आज १४ सप्टेंबर….जेष्ठ मराठी अभिनेते “डॉ.काशिनाथ घाणेकर” यांची जयंती डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जन्म १४ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक होते. पण त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला “डॉ.काशिनाथ घाणेकर” यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. संभाजीराजांचा विषय निघाला किवा भालजींचे जुने चित्रपट कुठे सुरु असले कि “डॉ.काशिनाथ घाणेकर”…यांचा विषय निघणार नाही असे होणार नाही… संभाजी म्हणजे फक्त आणि फक्त […]
आज १४ सप्टेंबर.. आज जेष्ठ निर्माते मा.जी. पी. सिप्पी यांची जयंती. जन्म १४ सप्टेंबर १९१५ सिप्पी यांचा जन्म पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या हैदराबाद येथे १९१५ मध्ये झाला होता. भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांनी विद्यार्थी दशेत भाग घेतला होता. त्याचा परिणाम म्हणून त्यांना तुरूंगातही जावे लागले होते. त्यानंतर ते वकिल झाले. सतरंजी विक्रेत्यांपासून सुरूवात करणा-या सिप्पी यांनी १९५५ […]
आज १३ सप्टेंबर….हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार मा.लालजी पांडे उर्फ अंजान यांची पुण्यतिथी लालजी पांडे उर्फ अंजान यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९३० रोजी झाला. लालजी पांडे उर्फ अंजान हे एक प्रतिभावंत गीतकार. आपल्या अद्वितीय गीतरचनांमुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. प्रारंभीच्या काळात छोट्या चित्रपटांतून गीतलेखन करणा-या अंजान यांच्या गीताने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित गाण्यांतून आपली श्रेष्ठ काव्यप्रतिभा […]
आज १३ सप्टेंबर….किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका मा. डॉ. प्रभा अत्रे यांचा वाढदिवस प्रभा अत्रे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून प्रभा अत्रे यांचे नाव घेतले जाते. त्या पं सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या आहेत. प्रभाताई वयाच्या आठव्या वर्षी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. हिराबाईंकडे शिकत असताना प्रभाताई त्यांना भारतातील विविध भागांतील […]
आज १३ सप्टेंबर..आज आपल्या कॅमेर्याने उ सिनेतारे-तारकांना ग्लॅमर मिळवून देणारे, कलाकारांना नवा चेहरा देणारे असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांची पुण्यतिथी जन्म:- १६ सप्टेंबर १९५० गौतम राजाध्यक्ष यांना संगीताची खूप आवड आणि जाण होती. ऑपेरा संगीत, नाट्य संगीत, शास्त्रीय संगीताचा त्यांच्याकडे मोठा संग्रह होता. १९८७ साली त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन स्वतंत्रपणे व्यवसायिक फोटोग्राफी सुरु केली. […]
२३ डिसेंबर १९७० रोजी संध्याकाळी, बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे नटसम्राटचा पहिला प्रयोग झाला. गोवा हिंदू असोसिएशनने हे नाटक मंचावर आणले होते. संस्थेचा सुवर्णमहोत्सवातला हा प्रयोग होता. या नाटकाचे दिग्दर्शन केले होते श्री. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी. आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका केली होती डॉ. श्रीराम लागू यांनी; तर कावेरी साकारली होती शांता जोग यांनी. वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये […]
आज १२ सप्टेंबर….शंकर जयकिशन या संगीतकार जोडीतील जयकिशन यांची पुण्यतिथी जयकिशन यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. जयकिशन यांचे पूर्ण नाव जयकिशन दयाभाई पांचाल होते. जयकिशन यांचे हार्मोनियम वरती उत्तम प्रभुत्व होते. त्यांच्या या छंदाला नवीन आकार देण्याच्या वेडापोटी ते मुंबई सारख्या मायानगरी मध्ये आले. शंकर (पूर्ण नाव शंकरसिंह रघुवंशी) यांनी जयकिशन यांनाही पृथ्वी थिएटरमध्ये बोलावून हार्मोनिअम वाजवायचे काम […]
आज १२ सप्टेंबर.. लोकप्रिय मराठी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांची पुण्यतिथी त्यांचा जन्म दि. ७ जु्लै १९४८ रोजी झाला… पद्मा चव्हाण या मराठी नाटकांत आणि चित्रपटांत कामे करणार्या एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अप्रतिम स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना असलेल्या पद्मा चव्हाण इतक्या सुंदर होत्या की त्यांच्या नाटकांच्या जाहिरातीत त्यांच्या नावाआधी ‘मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब‘ असे छापलेले असे. पद्मा चव्हाण यांचे १२ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले. — संजीव वेलणकर, पुणे. ९४२२३०१७३३ […]
आज १२ सप्टेंबर… हिंदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम गायक सवाई गंधर्व यांची पुण्यतिथी सवाई गंधर्वांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८८६ रोजी झाला. ‘नर करनी करे तो नर का नारायण हो जाए’ या म्हणीचे प्रतीक म्हणजे ‘सवाई गंधर्व’. रामभाऊंचा आवाज लहानपणी गोड व हलका होता. त्यांना व घरातील मंडळींना गाण्याची आवड होती. वडील स्वत: तबल्याची साथही करत असत. घरातील आर्थिक सुबत्ता व […]
आज ११ सप्टेंबर.. सुप्रसिद्ध मराठी कवी आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांची जयंती कवी अनिल यांचा जन्म ११ सप्टेंबर १९०१ रोजी झाला. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी १० चरणांची कविता हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला. भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी कोलकातायेथे प्रयाण केले. त्यांना अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसू ह्यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर १९३५ साली विधिशाखेची पदवी मिळाली. सनद घेतल्यावर वकिलीचा व्यवसाय […]