अमेरिकेत संपूर्ण जगातिल् विविध वंशाचे लोक वास्तव्यास आहेत त्यात भारतीय लोक फक्त ६% आहेत. ईतर देशाच्या नागरीकांच्या तुलनेने भारतीय नागरिक ज्याना अमेरिकेत ” भारतीय-अमेरिकन ” असे सम्बोधिले जाते व अनेक राष्ट्रातुन आलेल्या नागरिका पेक्षा भारतीय-अमेरिकन लोक जास्त प्रगतिच्या वाटेवर आहेत असे दिसुन येते. […]
स्वरसम्राट भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या स्वरांची भुरळ अवघ्या जगालाच घातली होती. आज सकाळी ८ वाजता पुण्यात , ८९ वर्षांच्या ह्या स्वरभास्कराचा अस्त झाला. […]
मराठी साहित्यविश्वात संशोधक समीक्षक आणि संवेदनशील कवी म्हणून परिचित असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकरांचा जन्म १८ डिसेंबर १९३० रोजी झाला. एम ए नंतर काही काळ गुन्हे अन्वेषण विभागात त्यांनी काम केले. कविमनाला रुचेल असे सीआयडीत काय असणार? लवकरच ते सिद्धार्थ महाविद्यालयात आणि मग कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शिकवू लागले. या कालखंडात त्यांनी रचलेल्या कविता ‘सत्यकथा’ मासिकातून प्रसिद्ध […]
पुण्यामध्ये एक ‘आगळे वेगळे’ ज्योतिषी आहेत. त्यांचे भविष्य कथन अचूक आणि सकारात्मक असते. पण त्यांच्या मते ज्योतिषामध्ये कांही अनीष्ट प्रथा आहेत. ‘कर्मकांड’ या नावाने या प्रथा आजही अस्तित्वात आहेत. शापित पत्रिका, कालसर्प योग, नारायण नागबळी, मंगळ दोष, ग्रह दोष, नक्षत्र दोष, साडेसाती, वास्तू दोष ही ती ‘कर्मकांडे’ आहेत. त्यांच्या मते प्रत्यक्षात अशी कोणतीही कर्मकांडे अस्तित्वात नाहीत. […]
एखादा विषय हातात घेऊन, त्यासाठी वर्षानुवर्ष लोकजागृतीचं काम करत राहण्याचा एक काळ केव्हाच भूतकाळात जमा झाला. त्यातही पुन्हा ते काम खिशाला चाट लावून करायचं असेल, तर प्रश्नच मिटला. एकोणीसशे सत्तरच्या दशकात खरं तर असं काम करणारे अनेक गट आणि पुढे ज्यांचा उल्लेख स्वयंसेवी संघटना म्हणून केला जाऊ लागला, असे कार्यकर्त्यांचे समूह पुढे आले होते. […]
२० नोव्हेंबर २०१० रोजी नागपुरात सुरू झालेल्या भारत वि. न्यूझीलंड या कसोटी सामन्याचे समालोचन ऑल इंडिया रेडिओसाठी इंग्रजीतून सुरेश सरैया यांनी केले तेव्हा त्यांचे कसोटी समालोचनाचे शतक पूर्ण झाले. यापूर्वी त्यांनी दीडशेहून अधिक एदिसांचे (एकदिवसीय सामन्यांचे) समालोचन केलेले आहे, यात चार विश्वचषक स्पर्धांच्या अंतिम सामन्यांचा समावेश आहे. ऑल इंडिया रेडिओसाठी त्यांनी समालोचन करण्यास प्रारंभ केला त्याला आता ४० वर्षे उलटून गेली आहेत. […]
दादा एक उत्तम तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी `स्वाध्याय’ परिवाराची स्थापना केली. श्रीमद् भगवद्गीता आणि उपनिषदे यांच्यावर आधारीत तत्त्वज्ञानाच्या आधारे त्यांनी समाजसुधारणेचा ध्यास घेतला आणि कर्मयोगातून सामान्य जनतेला सुखी जीवनाचा मार्ग शोधून दिला. […]
भारतरत्न हा आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. साहित्य, कला, विज्ञान, सार्वजनिक सेवा इत्यादी विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी करणार्या व्यक्तीला हा पुरस्कार देऊन गौरविले जाते. […]
त्या भर उन्हात कर्जतच्या बाजारपेठेनं एका अस्सल कलावंताचा अभूतपूर्व असा उत्स्फूर्त आविष्कार पाहिला. त्या कलावंताला नव्हतं भान बाजारपेठेचं, तिथल्या गर्दीचं, नव्हतं भान कशाचं! तो नव्हता यशवंत दत्त, तर त्या क्षणी तो होता – अप्पासाहेब बेलवलकर, नटसम्राट! […]
यतीन कार्येकर, एक अत्यंत संवेदनशील, तरल, अंडरप्ले करणारा जातिवंत अभिनेता. कोणतीही भूमिका त्याला द्या, त्या भूमिकेचे तो सोनेच करणार! मुन्नाभाई एम् बी बी एस् मधला तोंडातून एकही शब्द बाहेर न काढता त्या बडबड्या चित्रपटात स्वतःच्या अभिनयाची आगळी छाप सोडून जाणारी आनंदभाईची भूमिका जगणारा सच्चा कलावंत. थरारमधला चिकित्सक, शोधक, खराखुरा वाटणारा इन्स्पेक्टर कर्णिक साकारणारा नटवर्य तर वयाच्या तिशीतच साठीतला कामेश महादेवन साकारणारा रंगकर्मी. […]