नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य

एकीकडे अगदी नाचणं जीवावर येत असलेल्या सन्नी देओल, आणि अजय देवगणसारखे हिरो गणेशकडून धडे घेणं पसंत करतात; तर दुसरीकडे हृतिक रोशन सारखे नृत्यनैपुण्य असलेले लोकही त्याला पसंती देतात. माधुरीपासून ते कतरीना पर्यंत सगळ्यांसाठी तो नृत्य बसवतो. आपल्या सव्वाशे किलोच्या शरिराचा कसलाच अडथळा न होऊ देता नृत्य, अगदी एकेक स्टेप करून दाखवतो आणि आपल्या मुंबईय्या भाषेत समजावूनही सांगतो! […]

ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे

आपल्या करीयरची सुरुवात त्यांनी १९७० साली ‘नटसम्राट’ या नाटकाने केली.‘नवरा माझा नवसाचा’ मधील भूमिकेमुळे सुनील तावडे यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. ‘दुहेरी’ या मालिकेत काही काळ ते नर्सच्या रुपात दिसले होते. ‘माझा होशील ना’ ही सध्या त्यांची मालिका गाजत आहे. ‘नटसम्राट’,’बॅरिस्टर’ तरुण तुर्क म्हातारे अर्क,लग्नाची गोष्ट, एकदा पहावे करून, लेकुरे उदंड झाली ही त्यांची काही नाटके होत. […]

आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला

फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार कुमार मंगलम बिर्ला २०१७ साली भारतातले आठवे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते. नोव्हेंबर २०२० नुसार दानशूरांच्या यादीत कुमार मंगलम बिर्ला चौथ्या स्थानावर आहेत. त्यांनी एका वर्षात २७६ कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी दान केले आहेत. […]

अभिनेता सुशांतसिंह राजपुत

‘पवित्र रिश्ता’मधून त्याने आपल्या छोट्या पडद्यावरील अभिनयाला सुरुवात केली आणि ‘झलक दिख ला जा’ मध्येही आपल्यातील चमक दाखवून दिली होती. स्टार प्लसवरील ‘किस देश मै हे मेरा दिल’ ही त्याची पहिली सिरीअल. त्यानंतर जवळपास तीन वर्षं त्याने झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या कार्यक्रमात काम केले. यात त्याने मानव ची भूमिका साकारली होती. […]

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार रवी परांजपे

रवि परांजपे यांची शैली अनोखी होती. सशक्त रेषा, सोपी आणि ओघवती मांडणी, त्रिमिती दाखवण्याचे वेगळे कसब, वेगवेगळे पोत कुंचल्यातून साकारण्याची ताकद त्यांच्या चित्रात दिसत असे. दृश्य वास्तवाला दिलेला भावनिक प्रतिसाद परांजपे यांनी निर्मिलेल्या कलाकृतींमधून दिसतो. त्यामुळे त्यांचे रंग, ते हाताळण्याची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण होती.अनेक वर्षांच्या चित्रसाधनेतून त्यांनी ती विकसित केली. […]

ज्येष्ठ चित्रकार आर.व्ही. ऊर्फ बाबा पाठक

बडोद्याहून इ.स. १९४० मध्ये मुंबईत आल्यानंतर बॉम्बे आर्ट सोसायटी गॅलरीमध्ये बाबा पाठक यांनी भरविलेले प्रदर्शन खूप गाजले होते. हा काळ स्वातंत्र्यसमराचा होता. त्यापासून अलिप्त राहणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पुण्यात आल्यावर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. त्यांच्या अटकेचे वॉरंट निघाल्यावर बाबा काही वर्ष भूमिगत राहिले. […]

सुपरकॉप – माजी पोलीस महासंचालक जे. एफ. रिबेरो

ज्युलिओ रिबेरो १९५३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ज्युलिओ फ्रांसिस रिबेरो हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांनी मुंबईचे २१ वे पोलिस आयुक्त म्हणून त्यांनी १९८२ ते १९८६ या काळात काम पाहिले आहे.  […]

रत्नागिरीतील प्रसिद्ध तबला वादक हेरंब जोगळेकर

त्यांनी अभिनयातही आपला ठसा उमटविला आहे. हेरंब जोगळेकर यांनी सुंदर मी होणार या नाटकाद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. यात गायक कलाकाराची भूमिका साकारली होती. […]

छत्रपती संभाजी महाराज

शिवाजी महाराजांसारख्या युगपुरूषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतरपुण्याजवळीलकापूरहोळ गावचीधाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजीजिजाबाई यांनी केला. […]

ज्येष्ठ रंगकर्मी अनंत मिराशी

आय एन टी, दुर्वांची जुडी, रंगमंच, मुंबई, नाट्यसंपदा, रंजन कला मंदिर या नाट्यसंस्थांमधून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. रंगमंच, मुंबई या संस्थेच्या नटसम्राट, रायगडाला जेव्हा जाग येते, असं झालंच कसं?, मी तर बुवा अर्धाच शहाणा या नाटकांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. तसेच दुर्वांची जुडीमधील त्यांच्या ‘बाळू आपटे’ या पात्राला खूप प्रसिद्धी मिळाली होती. […]

1 36 37 38 39 40 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..