नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

पं. भीमसेन जोशी – थोडक्यात जीवनप्रवास

भीमसेन जोशी म्हणजे ‘गायनाचं विद्यापीठ होते. भीमसेन म्हणजे कांही लेखक किंवा भाष्यकार नव्हे, पण भीमसेनी गाणं म्हणजे शंभर टक्के स्वच्छ “शास्त्र” आणि ते ही यमा-नियमांचा नुसता रवंथ नव्हे तर, शास्त्राच्या चौकटीला धरून भला मोठ्ठा महाल उभा केल्यासारखं! अनेक रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओ यांच्या स्वरूपात भीमसेन सतत आपल्यासोबत राहणार आहेतच. जशी पंडितजीच्या आवाजाची चव नेहमीच मनात रेंगाळते तशीच […]

हिंदी सिनेसृष्टीतील जेष्ठ कलाकार वहिदा रेहमान

गाईड, प्यासा, चौदहवीं का चाँद, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम, तीसरी कसम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी वहिदा रेहमान यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३६ रोजी तामिळनाडूतील चेंगलपेट येथे झाला. वहिदा रेहमान यांना डॉक्टर बनण्याची इच्छा होती. मात्र नशीबाने त्या बॉलिवूडमध्ये आल्या. वहीदा रहमान यांनी आपल्या बहिणीसोबत भरतनाट्यमचे धडे गुरु त्रीचुंबर मिनाक्षी सुंदरम पिल्लई आणि मुंबई […]

प्रसिध्द अभिनेत्री दिप्ती नवल

दीप्ती नवल उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेतच,परंतु त्या कुशल कवीयत्री,चित्रकार आणि छायाचित्रकारसुध्दा आहेत. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५१ रोजी झाला.या व्यतिरिक्त त्यांना संगीताची सुध्दा आवड आहे आणि त्या स्वत:काही वाद्य वाजवतात,हे विशेष.त्यांच्या प्रकाशित पुस्तकांमध्ये’लम्हा-लम्हा’हे पुस्तक प्रसिध्द आहे. ५० वर्षांचे फिल्मी करिअर पूर्ण कराणा-या दीप्ती नवल यांनी’एक बार फिर’,’हम पांच’,’चश्मे बहाद्दूर’,’अंगूर’,’मिर्च मसाला’आणि’लीला’सारख्या काही सिनेमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला आहे.तसे पाहता,दीप्ती नवल त्यांच्या’चश्मे […]

जगणं विसरू नकोस….

प्रा. गुरुराज गणेश गर्दे यांची संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेली आणि प्रत्येक महिलेचा आत्मविश्वास वाढविणारी, स्वाभिमान उंचावणारी कविता…. त्यांच्याच “चांदणझुला” मधून एक नवी कोरी कविता…… “जगणं विसरू नकोस….” “सखे,” जगाकडे रोज नव्याने.. बघणं विसरू नकोस…. सखे तू मुक्तपणे तुझं.. जगणं विसरू नकोस…. तुला निराश करणारे अनेक क्षण येतील… पाय घालून पाडणारे अनेक जण येतील… त्यांना घाबरून तुझं […]

`ज्ञानकोशकार’ डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर

`ज्ञानकोशकार’ म्हणून डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या नावामागे उपाधी लागली असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पांडित्य आणि विक्षिप्तपणा यांचे अजब मिश्रण होते. श्रीधर व्यंकटेश केतकर हे एक लेखक, समाजशास्त्रज्ञ व विचारवंत म्हणून जेवढे ज्ञात आहेत, त्यापेक्षा ‘ज्ञानकोशकार केतकर’ म्हणून अधिक सुपरिचित आहेत. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १८८४ रोजी झाला.समाजप्रबोधनासाठी जीवनभर अत्यंत निर्धारपूर्वक झटलेले व ‘भारतीय जातिसंस्थेचा इतिहास’ या आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण […]

दिग्दर्शक आणि निर्माते ताहिर हुसेन व अमीर खान

जिद्दीच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:च्या कर्तृत्वाचा खोल ठसा उमटवलेल्या दिग्दर्शक आणि निर्माते ताहिर हुसेन यांचे घराणे मुळचे अफगाणिस्तानातले, पश्तुन वंशाचे. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याशी हुसेन यांच्या घराण्याचे संबंध होते. महाविद्यालयात शिक्षण घेतानाच, त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करायचा निर्णय घेतला होता. प्रारंभी मुंबईतल्या स्टुडिओत संवाद लेखक, सहदिग्दर्शक आणि अन्य कामे करीत करीत हुसेन यांनी चित्रपट निर्मितीचे […]

दर्जेदार काव्य रचना करणारे कविवर्य राजा बढे

कळीदार कपूरी पान’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशा दर्जेदार काव्य रचना करणारे कविवर्य राजा बढे राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. मा.राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी… त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे मा. […]

मराठीतील कवी, व ध्येयवादी नाटककार सदाशिव अनंत शुक्ल तथा कुमुदबांधव

सदाशिव अनंत शुक्ल यांनी कविता-नाटकांशिवाय लघुकथा, चित्रपटकथा, गाणी आणि लहान मुलांसाठी विविध प्रकारचे लेखन केले आहे. केवळ लेखनावर उपजीविका करणार्यात महाराष्ट्रातील मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते. त्यांचा जन्म २६ मे १९०२ रोजी झाला. स.अ. शुक्ल यांनी कुमुदबांधव या टोपणनावानेही काही कविता केल्या आहेत. गीतकार म्हणूनही त्यांना लौकिक मिळाला. त्यांच्या अनेक गीतांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटकथा भक्तिरसाने भरलेल्या […]

संगीतकार सरदार मलिक

संगीत विश्वात सरदार मलिक यांना ‘सुरांचा सरदार’ म्हणून ओळखलं जात असे. हिंदी सिनेसृष्टी मध्ये भरीव काम करुन सुध्दा पहिल्या पाच मध्ये नाव न मिळवु शकलेला एक संगीतकार म्हणजे सरदार मलिक. सरदार मलिक उत्तर प्रदेशमधील अल्मोडा गावचे. आयुष्यभर सर्वधर्मसमभावाचा त्यांनी पुरस्कार केला. त्यासाठी ‘सरदार’ नाव धारण केलं. ते स्वत: सरदार, पत्नी बिल्किस तर मुलं अन्नू, अबू आणि […]

हिंदी अभिनेत्री-गायिका सुरैय्या

पाकिस्तान लाहोर इथे जन्मलेल्या सुरैय्याने शास्त्रिय संगिताचे धडे घेतले नव्हते तरिही तिच्या कारकिर्दित तिने गायलेल्या अनेक गाण्यांनी खळबळ माजवली होती. त्यांचा जन्म १५ जुन १९२९ रोजी झाला. लहानपणी शाळेच्या सुट्टीत सुरैय्या अनेक गाण्यांच्या कार्यक्रमात भाग घेत असे. अशाच एका सुट्टीत ती आपले मामा (एम. हुजूर) यांच्याबरोबर सुभाष स्टुडिओ मध्ये शुटिंग पहायला गेली होती. एम. हुजूर हे चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्याचे […]

1 350 351 352 353 354 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..