नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

याहू फेम सिनेस्टार शमशेरराज ऊर्फ शम्मी कपूर

आज २१ ऑक्टोबर. ‘याहू’ स्टार शमशेरराज ऊर्फ मा.शम्मी कपूर यांची जयंती शम्मी कपूर यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. त्यांनी स्वत:ला कधी चिरतरुण म्हणवून घेतले नाही; पण जीवनावर उदंड प्रेम करणार्यास या आनंदी कलाकाराकडे ऊर्जेचा अखंड स्रोत होता. त्यांची जीवनाबद्दलची आसक्ती ही आयुष्याचा आनंद घेण्याची होती. त्यांनी आपले आयुष्य मनसोक्त उपभोगले. शम्मी कपूर यांनी ज्यांना गंभीर, शोकात्मक भूमिका म्हणता येतील, […]

दिग्गज दिग्दर्शक व निर्माते यश चोप्रा

आज दिग्गज दिग्दर्शक व निर्माते यश चोप्रा यांची पुण्यतिथी जन्म:-२७ सप्टेंबर १९३२ यशजींनी अभियंता बनावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती, लंडनला जाण्यासाठी त्यांचा पासपोर्टही बनला होता. मात्र नियतीला काही औरच मंजूर होते आणि ते चित्रपटसृष्टीत आले. यश चोप्रा यांच्या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे गीत आणि संगीत. यश चोप्रा हे कवी असल्याने त्यांनी स्वत: कधीही उथळ दर्जाची गीते […]

मराठी गायक, संगीतकार रामचंद्र कृष्णाजी फाटक ऊर्फ राम फाटक

आज मराठी गायक, संगीतकार रामचंद्र कृष्णाजी फाटक ऊर्फ राम फाटक यांची जयंती जन्म. २१ ऑक्टोबर १९१७ शिक्षणाने एम.ए., बी.टी. असलेल्या राम फाटकांनी काही वर्षे शिक्षकी पेशा पत्करला. पुढे १९५६ पासुन पुढील १० वर्षे नागपूर आकाशवाणी केंद्रावर तर त्यापुढील १० वर्षे पुणे आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. इथेच भास्करराव गोडबोलेआणि जे.एल.रानडे ह्यांसारख्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. पुणे आकाशवाणी केंद्रावर […]

ख्यातनाम मराठी लेखक बाबा कदम

आज २० ऑक्टोबर. ख्यातनाम मराठी लेखक बाबा कदम यांची पुण्यतिथी. बाबा कदम यांचा जन्म ४ मे १९२९ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव वीरसेन आनंदराव कदम असे असले तरी ते आपल्या वाचक परिवारात `बाबा कदम’ म्हणूनच परिचित होते. त्यांच्या कथा, कादंबर्या त मात्र ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थानिक गढ्या, वाडे, सरंजामी सदर बोली भाषा, पोलीस, कायदा, कोर्ट, रेसकोर्स […]

मराठी लोकशाहीर अमर शेख

*आज २० ऑक्टोबर * आज ख्यातनाम मराठी लोकशाहीर मा.अमर शेख यांची जयंती जन्म:- २० ऑक्टोबर १९१६ मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम […]

मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर

आज मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर यांची पुण्यतिथी जन्म:- २० जानेवारी १८९८ आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मा.मास्टर कृष्णराव. त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण मा.बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक […]

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले

`दादा’ म्हणजेच मा.पांडुरंग शास्त्री आठवले.  दादा एक उत्तम तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी `स्वाध्याय’ परिवाराची स्थापना केली. पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० रोहे येथे  झाला.  त्यांचा जन्मदिवस  स्वाध्याय परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात. श्रीमद् भगवद्गीता आणि उपनिषदे यांच्यावर आधारीत तत्त्वज्ञानाच्या आधारे त्यांनी समाजसुधारणेचा ध्यास घेतला आणि कर्मयोगातून सामान्य जनतेला सुखी जीवनाचा मार्ग शोधून दिला. त्यांचे […]

गीतकार मा.शांताराम नांदगावकर

आज १९ आक्टोबर…. आज गीतकार मा.शांताराम नांदगावकर यांची जयंती जन्म: १९ आक्टोबर १९३६ “हृदयी वसंत फुलताना’ यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी शांताराम नांदगावकर यांची ओळख होती. सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर. मूळचे कोकणातील नांदगावचे असलेल्या शांताराम नांदगावकर यांचे शालेय […]

बिहारमधला मराठमोळा आय.पी.एस. अधिकारी शिवदीप वामन लांडे

आपण सिनेमातल्या ‘दबंग’ आणि ‘सिंघम’चं कौतुक करतो. खऱ्या आयुष्यात त्यांनी लावलेले दिवे दिसतातच. पण असा खराखुरा दबंग बिहार राज्याला भेटलाय. त्याचं नाव शिवदीप लांडे. अस्सल मराठमोळा गडी. ‘चित्रलेखाने’ त्याची कव्हरस्टोरी केली. त्याची ही गोष्ट… “एकच फाईट वातावरण टाईट.. एक घाव शंभर तुकडे, अर्धे इकडे अर्धे तिकडे.. सोडली एकच गोळी,खल्लास अख्खी टोळी.., एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात, भाऊचा नाद केल्यास हातपाय गळ्यात.. […]

डॉ.अमोल कोल्हे

आज १८ आक्टोबर आज डॉ.अमोल कोल्हे यांचा वाढदिवस. जन्म.१८ आक्टोबर १९८० शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की, अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांची छबी डोळ्यासमोर उभी राहते. ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतील शिवरायांच्या अप्रतिम भूमिकेमुळे अमोल कोल्हे यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. डॉ.अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी […]

1 376 377 378 379 380 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..