सरहद्द गांधी या नावाने प्रसिद्ध असलेले खान अब्दुल गफारखान ज्यांना बादशाह खान म्हणूनही ओळखले जाते, हे वायव्य सरहद्द प्रांतातील सर्वात प्रभावशाली स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचा जन्म ३ जून १८९० रोजी झाला. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. गफारखानांनी १९२९ मध्ये ‘खुदा ई खिदमतगार’ नावाची संघटना उभारली होती. भारत सरकारने १९८७ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवले गेले. बादशाह खान उर्फ […]
आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव. त्यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी झाला. त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. […]
मास्टर विनायक यांचे विनायक दामोदर कर्नाटकी हे पुर्ण नाव. त्यांचा जन्म १९ जानेवारी १९०६ रोजी झाला. मराठी सामाजिक बोलपटांचे आद्य प्रवर्तक’ असं त्यांना गौरवानं म्हटलं जातं. धार्मिक कथा, करमणूक, साहस वगैरे कल्पनारम्य विश्वातून मराठी बोलपटांना अर्थपूर्ण करण्याचं मोठंच कार्य मा. विनायकांनी केलं. फक्त अभिनयासाठीच त्यांनी परिश्रम घेतले नाहीत, तर दिग्दर्शन व निर्मितीचंही महत्त्वाचं योगदान केलेलं आहे. गंभीर, सामाजिक समस्यांना स्पर्श करणारे आणि […]
त्यांचा जन्म १३ एप्रिल १८९० रोजी झाला. दादासाहेब तोरणे यांनी ‘श्री पुंडलिक’ची निर्मिती केली तेव्हा त्यांचे वय होते अवघे बावीस वर्षाचे. तोरणे कुटुंबिय मूळचे मालवणनजिकच्या कट्टा गावचे. त्या शेजारच्याच सुकळवाड या छोट्याशा गावात दादासाहेवांचा जन्म झाला. ते तीन वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. कट्टा गावात त्यांच्या कुटुंबियांची थोडीफार जमीन आणि राहते घर होते. घरच्या गरिबीमुळे त्यांच्या शाळेची फी भरणे […]
सवाई गंधर्वांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे आज अजरामर झाली आहेत. त्यांचे शिष्य पंडित भीमसेन जोशी ह्यांनी त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे भरविण्यास सुरवात केली. […]
हरिवंश राय बच्चन यांनी १९३८ मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम. ए केले आणि १९५२ पर्यंत अलाहाबाद विद्यापीठात नोकरी केली. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९०७ रोजी झाला. १९५२ मध्ये इंग्लंड मध्ये कैम्ब्रिज विश्वविद्यालय येथे अभ्यास करण्यास गेले. परत आल्यावर भारत सरकारने नियुक्त केले. १९२६ मध्ये हरिवंश राय यांनी श्यामा यांचेशी लग्न केले.त्यांच्या निधना नंतर १९४१ मध्ये, बच्चन यांनी सूरी […]
बेबी शकुंतला यांचे चित्रपटांत येण्यापूर्वीचे नाव शकुंतला महाजन आणि लग्नानंतरचे नाव उमादेवी खंडेराव नाडगोंडे होते. त्यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३२ रोजी झाला.अप्रतिम सौंदर्य आणि चौफेर अभिनयामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत बेबी शकुंतला यांनी आपला दबदबा निर्माण केला होता़ हिंदी चित्रपटसृष्टीतील मधुबाला यांच्या सौंदर्याशी त्यांची तुलना होत असे़. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. त्यांचे वडील छापखान्यात नोकरीला होते .प्रभात […]
कुंदनलाल सैगल ही आठ अक्षरे म्हणजे सप्तकातील पहिला ‘सा’ आणि वरचा ‘सा’ मिळून आठ स्वर, संगीतप्रेमींसाठी ही मंत्राक्षरे आहेत. महान गायक नट या उपाधीपेक्षाही वरती स्थान असलेला हा स्वर. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९०४ रोजी झाला. अवघ्या पंधरा-सोळा वर्षांच्या कालखंडात कुंदनलाल सैगल यांनी संपूर्ण संगीतसृष्टीवर अमीट ठसा उमटविला. त्यांच्या गायकीचा प्रभाव अनेक गाजलेल्या गायकांवर निश्चितपणे जाणवतो. ‘जब दिल ही […]
हनी ईरानी यांना डर, कोई मिल गया, और लम्हे साठी ओळखले जाते. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९५५ रोजी झाला. त्या लेखक व अभिनेत्री आहेत. मा.हनी ईरानी या मा.जावेद अख्तर यांची पहीली पत्नी आहेत. योगायोग हा की हनी ईरानी यांच्या वाढदिवसाबरोबर मा.जावेद अख्तर यांचा पण वाढदिवस असतो. १९७२ मध्ये त्यांनी लग्न केले. फरहान अख्तर व जोया अख्तर ही मा.हनी ईरानी व […]