पंडित व्ही जी जोग म्हणून ओळखले गेलेले पंडित विष्णू गोविंद जोग यांनी व्हायोलिन चे प्रारंभिक प्रशिक्षण एस सी आठवले आणि गणपतराव पुरोहित यांच्याकडे घेतले. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९२१ रोजी झाला. त्यानंतर सुप्रसिद्ध बाबा अल्लाउद्दीन खान, प्रख्यात संगीतकार विश्वेश्वर शास्त्री हे त्याचे गुरु होते. पंडित व्ही जी जोग हे व्हायोलिन या वाद्याला हिंदुस्तानी संगीतात मानाचे स्थान देणारे प्रथम व्यक्ती […]
आपण नेहमी ऐकतो ती गाणी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, ते नयन बोलले, पाहुनी पाहुनी रघुनंदन सावळा, लाजली सीता स्वयंवराला ही सर्व रमेश अणावकर यांनी लिहली आहेत. सुरेल व अवीट गाणी देणारे रमेश अणावकर ह्यांची गाणी लताजी, आशाजी, अशा अनेक गायक, गायकानी गायली, व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहचली. आपण लहान पणापासून ऐकत असलेले हिरव्या हिरव्या […]
महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’सारख्या नाटकांचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश आळेकर हे भारतीय रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाव! त्यांचा जन्म ३० जानेवारी १९४९ रोजी झाला. आळेकरांचे नाव नाटककार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्या जोडीने घेतले जाते. आळेकरांचा जन्म दिल्लीत झाला. त्यांची आई म्हणजे न.वि. गाडगीळ यांची कन्या. मा.आळेकरांचे शिक्षण पुण्यात झाले. त्याचे मामा काकासाहेब गाडगीळ. शाळकरी वयात शांतता! कोर्ट […]
गोविंदराव पटवर्धन बोटात विलक्षण जादू असलेला कलाकार! त्यांचा जन्म २१ सप्टेबर १९२३ रोजी झाला. हार्मोनियमवर ज्या सफाईने त्यांची बोटं फिरत, त्यात ते स्वरालयीची जी कामगत करत ते केवळ दैवी म्हणावं लागेल. जन्मताच सूर,ताल व लय यांची निसर्गदत्त देणगी लाभलेले मा.गोविंदराव यांनी आपल्या मुंजीत हार्मोनियम वाजवून आपल्या सुप्त गुणाची चुणूक दाखवली होती. आपल्या वयाच्या १४ व्या वर्षी संगीत वेणुनाद या […]
स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे, सुमधुर आवाजाची देणगी लाभलेले, ‘जसरंगी जुगलबंदी’ या अनोख्या गायन प्रकाराचं भारतीय संगीतसृष्टीला योगदान देणारे आणि आपल्या गायनाद्वारे रसिकांना ‘ईश्वरानुभूती’ देणारे तपस्वी गायक, तसंच देश-विदेशातल्या अनेक विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देऊन संगीतसंपन्न वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे ‘गानगुरू’ म्हणजे पंडित जसराज. जसराज यांचे वडील मोतीराम हे सुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते. पंडित जसराज यांचा यांचा […]
दामू-गोविंदा जोड रे… राम राम मंडळी, १९९०/९१ चा सुमार असेल. मी तेव्हा मुंबईतल्या प्रभादेवी येथे एके ठिकाणी नोकरी करत होतो. शनिवारचा दिवस. संध्याकाळी कार्यालय सुटल्यावर दादरच्या फलाटावर ठाण्याच्या गाडीची वाट पहात उभा होतो. बघतो तर काय, माझ्या बाजुला गोविंदराव उभे. तेही गाडीची वाट पहात होते. मंडळी गोविंदराव म्हणजे, नामवंत संवादिनीवादक पं गोविंदराव पटवर्धन. त्यांच्या अनेक मैफलीतला […]
संगीतकार खेमचंद प्रकाश यांच्या जन्मतिथीच्या निमित्ताने खेमचंद प्रकाश यांचे magnum opus “आएगा आनेवाला” *1940 च्या दशकातील सुपरस्टार अशोककुमार एकदा लोणावळ्याला आपल्या मित्राच्या बंगल्यावर रहायला गेले होते . तिथे त्यांना प्रत्येक रात्री काही विचीत्र भास झाले . त्यांनी हे भुताटकीचे आपले अनुभव आपल्या मुंबईतील मित्रांना सांगितले व त्यावरून कमाल अमरोही यांनी “महल” चित्रपट लिहीला. * त्यातलं “आएगा आनेवाला” हे […]
१९४० साली कर्नाटकातून देवेंद्र मुर्डेश्वर हे तबला शिकण्यासाठी मुंबईत आले. पण त्यांचे प्रेम बासरी वर होते. त्या मुळे त्यांनी बासरी शिकण्यास सुरवात केली. मा.पन्नालाल घोष हे त्यांचे गुरु, पन्नालाल घोष यांच्या मुलीशी देवेन्द्र मुर्डेश्वर यांचा विवाह झाला होता. पन्नालाल घोष यांच्या निधनानंतर मा.देवेंद्र मुर्डेश्वर यांनी मा. पन्नालाल यांचे बासरी वादन पुढे नेले.पन्नासच्या दशकात पं. रवी शंकर […]
सुमन कल्याणपुर नुसते नाव जरी उच्चारले तरी निर्मळ शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आठवतो. त्यांचा २८ जानेवारी १९३८ रोजी झाला. त्यांची गाणी जितकी प्रसिद्ध झाली तितक्याच त्या प्रसिद्धिपासुन अलिप्त राहिल्या. सुमन हेमाडी हे नाव लग्नाआधीचे. रामानंद कल्याणपुर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपुर या नावाने सर्व परिचित झाल्या. मराठी भाव तसेच सिनेसंगीतात सुमन कल्याणपूर या गायिकेचे […]
सुप्रसिद्ध निवेदक, लेखक सुधीर गाडगीळ यांची खासियत म्हणजे नवनव्या चवी शोधणं, मनापासून खाणं आणि खाण्यावर बोलणं. त्यांचं ‘मानाचं पान’ हे पुस्तक म्हणजे आपल्या आवडत्या सेलेब्रिटींबरोबर मांडलेली पंगतच जणू. कलयांकित व्यक्ती काय खातात, त्यांच्या खाण्याच्या आकडीनिकडी याबाबत आपल्याला उत्सुकता असतेच. सुधीर गाडगीळ यांनी या विषयाला धरून घेतलेल्या खुसखुशीत मुलाखती लेख स्करूपात या पुस्तकात आहेत. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका […]