नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

अमेरिकेतील लोकप्रिय गायक एल्व्हिस प्रिस्टले

गिटारवादक, अभिनेता आणि ‘किंग ऑफ द रॉक अँड रोल’ त्यांचा जन्म ८ जानेवारी १९३५ रोजी झाला. कॉलेज शिक्षणासाठी ट्रक चालकाचं काम करण्याऱ्या एल्व्हिस यांनी एका ठिकाणी गायक म्हणून ‘ऑडिशन’ दिली पण त्यात तो नापास झाला. परीक्षकाने त्याला तुझ्यासाठी ट्रक ड्रायव्हरचीच जागा योग्य आहे असा अनाहूत सल्लाही दिला. यानंतर काही महिन्यातच हा मुलगा आणखी एका ऑडिशनसाठी गेला. यावेळी ही त्याची […]

हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये आपली प्रतिभा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी

हिंदुस्थानी आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप अभिनेते सईद जाफरी यांनी पाडली होती. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९२९ रोजी झाला. जाफरी यांची ओळख जन्माने भारतीय असलेला ब्रिटिश अभिनेता ही होती. शॉन कॉनरी, पीअर्स ब्रॉस्नन सारखे अभिनेते आणि जेम्स आयव्हरी, रिचर्ड अटेन्बरोंसारख्या गाजलेल्या हॉलिवूड दिग्दर्शकांबरोबर काम करणारा पहिला भारतीय अभिनेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. ‘द मॅन हु वुड […]

प्रसिद्ध अभिनेत्री बेबी नंदा

भावुक डोळे, साधारण सौंदर्य व ओठांखाली असलेला तीळ, ठेंगणी मुर्ती असं व्यक्तीमत्व असलेल्या व आपल्या उत्साहाने भारलेल्या बेबी नंदा यांनी अनेक दशकं चित्रपट सृष्टी गाजवली. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४१ रोजी कोल्हापूर येथे झाला. बेबी नंदा या मराठी चित्रपट सृष्टीतले एकेकाळचे आघाडीचे दिग्दर्शक निर्माते असलेल्या मास्टर विनायक यांच्या कन्या. मा.बेबी नंदा यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. मास्टर विनायक […]

एक प्रतिभावान दिग्दर्शक बिमल रॉय

त्यांचा जन्म १२ जुलै १९०९ रोजी झाला. दो बिगा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता आणि बंदिनी आदी चित्रपटांतून रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे हिंदी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे बिमल रॉय. हिंदी चित्रपटसृष्टीत त्या काळात कधी शेतकऱयांची व्यथा, रहस्यमय, विरह, समाजव्यवस्था आदी विषय त्यांनी आपल्या चित्रपटातून हाताळले आणि आपली वेगळी छाप त्यांनी निर्माण केली. ते खास करून चित्रपटामध्ये सौदर्याचा वापर करून घेणार दिग्दर्शक म्हणून […]

मराठी अभिनेत्री गिरिजा ओक

प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची कन्या गिरिजा ओक. मानिनी १५ वर्षाची असताना मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. हा गिरिजा ओक यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. गिरिजा ओक चा विवाह सुरुद गोडबोले बरोबर झाला आहे. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘गुलमोहर’, ‘मानिनी’, आणि ‘अडगुळे मडगुळे’ या चित्रपटांत तिने काम केले आहे. ‘लज्जा’ या झी मराठी वरिल मालिका हि तीची […]

मिर्झा गालिब

मिर्झा गालिब हे सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी झाला. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले. मा.मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांची पत्‍नी मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते. […]

चार्ली चॅप्लिन

चार्ली चॅप्लिन यांनी जगभरच्या प्रेक्षकांवर राज्य केलं. चार्ली चॅप्लिनचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी झाला. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधना विना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू! एका निराधार बाळाचं पोटच्या मायेनं संगोपन करतो तो. पोत्याची झोळी करून त्यात त्या बाळाला ठेवतो. किटलीच्या […]

नौशाद अली

हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ ज्याला म्हटलं जातं त्याची सुरुवात नौशादजींनी केली. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९१९ रोजी झाला. नौशादजींनी १९४२ च्या शारदा पासून १९६८ च्या संघर्ष पर्यंत २६ वर्षात ५ हिरक महोत्सवी रतन, अनमोल घडी, बैजू बावरा, मदर इंडिया आणि मुघल-ए-आझम, १२ सुवर्णमहोत्सवी आणि तब्बल ३५ रौप्यमहोत्सवी चित्रपटाना संगीत दिले. त्यांच्या हिरक महोत्सवी चित्रपटांची नावं बघीतली तर पहिले दोन चित्रपट […]

अटल बिहारी वाजपेयी

अटल बिहारी वाजपेयींचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. अटलबिहारी वाजपेयी यांनी कानपूरमधून राज्यशास्त्रात एम.ए.ची पदवी मिळविल्यानंतर वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. त्यांनी राष्ट्रधर्म, वीर अर्जुन आणि पांचजन्य या नियतकालिकांत पत्रकारिता केली. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रमाताही ते सहभागी झाले. त्यांची राजकीय कारकीर्द म. गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीपासून सुरु झाली. स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये स्थापन झालेल्या ‘भारतीय जनसंघ’ या पक्षाच्या उभारणीत त्यांचा […]

चंद्रकांत रघुनाथ गोखले

चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक होते. मराठी अभिनेत्री कमळाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र मा.विक्रम गोखले हेदेखील अभिनेते आहेत. यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून […]

1 358 359 360 361 362 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..