‘अजिंठा’, ‘मराठवाडा’ या दैनिकांपासून त्यांनी चित्रपट समीक्षा लेखनास आरंभ केला. महाराष्ट्रातील विविध दैनिकांत चित्रपट, दूरदर्शन या विषयावर जसे दैनिक लोकमत, सकाळ, तरुण भारत, मराठवाडा, अजिंठा इत्यादी ठिकाणी त्यांनी विपुल प्रमाणात स्तंभ लेखन केले आहे. चित्रपट समीक्षक म्हणून आजवर त्यांनी तब्बल ३३६५ मुलाखती घेतल्या आहेत. चित्रपट विषयास वाहिलेला नवरंग रुपेरी नामक दिवाळी अंकाची स्थापना त्यांनी १९८७ साली केली व जवळपास ३० वर्षे त्याचे संपादन केले. […]
वसंत निनावे यांनी आकाशवाणी साठी अनेक श्रुतिका लिहिल्या. त्या श्रुतिका नीलम प्रभू, बाळ कुरतडकर यांच्या सारख्या दिग्गज रेडिओ कलाकारांनी सादर केल्या होत्या. पुढे याच श्रुतिका ‘आकाशप्रिया’ या नावाने त्या पुस्तक रूपात प्रसिद्ध झाल्या, आणि या पुस्तकाला राज्य शासनाचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला होता. […]
हरू स्टेडियममध्ये मार्च १९७१मध्ये झालेल्या राजस्थानविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी २५० धावांची खेळी केली होती. ही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यानंतर १९७१-७२च्या मोसमात ५१.६०च्या सरासरीने ५१६ धावा, १९७२-७३च्या मोसमात ५६.४५च्या सरासरीने ६२१ धावा केल्या होत्या. स्थानिक क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांना १९७४मध्ये विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. […]
एक कठोर पोलिस अधिकारी अशी त्यांनी ख्याती होती. तिहार तुरुंगात अधिकारी असतानाही त्यांनी अनेक योजना यशस्वीपणे राबवून दाखविल्या. एक महिला पोलीस अधिकारी म्हणून संपूर्ण कारकिर्दीत प्रवाहाविरुद्ध पोहण्याची आणि कार्यकर्तृत्वासाठी नवी क्षेत्रे स्वीकारण्याची हिंमत किरण बेदींनी दाखवली आहे. किरण बेदी यांच्या पतीचे नाव ब्रीज बेदी […]
आत्म निर्भर हा शब्द कोव्हीड साथीने आपल्यात रुजवला.पण ही संकल्पना ४०वर्षांपूर्वीच यांनी विशाखापट्टणम जिल्ह्यातील ५०हून अधिक खेडी आत्मनिर्भर करुन ही कल्पना वास्तवात येऊ शकते याचा भक्कम पुरावा दिला होता. अमेरिकेत संशोधन किंवा नोकरीची संधी सोडून मायभूमीत परतून देशसेवा करण्याचा पर्याय निवडल्याबाबत त्यांनी जराही खंत नव्हती. कारण त्यांचे ध्येय पक्के होते. दृष्टी ठाम होती, त्यामुळेच ते असामान्य होते. […]
सुनील गावस्कर हे डेरेक अंडरवुड यांची १२ वेळा ‘शिकार’ठरले होते. डेरेक अंडरवुड यांची गोलंदाजी इतकी सफाईदार होती की, त्यांनी आपल्या संपुर्ण क्रिकेट कारकिर्दीत एकही वाईड चेंडू टाकला नाही. […]
तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे गुरुशिष्य परंपरेमध्ये त्यांनी शिक्षण घेतले होते. भिलारे यांनी भारतभरात वेगवेगळ्या सुप्रसिद्ध संगीत महोत्सवांमध्ये पखवाज सोलो वादन केले होते, तसेच त्यांनी पंडित जसराज, राहुल शर्मा, उल्हास पं. कशाळकर अशा दिग्गजांना साथ दिली होती. […]
नवकाव्य”,”नवकथा”,”सौंदर्यमीमांसा”,”अस्तित्ववाद”,”चित्रकलेतील नवप्रवाह” अशा वेगवेगळ्या विचारप्रणालींचे उत्खनन करून त्यात आपल्या बुध्दीचा व तात्विक निकषांचा अर्क टाकून त्याचा अर्थ सुध्दा रसिकां पर्यंत पोहोचविला. दिनकर बेडेकरांच्या लेखणीने त्यांच्या नियमित वाचकांच्या मनातील प्रगल्भ विचारांची दालने उघडण्याचा सदैव प्रयत्न केला, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. […]
मराठीमध्ये काम करता करता ‘पानीपत’ या बिग बजेट ऐतिहासिक हिंदी चित्रपटामध्ये गश्मीर महाजनीने एका वीर मराठा योद्धाची भूमिका केली होती. गश्मीर महाजनीने आपल्या वडिल रवींद्र महाजनी यांच्या बरोबर ‘पानिपत’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. गश्मीरने ‘जनकोजी शिंदे’ तर रवींद्र महाजनी यांनी ‘मल्हारराव होळकरांचे’ काम केले आहे. […]
गेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज व प्रसन्न मुद्रा असलेले, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून त्या काळात ती सोडण्याचे धाडस दाखवलेले, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या नाटय़संस्थेतून काही काळ नाटकांशी जोडले गेलेले आणि हजारो जाहिराती, माहितीपट-लघुपट यांचा ‘आवाज’ असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक-सूत्रसंचालक. […]