नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

मोहिनीअट्टमच्या महान कलाकार डॉ. कनक रेळे

भारतीय शास्त्रीय नृत्य हा एक वेगळा उपक्रम अभ्यासक्रमात यावा व विद्यार्थ्यांना त्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेता यावे. शास्त्रीय नृत्याकडे जनसामान्यांनी सन्मानाने पाहावे. या विषयातसुद्धा आपण पदवी प्रदान करू शकतो याकरिता केरळमधील मोहिनी अट्टम या अभिजात नृत्याचा प्रसार करणाऱ्या डॉ. कनक रेळे यांनी मुंबई विद्यापीठाच्या सहाय्याने १९६६ मध्ये नालंदा नृत्य कला महाविद्यालय सुरू केले. […]

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर

‘हमने जिना सीख लिया ‘या हिंदी चित्रपटाद्वारे २००७ मध्ये सिद्धार्थ चांदेकर प्रेक्षकांसमोर आला. २०१० मध्ये आलेल्या अवधूत गुप्तेच्या “झेंडा” या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत त्याने पहिले पाऊल टाकले. ‘क्लासमेट ‘ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांकडून त्याला चांगलीच दाद मिळाली. पिंडदान, बालगंधर्व, सतरंगि रे, संशयकल्लोळ, वजनदार,ऑनलाईन बिनलाईन, लॉस्ट अँड फाउंड, बस स्टॉप, गुलाबजाम, वजनदार या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. […]

ज्येष्ठ पत्रकार खंडुराज गायकवाड

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मराठी वृत्तपत्र लेखक संघ या संघटनेवर ते अनेक वर्षे पदाधिकारी म्हणून सक्रिय राहीले आहेत. […]

पहिला मराठी शब्दकोश तयार करणारे जेम्स थॉमस मोल्सवर्थ

आजही महाराष्ट्रातल्या न्यायालयात जेव्हा एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ लावण्याची वेळ येते तेव्हा मोल्सवर्थने दिलेला अर्थ न्यायाधीश प्रमाण मानतात. […]

महाराष्ट्रातील मोठे नेते राधाकृष्ण बाळासाहेब विखे पाटील

विखे-पाटील घराणं हे राजकारणातील बडं नाव आहे. नगरच्या राजकारणावर मांड असलेलं हे घराणं आहे. विखे-पाटील घराण्यातील तिसरी पिढीही आता राजकारणात आली आहे. सहकार, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात विखे घराण्याचा दबदबा आणि लौकीक आहे. […]

मराठमोळी मॉडेल सुपर उज्वला राऊत

रेम्प वॉक करणारी ती पहिली भारतीय मॉडेल होती. उज्वला राऊतने मिलिंद सोमण बरोबर किंगफिशर कैलेंडर हंट स्पर्धेत जज म्हणून काम केले होते. उज्ज्वला राऊतने Elle, Time and Official अशा मासिकाच्या साठी कव्हर गर्ल काम म्हणून काम केले आहे. उज्ज्वला राऊत पहिली भारतीय मॉडेल आहे के जिने फेमस लॉन्जरी व अमेरिकन डिझायनर विक्टोरिया सीक्रेटच्या साठी रॅम्प वॉक केले आहे. […]

कवी, कथाकार आणि कादंबरीकार डॉ.महेश केळुसकर

रत्नागिरी, दमण, विविध भारती, सांगली, मुंबई या केंद्रांवर काम करताना त्यांनी २६ अभिवाचन मालिका केल्या. त्यातील महानायक ही अभिवाचन मालिका खूप गाजली. त्याचबरोबर त्यांनी प्रभाते मनी, ऐसी अक्षरे रसिके, चिंतन हा चिंतामणी आदी लोकप्रिय कार्यक्रम दिले. त्यांची निर्मिती असलेल्या दोन आकाशवाणी कार्यक्रमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. […]

मेनका, माहेर आणि जत्रा या मराठी मासिकांचे संपादक पु. वि. बेहेरे ऊर्फ राजाभाऊ बेहेरे

१९५९ साली मुंबईहून प्रकाशित झालेल्या ‘मेनका’च्या पहिल्याच अंकावर आचार्य अत्रे यांनी टीका केली. नावावरून त्यांना हे मासिक मराठीमध्ये काहीतरी भयंकर करणार असे वाटले. पुण्याच्या अश्लील मार्तंड कृष्णराव मराठे यांनीही खटला भरला. त्याचा भरपूर मनस्ताप बेहेरे दांपत्याला सोसावा लागला. पण त्या खटल्यामुळे मेनका मासिकाची बरीच चर्चा होऊ लागली आणि त्यामुळे चांगलीच प्रसिद्धीही झाली. […]

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन

१९८६- ८७ च्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज, पाणी व रस्ता आदी लोकांच्या मूलभूत समस्यांसाठी डॉ. महाजन यांनी संपूर्ण इंदापूर तालुक्यात पायी पदयात्रा काढून जनजागृती केली. या काळात अनेक समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण झाली होती. महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, किसन ताटे व सहकारी यांनी या फळीचे नेतृत्व केले. सेवा दलाच्या चळवळीतून ताटे यांनी तालुकाभर मोठा पुरोगामी विचारांचा समूह निर्माण केला होता. […]

1 35 36 37 38 39 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..