. त्यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९५१ रोजी झाला. रविंन्द्र साठे यांचे श्री. मुकुंदराव गोखले यांच्याकडे रीतसर शास्त्रीय गायनाचे शिक्षण झाले.बालकलाकार म्हणून त्यांचे कार्यक्रम होऊ लागले.पण महाविद्यालयात गेल्यावर त्यांच्या या शिक्षणात खंड पडला.त्याच वेळी सुगम संगीत स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले.आणि ते पुन्हा गाण्याकडे वळले.पंडित नागेश खलीकर यांच्याकडे त्यांची गानसाधना सुरु […]
कोकणातील एका छोट्या खेड्यात जन्म घेतलेल्या एका युवकाने पुण्यात येऊन स्त्री शिक्षणाचे जे महान कार्य केले ते सगळ्यांनाच आदर्शवत ठरावे असेच होते. धोंडे केशव कर्वे हे त्या तरुणाचे नाव. ज्या काळात स्त्री शिक्षण, विधवा विवाह यांसारख्या गोष्टींना समाजातून तीव्र विरोध होता, अशा काळात धोंडो केशव कर्वे यांनी एक व्रत म्हणून समाजसेवेचे हे कार्य आरंभिले. शारीरिक कष्टाची […]
स्वतंत्र भारताचे दुसरे नौदलप्रमुख. वयाच्या अठराव्या वर्षी सोमण यांची रॉयल इंडियन मरिनसाठी निवड झाली आणि त्यांना प्रशिक्षणासाठी ग्रेट ब्रिटनला पाठविण्यात आले. अडीच वर्षांच्या प्रशिक्षणानंतर ऑगस्ट १९३४ ला सब लेफ्टनंट म्हणून ते तत्कालीन भारतीय नौदलात प्रविष्ट झाले. १९३९-४० दरम्यान दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते फर्स्ट लेफ्टनंट होते. तांबडा समुद्र व इराणचे आखात यांमध्ये हिज मॅजेस्टिज इंडियन शिप (एच्. […]
१९०३ साली पदार्थविज्ञानशास्त्रात, तर १९११ साली रसायनशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळविणारी मादाम मेरी एरी हिने आपले सारे आयुष्यच संशोधनासाठी पणाला लावले होते. पोलंडमध्ये एका निर्धन परिवारात तिचा जन्म झाला होता. मेरीचे वडील पदार्थ विज्ञानशास्त्राचेच अध्यापक होते व त्यांनी आपल्या घरीच एक प्रयोगशाळा उघडली होती. मेरीची आजारी आई तिच्या लहानपणीच गेली होती. त्यामुळे मेरी सर्व घरकाम सांभाळून वडिलांना […]
८५ वर्षापूर्वी आज पहिला मराठी बोलपट दाखविला गेला. ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रभात फिल्म कंपनी चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या […]
‘थिएटर अॅककॅडमी’ सारख्या संस्थेची नाटकं आणि काही चित्रपट-टीव्ही मालिकांत छोटया भूमिकांत दिसणारे परेश मोकाशी ‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’ या नाटकामुळे ख-या अर्थाने प्रकाशात आले ते लेखक- दिग्दर्शक म्हणून. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९६९ रोजी झाला. परेश मोकाशी यांचे गाव रायगडमधलं चौक. पणजोबा पोस्टमास्टर होते. जन्म पुण्याचा असला तरी सगळं शिक्षण लोणावळ्याच्या पुरंदरे हायस्कूलमध्ये झालं. परेश मोकाशी यांचे वडील पत्रकार होते. पुण्यात […]
कवी प्रदीप यांचे खरे नाव रामचंद्र द्विवेदीं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बाँबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९१५ रोजी बडनगर (उज्जैन ) येथे झाला. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या […]
गंगाधर महांबरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवण येथील टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९३१ रोजी झाला. पुढे ते पुण्यास राहू लागले. ‘पश्चिमा’ पुणे नियतकालिकाचे कार्यकारी संपादक झाले. मालवणच्या ‘बालसन्मित्र’ या पारुजी नारायण मिसाळ यांच्या पाक्षिकात त्यांच्या बालकथा, कविता आणि अन्य लेख प्रसिद्ध व्हायचे. पुढे ही लेखनाची आवड वाढत गेली. त्यांनी पुण्याला गेल्यावर वृत्तपत्रव्यवसायास सुरुवात केली. पुढे […]
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काही गाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिती झिंटा. प्रिती झिंटाचा जन्म ३१ जानेवारी १९७५ रोजी झाला.‘डिंपल गर्ल’ आणि ‘बबली गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रिती झिंटा हिने दमदार अभिनय आणि परफॉर्मन्सच्या आधारावर अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या गालावरच्या खळीचे तर लाखो दिवाने आहेत. १९९८ मध्ये मनी रत्नम यांच्या ‘दिल से’ चित्रपटातून अभिनेत्री प्रिती झिंटा हिने बॉलिवूडमध्ये डेब्यू […]
पंडीत भीमसेन जोशी यांच्याबद्दल अनेकांनी आठवणी सांगितल्या आहेत. त्यातील काही….. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती मा.डॉ. अब्दुल कलाम यांना संशोधनाच्या क्षेत्रातील अडचणीच्या प्रसंगातून भीमसेन जोशी यांचे संगीत ऐकल्यानंतर मार्ग मिळायचा. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांना ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ अशा एकापेक्षा सरस अभंगवाणीने बळ देण्याचे काम त्यांनी केले. हे स्व:ता डॉ. कलाम यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. गौतम राजाध्यक्ष मी पुण्याला चाललो होतो. […]