नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

चित्रपट कथा – पटकथाकार आणि संवाद लेखक यशवंत रांजणकर

चित्रपट विषयक साप्ताहिक चित्ररंग चे रांजणकर हे काही काळ कार्यकारी संपादक होते. त्यांची पन्नास हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बैरागपाडा हे पुस्तक तसेच लॉरेन्स ऑफ अरेबिया, आल्फ्रेड हिचकॉक, वॉल्ट डिस्नी – द अल्टिमेट फँटसी यांची त्यांनी लिहिलेली चरित्र वाचकप्रिय ठरली. रांजणकरांची शैली वाचक-स्नेही होती. लॉरेन्स ऑफ अरेबिया या पुस्तकाने मराठी वाचकविश्वाला सर्वस्वी अपरिचित असलेल्या टी. ई. लॉरेन्सचं हे चरित्र त्यामुळे अथपासून इतिपर्यंत वाचनीय झाली. […]

चित्रपट अभ्यासक आणि सिने पत्रकार धनंजय कुलकर्णी

धनंजय कुलकर्णी हे सकाळ, लोकसत्ता, पुढारी, लोकमत सोबतच प्रीमियर, तारांगण या अंकातून चित्रपट विषयी स्तंभ लेखन करीत असतात. त्यांनी पुण्यातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्र संचालन व निवेदन केले आहे. तसेच खाजगी रेडिओ एफ. एम. वर अनेक चित्रपट विषयक कार्य क्रमाचे सादरीकरण केले आहे.चित्रपट विषयक अनेक वेब पोर्टल वर ते लिखाण करीत असतात. […]

दिग्दर्शक गोविंद घाणेकर

प्रभातच्या ‘संत जनाबाई’ या १९४९ सालच्या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. ते १९५१ ते १९५५ पर्यंत ‘फेमस पिक्चर्स’ व १९५५ ते १९६१ पर्यंत ‘इंडियन नॅशनल पिक्चर्स’चे महाव्यवस्थापक होते. या दोन्ही संस्थांसाठी त्यांनी अनेक जाहिरातपट तयार केले. त्यांनी सुधीर फडके यांच्या ‘वंशाचा दिवा’ (१९५०), माणिक चित्रचा हिंदी-मराठी ‘शिवलीला’ व पांडुरंग कोटणीस यांचा ‘भल्याची दुनिया’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. […]

कथाकार आणि कादंबरीकार केशव पुरोहित

जागतिक मराठी साहित्य परिषदेचे ते उपाध्यक्ष होते. संत्र्याची बाग, मनमोर, शिरवा, छळ, जमिनीवरची माणसं, अंधारवाट, सावळाच रंग तुझा, हेल्गेलंडचे चांचे, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. […]

पोलादसम्राट लक्ष्मीनिवास मित्तल ऊर्फ लक्ष्मी मित्तल

पोलादसम्राट लक्ष्मीनिवास मित्तल ऊर्फ लक्ष्मी मित्तल यांचा जन्म १५ जून १९५० रोजी सादुलपूर, राजस्थान येथे झाला. लक्ष्मी मित्तल हे ब्रिटन मधील सर्वात श्रीमंत भारतीय समजले जातात. लक्ष्मी मित्तल यांचे शालेय शिक्षण कोलकाताच्या श्री दौलतराम नोपानी स्कूल मध्ये झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण कोलकाताच्या सेंट झेवियर्स कॉलेज मध्ये झाले. तेथे त्यांनी बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात लक्ष्मी […]

ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित पुरुषोत्तम वालावलकर

मोठमोठ्या गवयांकडून रियाज घेतल्यामुळे पं. वालावलकर हार्मोनियम वादनात एवढे पारंगत झाले की श्रोत्यांना त्यांच्या हार्मोनियम वादनाची भुरळ पडायची. बेळगावच्या एका कार्यक्रमात त्यांनी कुमार गंधर्वांना ऐनवेळी साथ केली होती. तो कार्यक्रम एवढा रंगला की कार्यक्रम संपल्यावर खुद्द कुमारजींनी पं. वालावलकरांना ‘असे षड्ज-पंचम मला कुणी दिले नाहीत’ अशी पावती दिली होती. […]

गायिका गौरी पाठारे

२०१९ मध्ये स्वरानंद प्रतिष्ठानचा माणिक वर्मा पुरस्कार गौरी पाठारे यांना मिळाला आहे. या बरोबरच गौरी पाठारे यांना अनेक पुरस्कार, मान-सन्मान, कौतुक मिळाले आहे. त्यांच्या गाण्याला लोकांनी भरभरून प्रेम व संधी दिली. गौरी पाठारे यांनी देश विदेशात अनेक मैफिली केल्या आहेत. […]

स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते ना. ग. गोरे

१९६४ मध्ये ह्याच पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९६७-६८ मध्ये ते पुणे महापालिकेचे महापौर होते. १९७० पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन नानासाहेबांनी अनेकवार तुरुंगवास भोगला. […]

1 34 35 36 37 38 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..