प्रसाद सावकार यांचे पूर्ण नाव सांबप्रसाद रघुवीर सावकार. त्यांचा जन्म १४ डिसेंबर १९२८ रोजी गोमंतकीय संगीत रंगभूमीवरील नामवंत सावकार घराण्यात झाला . बडोदे येथे त्यांचे वडील रघुवीर सावकार हे स्त्रीभूमिकांसाठी प्रसिद्घ असलेले गायक-नट होते व ते ‘रंगदेवता’ या पदवीने ओळखले जात. वडिलांच्या नाट्यसंस्थेत प्रसाद सावकारांचा बालपणापासूनच वावर असल्याने त्यांच्यावर लहानवयातच नाटक प्रसाद सावकार व संगीत यांचे संस्कार होत गेले. […]
उदयशंकर चौधरी ऊर्फ उदयशंकर मुळचे नाराली गावचे. त्यांचे वडिल जमीनदार होते. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९०० रोजी राजस्थान मधील उदयपुर येथे झाला.हारचौधरी ही त्यांना पदवी होती. पुढे चौधरी हेच रुढ झाले. त्यांचे वडिल संस्कृतचे पंडित होते. त्यांना तीन लहान भावंड होती. राजेंद्रशंकर, देवेंद्रशंकर, भुपेंद्रशंकर व रवीशंकर. पैकी रवीशंकर हे पुढे जगप्रसिद्ध सतार वादक झाले. मा.१९१८ साली शिक्षणा साठी मुंबई […]
श्रीपाद नारायण पेंडसे यांनी मराठी भाषेतील एक कथालेखक व कादंबरीकार मराठी कादंबरीक्षेत्रात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले होते. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९१९ रोजी झाला.शिक्षणानंतर बी. ई. एस. टी. मध्ये ते रूजू झाले. त्यांच्या लेखनाला कथा लेखनापासून सुरुवात झाली. १९३८ मध्ये सह्याद्री मासिकात त्यांची ‘जीवनकला’ ही पहिली कथा प्रसिद्ध झाली. नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली. १९४१ साली त्यांचे पहिले […]
सी.रामचंद्र यांचे मूळ नाव रामचंद्र नरहर चितळकर. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१८ रोजी झाला. ‘सी. रामचंद्र’ हे संक्षिप्त नाव त्यांनी सिनेदिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन धारण केले. आपल्या निकटवर्तीयांत ते ‘अण्णा’ म्हणून प्रसिद्घ होते. आर्. एन्. चितळकर, श्यामू, राम चितळकर, सी. रामचंद्र व अण्णासाहेब अशा विविध नावांनी त्यांनी संगीतदिग्दर्शन व पार्श्वगायन केले. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस होते. वडिलांची ठिकठिकाणी बदली होत […]
‘मधुबन मे राधिका नाचे रे’, ‘ये जिंदगी उसी की हैं’ या अजरामर गाण्यातील सतारीचे सुर, ‘मुगल-ए-आझम’, ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटांसाठीच्या सतार वादनासाठी सतारवादक उस्ताद अब्दुल हलिम जाफर खान यांचे नाव लक्षात राहील. उस्ताद अब्दुल हलिम जाफर खान यांचे नाव पं. रवीशंकर, उस्ताद विलायतखान यांच्या जोडीने घेतले जात असे. त्यांनी सतारवादनात स्वत:चा ‘जाफरखानी’ बाज निर्माण […]
आज ४ जानेवारी… आज आंतरराष्ट्रीय ब्रेल दिवस आज फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक लुई ब्रेल यांचा जन्म ४ जानेवारी १८०९ रोजी झाला. लुई ब्रेल यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहय्याने वाचनाची पद्धत / लिपी विकसीत केली म्हणून ४ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय ब्रेल दिवस साजरा करतात. लुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्सच्या कुपव्रे नामक एका खेड्यात, गरीब आणि कष्टकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील सायमन-रेने ब्रेल […]
खेमचंद प्रकाश यांचा जन्म १२ डिसेंबर १९०७ रोजी झाला. खेमचंद प्रकाश हे बिकानेर च्या राजमहलात गायक म्हणून होते. नंतर ते नेपाल च्या राजघराण्यात गायक म्हणून होते. १९३९ साली ते मुम्बईला आले. अवघ्या १०-१२ वर्षात त्यांनी ४७ चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे पहिले दोन चित्रपट म्हणजे ‘सुप्रीम पिक्चर्स’चे गाजी सलाऊद्दीन आणि मेरी ऑंखें. त्या सुमारास रणजित मूव्हीटोनच्या चंदुलाल शाह यांनी त्या कंपनीच्या […]
रवि शंकर यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी झाला. रवि शंकर यांचे वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमाङ्गिनी यांनी त्यांचे पालन केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते पॅरिस येथे राहत. १९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. […]
बापूराव पेंढारकर यांचा जन्म १० डिसेंबर १८९२ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते. केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श या नाट्यसंस्थेचे कार्य बापूराव पेंढारकर आणि त्याच्या नंतर भालचंद्र पेंढारकर यांनी […]
सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी श्रीकांत ठाकरे यांच्या वर लिहिलेला लोकप्रभा अंकातील लेख. श्रीकांत ठाकरे यांच्याशी ‘मार्मिक’मधील त्यांचे सिनेप्रिक्षान वाचताना भेट होई. ‘शुद्धनिषाद’ नावाने ते प्रत्येक चित्रपटाची व्यवस्थित हजेरी घेत. शीर्षकापासूनच ते चित्रपटाची चंपी करीत. ‘शुद्धनिषाद’ यांची शैली-निरीक्षण, भाष्य टीका अगदी वेगळी व बिनतोड. त्यातून दिसणारे, भेटणारे श्रीकांतजी प्रत्यक्षातही तसेच थेट भाष्य करणारे असणार याची साधारण पूर्वकल्पना […]