आज २९ सप्टेंबर. बॉलीवुडचा विनोदाचा बादशहा मेहमूद यांची जयंती. मेहमूद यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. मुमताज अली हे मेहमूद यांचे वडील मुंबई टॉकीज स्टुडिओमध्ये काम करत असत. मेहमूद अभिनेता बनण्याच्या आधी ड्रायव्हरचेही कामही करत असत मीना कुमारी यांनी त्यांना टेबल टेनिस शिकवण्यासाठी नोकरीला ठेवले होते. तेव्हा त्यांनी मीना कुमारीची बहीण मधू हिच्याशी विवाह केला. विवाह केल्यावर अभिनय करण्यास सुरवात केली. […]
लता मंगेशकर यांच्याविषयी माहिती असलेल्या आणि नसलेल्याही माहितीचा संग्रह.. जन्म – सप्टेंबर २८, इ.स. १९२९ ; इंदोर, मध्य प्रदेश (ब्रिटिश काळातील मध्य भारत एजन्सी) व्यक्तिगत माहिती धर्म हिंदू नागरिकत्व भारतीय मूळ गाव – मंगेशी, गोवा भाषा – मराठी पारिवारिक माहिती आई – माई मंगेशकर वडील – मास्टर दीनानाथ मंगेशकर बंधू-भगिनी – आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, मीना खडीकर संगीत साधना गुरू – मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत कारकीर्द पार्श्वगायन, सुगम संगीत कारकिर्दीचा काळ – इ.स. १९४२ पासून गौरव विशेष […]
आज २२ सप्टेंबर. पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक अनंत माने यांची जयंती अनंत माने यांचा जन्म २२ सप्टेंबर १९१५ रोजी झाला. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. तमाशाप्रधान चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे पन्नास,साठ आणि सत्तरचे दशक असून या कालावधी मध्ये दिग्दर्शक अनंत माने व संगीतकार वसंत पवार अनेक सुंदर सुंदर […]
आज २२ सप्टेंबर. स्मरणीय भूमिका करणार्या दुर्गा खोटे यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी झाला. चित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टोकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते. दुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात […]
आज २२ सप्टेंबर. मराठीतले भावगीत गायक जी.एन. जोशी यांची पुण्यतिथी. जी.एन. जोशी यांचा जन्म ६ एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांनी गायलेले रानारानात गेली बाई शीळ हे त्यांचे भावगीत हे मराठीतले पहिले भावगीत समजले जाते. जी.एन. जोशी हे उच्चशिक्षित वकील होते. एचएमव्हीत रमाकांत रुपजी या वरिष्ठ अधिकार्याने जोशी यांना प्रथम आणले व नंतर तर त्यांना मराठी व शास्त्रीय संगीताच्या विभागाचे अधिकारीच […]
पं. विष्णु नारायण भातखंडे यांचा जन्म १० ऑगस्ट १८६० रोजी झाला. भातखंडे हे लहानपणी बासरी व महाविद्यालयात शिकत असतानाच सतार वाजवण्यास शिकले. सुरुवातीस गोपाळ गिरी यांच्याकडे व नंतर अंध वादक वल्लभदास दामुलजी यांच्याकडे त्यांनी सतारवादनाचे धडे घेतले. ते १८८५ मध्ये बी.ए. व १८८७ मध्ये एल्.एल्. बी. झाले. मात्र तत्पूर्वीच ते १८८४ मध्ये काही पारशी संगीतप्रेमींनी चालविलेल्या‘गायनोत्तेजक मंडळी’ मध्ये (स्थापना १८७०) […]
दत्ता डावजेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकरांना पदार्पणाची संधी दिली. हिंदी चित्रपट होता आपकी सेवामें आणि गाणे होते पा लागूं कर जोरी रे. तसेच मराठी चित्रपट होता माझं बाळ. डावजेकरांनी त्यानंतर आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली. दत्ता डावजेकरांचे वडील बाबुराव, तमाशांत आणि उर्दू […]
आज १५ सप्टेंबर..आज मराठीतील प्रसिद्ध नाट्यअभिनेते डॉ. दाजी भाटवडेकर ऊर्फ केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर यांची जयंती जन्म:- १५ सप्टेंबर १९२१ दाजी भाटवडेकर मूळचे मुंबईचे. स्वातंत्र्यपूर्व काळात दाजींचे आजोबा मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होते. त्याकाळी त्यांना मुंबईचे महापौरपदही मिळाले होते. त्यांचे घराणे संपन्नत असले तरी घरांत धार्मिक आणि संस्कृती जपणारे वातावरण होते.दर एकादशीला घरात कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम […]
आज १५ सप्टेंबर..आज ‘दूरदर्शन’ या केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशातील पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीचा वाढदिवस १५ सप्टेंबर, १९५९ रोजी एक छोटासा ट्रान्समीटर व स्टुडिओ यांच्या साह्याने दूरदर्शनचे काम चालू झाले. राजधानीत दूरदर्शनची ही मुहूर्तमेढ रोवली जाताना ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा त्यात मोलाचा वाटा होता. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. […]
आज १५ सप्टेंबर..आज अभियंता दिन म्हणुन साजरा केला जातो. याचे कारण हा दिवस भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे. जन्म.१५ सप्टेंबर १८६१ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे पिता श्रीनिवासशास्त्री विद्वान संस्कृत पंडीत होते. अशा वातावरणात त्यांच्यावर उच्च संस्कार होणारच.पण घरची हलाखीची होती.त्यांनी शालेय शिक्षण तालुक्याला एकटे राहुन गरीबीशी झुंज देत अव्वल गुणांनी पूर्ण केले.व ते बंगळुरूला उच्च शिक्षणासाठी […]