शंकर जयकिशन या संगीतकारातील जोडीतील जयकिशन यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.जयकिशन यांचे पूर्ण नाव जयकिशन दयाभाई पांचाल. हा सुरांचा जादुगार! दुसरा शब्द नाही. जयकिशन लहानपणापासूनच ते हार्मोनियमवर गाणी वाजवत. सुप्रसिद्ध गुजराती दिग्दर्शक चंद्रवदन भट्ट यांच्याकडे संधीसाठी चकरा मारत असतानाच त्यांची गाठ मा.शंकर (शंकरसिंह रघुवंशी) या आणखी एका होतकरू संगीतकाराशी पडली. मा.शंकरही संधीच्या शोधात फिरत होते. जयकिशन त्या काळी […]
प्रभाकर पंडित यांचा जन्म ३० सप्टेंबर १९३३ रोजी झाला. प्रभाकर पंडित यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्याला झाले. संगीताची आवड बालपणापासून असल्याने त्यांनी गायनाचे मार्गदर्शन मटंगेबुवा; तसेच पेंढारकरबुवा यांच्याकडे घेतले. व्हायोलिनचे शिक्षण त्यांना जे.वाय. पंडित यांच्याकडून मिळाले. संगीतात कारकिर्द घडविण्यासाठी ते मुंबईला आले. दादर येथे त्यांनी ३० वर्षे “मधुवंती व्हायोलिन विद्यालया”चे संचालन केले. मुंबई आकाशवाणी केंद्रावर १५ वर्षे ते काम करत होते. […]
डॉ. दाजी भाटवडेकर यांचा जन्म १५ सप्टेंबर १९२१ रोजी झाला. दाजी भाटवडेकर मूळचे मुंबईचे. स्वातंत्र्यपूर्व काळात दाजींचे आजोबा मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होते. त्याकाळी त्यांना मुंबईचे महापौरपदही मिळाले होते. त्यांचे घराणे संपन्नत असले तरी घरांत धार्मिक आणि संस्कृती जपणारे वातावरण होते.दर एकादशीला घरात कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम होत असे. दर पंधरवड्याला होणार्या असल्या कार्यक्रमातील नाट्याचा आणि कथानकांचा दाजींच्या मनावर खोल […]
पंडितराव नगरकर यांचा जन्म २६ डिसेंबर १९१० रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर; परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. जन्म अहमदनगर जिल्ह्यातील भातोडी-पारगाव येथे. शिक्षण मॅट्रिकपर्यंतच. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे, १९३० साली […]
पं. गिंडे यांचा जन्म कर्नाटक राज्यात बेळगाव जवळ बैलहोंगल येथे झाला. त्यांनी लहान वयातच संगीतात रूची दाखविण्यास सुरुवात केली व पुढे आपले सारे आयुष्य संगीताला वाहून घेतले. ते श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडे वयाच्या अकराव्या वर्षी गाणे शिकू लागले. त्यासाठी त्यांनी लखनौ येथे प्रयाण केले व रातंजनकरांच्या घरातील एक सदस्य बनले. तिथे ते मॉरिस कॉलेजातील व्ही. जी. […]
लालन सारंग यांचा जन्म २६ डिसेंबर १९४१ रोजी झाला. ‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’ आणि ‘कमला’ लालन सारंग यांच्या आयुष्यातील ही तीन महत्वाची नाटकं. त्यातील त्यांच्या भूमिका कलावंत म्हणून त्यांचा कस पाहणाऱ्या तर होत्याच, पण त्याहीबरोबर जगण्याचं नवं भान देणाऱ्या होत्या. मा.लालन सारंग भारतीय रंगभूमीवरील बंडखोर अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. पण त्यांचं व्यक्तिमत्तव त्याहीपेक्षा बरच गहिरं आहे. बंडखोरपणा त्यांच्या आयुष्यातही आहेत. […]
साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला. कोकणात पालगड या गावी साने गुरुजींचे वडील सदाशिवराव खोताचे काम करीत असत. लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. सर्वांवरती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींच्या आईंनीच त्यांना दिला. […]
मोहम्मद रफी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. शास्त्रीय संगीताची तालीम मोहम्मद रफी यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टो आणि फिरोज निजामी यांच्याकडे घेतली. रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. पहिले गाणे ‘गाँव की गोरी’ या चित्रपटात त्यांनी १९४५ मध्ये गायले. त्याच दरम्यान गायना बरोबरच […]
नूरजहाँ यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. ‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ यांचे खरे नाव ‘अल्लाह वसई होते. नूरजहाँ यांचा जन्म पेशावर येथील संगीतकार मदद अली यांच्या परिवारात झाला. संगीतकार परिवारात जन्म झाल्याने नूरजहाँ यांना लहानपणा पासून संगीताची आवड निर्माण झाली. नूरजहाँ यांनी वयाच्या पाचव्या वर्षी गाणे शिकायला सुरवात केली होती. नूरजहाँ यांचा परिवार १९३० मध्ये कलकत्ता येथे आला. तेथे नूरजहाँ […]
ओमप्रकाश यांचा जन्म १९ डिसेंबर १९१९ रोजी झाला. ओमप्रकाश यांचे पूर्ण नाव ‘ओम प्रकाश बक्शी’ होते. शिक्षण लाहोर मध्ये. त्यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. १९३७ मध्ये मा.ओमप्रकाश ‘ऑल इंडिया रेडियो सिलोन’ मध्ये २५ रुपये वेतनावर नोकरी करत होते. रेडियो सिलोन वर त्यांचा ‘फतेहदीन’ हा कार्यक्रम लोकप्रिय होता. ओम प्रकाश आपल्या कारकिर्दीत ३५० चित्रपटात कामे केले आहे. त्यांच्या प्रमुख चित्रपटात ‘पड़ोसन’, […]