आज ६ नोव्हेंबर..आज चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक मा.दिनकर द. पाटील यांची जयंती. दिनकर द. पाटील यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९१५ रोजी झाला. ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटापासून मा.दिनकर द. पाटील यांनी चित्रनिर्मितीत पाऊल टाकले. त्यांच्या ‘उदय कला चित्र’ व ‘दिनकर चित्र’ तर्फे नंतर त्यांनी ‘पाटलाचा पोर’, ‘तारका’, ‘मूठभर चणे’, ‘कुलदैवत’, ‘भैरवी’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. दिनकर पाटलांनी आपल्या पन्नास वर्षांच्या […]
आज ६ नोव्हेंबर..आज “गंधर्व भूषण” जयराम शिलेदार यांची पुण्यतिथी. जयराम शिलेदार यांचा जन्म ६ डिसेंबर १९१६ रोजी झाला. जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये “गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. घरचा सराफीचा व्यवसाय चांगला चालत होता. आजोबांच्या हातून घडलेल्या तोडे, बाजूबंद, पैंजणादी अलंकारांना […]
आज ५ नोव्हेंबर.. आज मराठी रंगभुमी दिवस १८४३ साली विष्णुदास भावे यांनी ‘संगीत सीतास्वयंवर ‘ नाटकाचा प्रयोग सदर करून मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली. १५० हून अधिक वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या मराठी रंगभूमीवर अनेक प्रयोग केले गेले ,आणि आजही अनेक नवे प्रयोग सातत्याने होत आहेत मा.विष्णूदास भावे यांनी ’सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणुन मराठी रंगभूमीची […]
पिळदार शरीर, पाच फूट दहा इंच उंची, गोरा वर्ण, तरतरित नाक, निळसर डोळे, रुबाबदार चेहरा अशी सिंहासारखी देहरचना असणारी व्यक्तिच, ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या बेडीत अडकलेल्या तमाम भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी पहिली डरकाळी फोडू शकते आणि फोडली ती वासुदेव बळवंत फडके या क्रांतिकारकाने. म्हणूनच त्यांना ‘भारतीय सशस्त्र क्रांतिचे आद्य जनक ‘ म्हटले जाते. थोर क्रांतिकारकाच्या जीवनाचा आढावा घ्यावयाचा ठरल्यास तो […]
आज ५ नोव्हेंबर..आज आसामी संगीताचे पितामह भूपेन हजारिका यांची पुण्यतिथी. भूपेन हजारिका यांचा जन्म ८ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. मा. हजारिका यांचा सदिया येथे एका शिक्षकाच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षणात उत्तम गती असलेल्या हजारिका यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बी.ए. व एम. ए. केले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन विषयातील पीएचडी केली. शिकागो विद्यापीठाची त्यांना लिस्ले फेलोशीप मिळाली होती. […]
मिलिंद सोमण यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९६५ रोजी स्कॉटलंडमध्ये झाला. तो पहिली सात वर्षे इंग्लंडमध्ये राहिला. नंतर त्याचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले. मिलिंदला कारकीर्दीच्या सुरूवातीला जलतरणपटू व्हायचे होते. त्याने विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. व्यायामाने कमावलेली पिळदार शरीरयष्टी लाभलेल्या मिलींदला ठाकरसी फॅब्रिक्सची पहिली जाहिरात मॉडेल म्हणून मिळाली आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. गायिका अलिशा चिनॉय हिच्या मेड इन इंडिया या संगीत व्हिडीओत केलेल्या […]
कोकणचे गांधी’ म्हणून प्रसिद्ध असलेेल अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९४ रोजी झाला. अप्पासाहेब हे देशभरात मुख्यत: रचनात्मक कामाबद्दल ओळखले जातात. त्यांनी ‘कुणबी सेवा संघ’ काढला. ते ‘चरखा संघा’चे तर अध्यक्षच झाले होते. त्यांनी रत्नागिरीत सूतकताई व ग्रामोद्योग प्रसाराचे बहुमोल काम केले. त्यांनीच जिल्ह्यात काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली. ते जिल्हा काँग्रसचे अध्यक्षही होते. ते स्वातंत्र्य चळवळीत सुमारे साडेतीन वर्षें तुरुंगात होते. त्यांनी त्यांना […]
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रत्येक रविवारी दुपारी ३.३० ते ४.३० सादर होणाऱ्या ‘दुसरी बाजू’ ह्या मुलाखतीवर आधारित कार्यक्रमात श्री. विक्रम गोखले त्याच्याशी विविध विषयांवर गप्पा मारत असताना माझं मन आठवणींच्या हिंदोळ्यांवर झुलू लागलं आणि काही वर्षांपूर्वी लिहिलेला माझा हा लेख आपल्या सर्वांसमोर ठेवण्याची इच्छा झाली. एक यशस्वी मित्र ३० वर्षांपूर्वी एका भारतीय कंपनीत कृषी अधिकारी म्हणून मी […]
विश्राम बेडेकर आज मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांची पुण्यतिथी विश्राम बेडेकर यांचा जन्म १३ ऑगस्ट १९०६ रोजी झाला. नाटककार, कादंबरीकार, चित्रपट दिग्दर्शक म्हणून आजही ज्यांचे नांव आदराने, सन्मानाने घेतले जाते, त्या विश्राम बेडेकरांचे हे वयाच्या पंचविसाव्या वर्षी लेखनास प्रारंभ केला आणि नव्वदाव्या वर्षापर्यंत ते लिहीत राहिले असले तरी त्यांचे लेखन मोजकेच आहे. चित्रपट क्षेत्रात कारकीर्द सुरु […]