मधुराणी या माहेरच्या मधुराणी श्रीराम गोखले. अभिनय, लेखन, सूत्रसंचालन या क्षेत्रात वेगळ्या पद्धतीचं काम करणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे मधुराणी गोखले प्रभुलकर. मधुराणी गोखले प्रभुलकर यांचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. एस.पी. महाविद्यालयात असताना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळाला आणि ‘इंद्रधनुष्य’द्वारे त्यांना कला क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी मिळाली. […]
सुहास भालेकरांनी कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. त्यांनी सुरुवातीस साबाजी या नावाने लोकनाट्यांतून कामे केली. १९६०-७६ या कालखंडात शाहीर साबळे आणि पार्टीच्या अनेक लोकनाट्यांमधून भालेकर आणि राजा मयेकर या अभिनेत्यांची जोडगोळी गाजली. शाहीर साबळे आणि पार्टीच्या अनेक लोकनाट्यांचे दिग्दर्शन त्यांनी केले . सुहास भालेकर यांनी सहा दशकांहून अधिक काळ नाटक, मालिका, तसंच रुपेरी पडदा गाजवला. […]
लॉचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्याने एअर होस्टेसच्या रुपात करिअरला सुरुवात केली होती.मात्र नशिबाने ती बॉलिवूडमध्ये आली आणि एअरहोस्टेसहून अभिनेत्री बनली. विद्याला शाहरुख खान स्टारर’चक दे इंडिया’या सिनेमासाठी ओळखले जाते. ‘चक दे इंडिया’या सिनेमात विद्याने गोलकिपरची भूमिका वठवली होती. […]
कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. […]
संगीत आणि सायकॉलॉजीमध्ये एम. ए. केलेल्या विजया जोगळेकर यांना १९७२ साली अनपेक्षितपणे दूरदर्शनवर नोकरी लागली आणि त्यांच्या आवडीचं विश्व नकळतपणे हाताशी आलं. ‘किलबिल’ या कार्यक्रमासाठी याकूब सईदना मदत करत असतानाच त्या या नोकरीत कायम झाल्या आणि त्यांच्या मनातल्या कल्पनांना जणू पंख फुटले. […]
रमेश सहगल जे इश्क पे जोर नहीं (१९७०), समाधी (१९५०) आणि शोला और शबनम (१९६१) साठी प्रसिद्ध होते. रमेश सहगल चित्रपट दिग्दर्शक होते तसेच त्यांनी निर्माता, कथा लेखक, संवाद लेखक आणि पटकथा लेखक म्हणूनही काम केले. […]
हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट विनोद वीरांमध्ये केश्टो मुखर्जी यांचे नाव येते. बहुतेक चित्रपटांमध्ये केश्टो मुखर्जी यांनी मद्यपीची भूमिका साकारली होती, परंतु आपल्या जीवनात त्यांना कसलेही व्यसन नव्हते. […]
मल्टीस्टारर चित्रपटांचे निर्माते गुलशन राय यांचा जन्म २ मार्च १९२४ रोजी झाला. गुलशन राय यांचे नाव बॉलीवूडमध्ये एक चित्रपट निर्माते म्हणून स्मरणात ठेवले जाते ज्यांनी त्यांनी निर्मिती केलेल्या मल्टीस्टारर चित्रपटांमधून प्रेक्षकांमध्ये एक विशेष ओळख निर्माण केली. गुलशन राय यांनी वितरक म्हणून करिअरची सुरुवात केली. गुलशन राय यांनी त्यांच्या त्रिमूर्ती फिल्म्स बॅनर खाली १९७० मध्ये आलेल्या जॉनी […]
कच्च प्रदेशातील एका गुजराती व्यापाऱ्याने मुंबईत स्थलांतर केले. किराणा मालाचे त्यांचे छोटे दुकान होते. कल्याणजी आनंदजी ही ह्या व्यापार्याची मुले होती. मुंबईतील गिरगाव भागांत फुकट अन्नाच्या बदल्यांत एक संगीत शिक्षकाने ह्यांना संगीताचे धडे दिले. […]
जन्म.३ मार्च १९४३ रोजी सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील जायगव्हाण गावी.
सामाजिक,राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या विचारांसह सांस्कृतिक कलांचा आस्वाद सर्वसामान्यांना घेता यावा, यासाठी “उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट च्या माध्यमातून अविरतपणे कार्यरत असलेल्या माधवराव खाडिलकर हे ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका आशाताई खाडीलकर यांचे पती होत. […]