आज २४ ऑक्टोबर. आज अनेक ख्यातनाम गायकांच्या कौतुकाचा विषय ठरलेली शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्तीचा वाढदिवस. कौशिकीचा जन्म २४ आक्टोबर १९८० रोजी झाला. पं. अजय चक्रवर्ती यांच्या त्या कन्या. पतियाळा घराण्याचे गायक पंडित अजय चक्रवर्ती, आई चंदना चक्रवर्ती संगीत शिक्षक, घरातच गाणे, वयाच्या २ र्या वर्षापासून तिने संगीत शिकण्यास सुरूवात केली. ऋतुपर्ण घोष या प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शकाने [‘रेनकोट, चोखेर बाली’] देवू केलेल्या प्रमुख नायिकेच्या […]
आज केरसी लॉर्ड यांचे निधन झाले. जन्म:- १४ फेब्रुवारी १९३५ केरसी लॉर्ड यांची माहिती ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तालवादक मा.लॉर्ड कॉवस हे मा.केरसी लॉर्ड यांचे वडील. मा.केरसी लॉर्ड यांचे संपूर्ण कुटुंब संगीत या विषयात होते. १९३१ साली प्रदर्शित झालेल्या ‘आलम-आरा’ पासून १९९० सालापर्यंतच्या विविध संगीतकारांकडे लॉर्ड कुटुंबीयांनी वेगवेगळी भारतीय आणि पाश्चिमात्य वाद्यं वाजविली आहेत. सचिन देव बर्मन […]
आज १४ ऑक्टोबर आज इटावा घराण्याचे आंतरराष्ट्रीय सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ यांचा वाढदिवस. जन्म: १४ ऑक्टोबर १९५८ ते इटावा घराण्याचे सातव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करतात. ते भारतात सर्वात सुप्रसिद्ध तरुण सतार वादक, मानले जातात. मुंबईत जन्मलेले शाहिद परवेझ यांचे वडील अजीज खान हे सुद्धा इटावा घराण्याचे प्रतिनिधित्व करत असत. शाहिद परवेझ यांचे आजोबा सतार आणि सूरबहार […]
‘कॉमन मॅन’चे जनक आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२४ रोजी म्हैसूर येथे झाला. रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रातून काढलेली व्यंगचित्रे खूप गाजली होती. ‘कॉमन मॅन’ या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यांनी भोवतालच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींवर मार्मिक भाष्य केले होते. कॉमन मॅन हे त्यांचे गाजलेले व्यंगचित्र. कॉमनमॅन या व्यंगचित्रामुळेच […]
विविध मालिकांतून आपल्या करारी व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारी रसिकांची लाडकी बंडखोर लेखिका प्रिया तेंडूलकर यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. प्रिया तेंडूलकर या प्रख्यात साहित्यिक व नाटककार विजय तेंडुलकर यांच्या कन्या. प्रिया लहानपणापासून ती ज्यांना आदर्श मानायची, ते वडील हे तिचे सर्वोत्तम मित्र होते. लहानपणी ती एकदम दुबळी, लाजाळू, रडूबाई होती. तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी […]
प्रसिद्ध नाट्य-सिनेअभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटे (वय ४४) यांचे आज २२ ऑक्टोबर २०१६ रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने भरत नाट्य मंदिराच्या रंगमंचावरच आकस्मिक निधन झाले. एकबोटे यांचा नाट्यत्रिविधा हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी भरत नाट्य मंदिरात सुरू होता. रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमाचे शेवटचे नृत्य सादर करण्यासाठी एकबोटे रंगमंचावर आल्या. भैरवी रागावर आधारित बंदिशीवर त्यांनी नृत्य करण्यास सुरूवात केली. त्यांच्या बहरदार […]
बॉलीवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेता देवेन वर्मा यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म २२ आक्टोबर १९३७ रोजी झाला देवेन वर्मा यांनी अनेक चित्रपटांत विनोदी भूमिका अतिशय खूबीने वठवल्या होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अंगूर’, ‘खट्टामिठा’ या चित्रपटांमधील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. विनोदाचे टायमिंग साधण्यात हातखंडा असलेल्या देवेन यांना ‘चोरी मेरा काम’, ‘चोर के घर चोर’ आणि ‘अंगूर’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट हास्यकलाकाराच्या श्रेणीत सन्मानित करण्यात आले […]
अजीत हे हिंदी चित्रपट सृष्टीतील जुन्या पिढीतील प्रसिद्ध खलनायक अभिनेता होते. त्यांचे खरे नाव हामिद अली खान असे होते. आज २२ आक्टोबर. प्रसिद्ध बॉलिवूड खलनायक अभिनेता अजीत यांची पुण्यतिथी. अजित यांचा जन्म २७ जानेवारी १९२२ रोजी झाला. अजीत यांनी जंजीर सिनेमात सेठ धरम दयाल तेजा हे पात्र साकारले होते. अजीत या सिनेमातील मुख्य खलनायक होते. ‘जंजीर’नंतर अजीत यांना खलनायकाच्या रुपात […]
शाळकरी वयात दिवसा शाळा व संध्याकाळी गायनशाळा हा नित्यक्रम अनेक वर्षे अगदी कसोशीने पाळल्या गेला. पं. विष्णू दिगंबर पलुस्करांच्या पुण्यतिथीचे वेध लागले की कार्यक्रमाच्या तयारीसाठी आम्हा विद्यार्थ्यांची लगबग सुरु होत असे. वय काहीही असो, पण प्रत्येक विद्यार्थ्याने पंडितजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी काही ना काही सादर केलेच पाहिजे अशी आमच्या गुरुजींची आज्ञा होती व ती मोडण्याची कोणाचीही […]
ना.सी. फडके यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते. […]