आज १ नोव्हेंबर… ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकी. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे […]
आज १ नोव्हेंबर.. शरद तळवलकर यांची जयंती. शरद तळवलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९१९ झाला. शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस रणदुंदुंभी नाटकातील शिशुपाल आणि साष्टांग नमस्कार या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली. छापील संसार नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत […]
आज १ नोव्हेंबर.. आज संगीतकार,संयोजक ,वादक ”अरुण पौडवाल यांची पुण्यतिथी प्रो.बी आर.देवधर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकलेल्या अरुण पौडवाल यांनी एस.डी.बर्मन ,कल्याणजी आनंदजी ,लक्ष्मीकांत प्यारेलाल ,बाप्पिलाहिरी ,आर.डी.बर्मन यांच्याकडे अॅकॉर्डीयन वादन केले. संगीत संयोजन करताकरता अरुण पौडवाल यांनी १९७१मधे संगीतकार म्हणून आशा भोसले यांच्या आवाजात एक ध्वनिफीत केली.”ओटीत घातली मुलगी विहीणबाई ”गदिमांनी केलेली हि विहीण पारंपारिक होती पण नवेपण […]
आज १ नोव्हेंबर.. आज मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची जयंती. डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली येथे झाला. एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हाच एखाद्या चळवळीचा, संस्थेचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही. मा.डॉ.नरेंद्र दाभोळकर हे असेच एक नाव. अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोळकर हे एकमेकांचे समानर्थी शब्द बनून गेलेले होते. मा.डॉ.नरेंद्र […]
आज ३१ ऑक्टोबर.. आज ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते यांची पुण्यतिथी. मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे मा.सुमती गुप्ते. त्यांचा जन्म १९१९ मध्ये वाई येथे झाला. वाईत जन्मलेल्या सुमतीबाईंचे बालपण मात्र बडोद्यासारख्या कला-संस्कृतीच्या माहेरघरात व्यतीत झाले. साहजिकच त्यांचा कलाक्षेत्राकडे, विशेषत: सिनेमाकडे ओढा होता. पदवी शिक्षण प्राप्त केल्यानंतर चित्रपटक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी […]
आज ३१ ऑक्टोबर.. आज एस.डी. उर्फ सचिन देव बर्मन यांची पुण्यतिथी सचिन देव बर्मन यांचे निधन १ ऑक्टोबर १९०६ रोजी झाले. “महान” या एकाच शब्दात ज्यांचे वर्णन करता येईल असे संगीतकार सचिन देव बर्मन उर्फ एस.डी बर्मन सर्वार्थाने दादाच होते. खरं म्हणजे त्रिपुराच्या राजघराण्यात वाढलेल्या सचिनदाना संगीताची गोडी लागावी आणि त्या अंकुराचा .वटवृक्ष व्हावा हा एक अद्भुत चमत्कार होता पण तो घडला! आकाशात बसलेल्या गंधर्वमंडळींना […]
शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपट सृष्टीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं नाव. शांताराम बापू या नावानं सुद्धा ते ओळखले जात. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला खोल ठसा उमटवला. […]
आज ३० ऑक्टोबर.. आज बॉलीवुड अभिनेता विनोद मेहरा यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९४५ रोजी झाला. साधारण चेहऱ्याचे अभिनेते विनोद मेहरा यांची पडद्यावरील प्रतिमा एका सामान्य शेजाऱ्यासारखी होती आणि ते कधीच सुपरस्टार पद मिळवू शकले नाहीत. मात्र, १९७१ पासून ते १९९० पर्यंत १९ वर्षांमध्ये त्यांनी १०० चित्रपटांमध्ये अभिनय केला. तसेच बालकलाकाराच्या रूपातही त्यांनी ‘नरसी भगत’ आणि ‘शारदा’ मध्ये अभिनय केला […]