संगणक व त्याच्याशी संबंधित लहानमोठी उपकरणे आता आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहेत. कॉम्पॅक्ट डिस्क- अर्थात ‘सीडी’ ही त्यातीलच एक. रेकॉर्ड प्लेअरची जागा टेप रेकॉर्डरने घेतली आणि पुढे काही काळातच कॅसेट कालबाह्य़ ठरून त्यांची जागा ‘सीडीं’नी घेतली. संगीत साठवणे आणि ऐकणे हा ‘सीडी’चा केवळ एक उपयोग झाला. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही माहितीचा साठा संग्रहित करण्यापासून तो दुसर्याला […]
गडसम्राट गोपाळ नीलकंठ दाण्डेकर ह्यांच्या सहवासातील संस्मरणीय सोनेरी क्षण : वंदनीय आप्पांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज ८ जुलै २०१६ सांगता दिन मला लहानपणापासूनच गड-किल्ल्यांची, इतिहासाची आवड ! त्याला कारणही तसेच आहे. वंदनीय श्रीशिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्यावर झाला, त्याच शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या जुन्नर गावचा माझा जन्म ! त्यामुळे पूज्य गो. नी. दाण्डेकर ह्यांच्या पुस्तकांची […]
विद्यार्थीप्रिय ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर ल. गावडे सरांनी २० जून २०१६ रोजी त्र्याणव्या वर्षात पदार्पण केलंय. वंदनीय गावडे सरांनी वीस जून दोन हजार सोळा रोजी, त्र्याणव्या वर्षात पदार्पण केलंय ! २० जून १९२४ ही सरांची जन्मतारीख आहे. आजच्या मंगलदिनी गावडे सरांच्या घरी, दिवसभर त्यांच्या विद्यार्थ्यांचा, शिक्षकगणांचा, पत्रकारांचा, साहित्यिक, शासकीय, कला, अश्या विविध क्षेत्रातील जाणत्यांचा वावर असतो. […]
माझी आजी आनंदी रामकृष्ण जोशी निरक्षर होती तथापि, श्रीसत्यवान-सावित्रीचे वटपौर्णिमेचे महत्व सांगणाऱ्या साडेतीनशे ओव्या तिला मुखोद्गत होत्या ! आजीने मौखिक पद्धतीने शिक्षण घेतले होते ! तिच्या अफाट स्मरणशक्तीचं मला नेहेमीच कौतुक वाटत आलंय ! माझी आजी म्हणजे माहेरची “द्वारका” ही जुन्नरच्या रुख्मिणी पंढरीनाथ हरकरे ह्यांची सुकन्या ! विवाहानंतर तिचे नाव सौ. आनंदी रामकृष्ण जोशी असे झाले, […]
गदिमांनी १९७७ साली ललित मासिकाच्या दिवाळी अंकात ‘ए.क.कवडा’ या टोपण नावाने मराठीतील २० सुप्रसिद्ध लेखकांवर विनोदी बिंगचित्रे लिहिली होती,त्या वेळच्या प्रसंगानूसार किंव्हा एकूण त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वानुसार दोन-चार विनोदी ओळी व त्या लेखकाचे व्यंगचित्र असे त्याचे स्वरुप होते,ती खूप गाजली व हा ‘ए.क.कवडा’ नक्की कोण अशा चर्चा रंगायला लागल्या होत्या,संपादकांना विचारणा झाल्या,पण नाव काही कोणाला कळाले नाही,डिसेंबर […]
मराठी रंगभूमीचा तो सोनेरी काळ सोन्याचा करणाऱ्या ज्योत्स्नाबाई भोळे ह्यांचा मला स्नेहार्द्र सहवास लाभला, पुण्याच्या आपटे रोडवरील स्वरवंदना ह्या त्यांच्या निवासस्थानी माझे जाणे होते ! आजही त्यांची गाणी रेडिओवर जेव्हां ऐकू येतात, तेव्हां कान आपोआप तिकडे वळतात ! त्यांचे चिरंजीव श्रीमान सुहास भोळे हे माझ्या वडिलांचे, पुण्यातील भांडारकर रोडवरील बाल शिक्षण मंदिर शाळेच्या चिंचोरे गुरुजींचे तेव्हाचे […]
कवी ग्रेस तथा माणिक गोडघाटे सरांच्या सहवासातील काही संस्मरणीय क्षण मा. कवी ग्रेस, ह्यांची नि माझी पहिली समक्ष भेट झाली, तो दिवस होता १२ ऑगस्ट २००३ ! पुण्यातील प्रभात रोडवरील स्वरूप हॉटेलमध्ये ! “दुपारी साडेतीन वाजता ग्रेस सरांना भेटा”, असा मला मुंबईहून मा. मंगेशकर ह्यांच्या घरून फोन आला ! त्या भेटीचे निमित्त म्हणजे, मा. पंडित हृदयनाथजी […]
२८ एप्रिल रोजी बाजीराव पेशवे यांची २७६ वी जयंती श्रीमंत बाजीराव पेशवे यांची देशाला ओळख ‘अपराजित योद्धा अशी आहे. बाजीरावांनी त्यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ४१ लढाया लढल्या आणि त्या सर्वच्या सर्व जिंकल्या. अशा प्रकारचे कर्तृत्त्व गाजवणारे ते एकमेव सेनापती आहेत. त्यामुळेच मराठा साम्राज्य विस्तारुन मध्य प्रदेश पार करुन राजस्थान, उत्तरप्रदेश इथपर्यंत पोहोचले होते. आजच्या युद्धशास्त्राच्या अभ्यासकांना […]
माझे वडील पूज्य पंडित विष्णू चिंचोरे हे त्यांच्या काळातील नामवंत शिक्षक होते ! पुणे येथील डेक्कन जिमखान्यावरील भांडारकर रोडवर असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर शाळेचे, जून १९३६ ते ३१ मे १९६१ ह्या कालावधीमध्ये ते मुख्याध्यापक होते. पुढे १ जून १९६१ ते ३० सप्टेंबर १९७५ या कालावधीमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेचे ते मुख्याध्यापक […]
स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर ह्यांनी गौरविलेला, मी लिहिलेला हा लेख मास्टर दीनानाथ मंगेशकर ह्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी २० एप्रिल २००० रोजी प्रसिद्ध झाला होता. बलवंत संगीत मंडळीच्या मानापमान नाटकामध्ये मास्टर दीनानाथांनी धैर्यधराची भूमिका करण्यास १९२७ मध्ये सुरुवात केली ! मास्टर दीनानाथांच्या आधी अनेकांनी रंगभूमीवर धैर्यधर साकारला होता. “मानापमान”मध्ये मास्टर दीनानाथांनी पदांच्या चाली बदलण्यापासून सर्व ठिकाणी नाविन्य निर्माण केले […]