एस. एन. डी. टी. महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख असणार्या डॉ.मालशे यांनी फादर स्टीफन्स यांच्या ख्रिस्त पुराणावर विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ आणि ‘मराठी संशोधन पत्रिके’चे ते संपादक होते. […]
हेमकांत नावडीकर यांनी २६ एप्रिल २०२० रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘संगीत संवाद रेडिओ’ या ‘इंटरनेट रेडिओ’ला सुरवात केली आहे. संगीत संवाद या इंटरनेट रेडिओवर २४७ शास्त्रीय संगीत ऐकता येते. याला जगभरातून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. श्रोत्यांकडून तर त्याला उत्तम प्रतिसाद आहेच, पण कलाकारांकडून ही उत्तमोत्तम ध्वनिमुद्रणे उपलब्ध करून देण्यात त्यांचाही खूप मोलाचा वाटा आहे. […]
देवरूख येथील अक्षय पाटील याने बनवलेल्या ‘अजाण’या लघुपटाला कुणालने आपल्या मित्रांच्या सोबत संगीत दिले आहे. हा लघुपट नाशिक येथील फेस्टिव्हल मध्ये दाखवला गेला होता. […]
कवी प्राजक्त यांची ग्रेवयार्ड लिटरेचर, मीरा, लालनाक्या ही ईपुस्तके प्रकाशित झाली आहे. शिवाय आता त्यांचा “we चार” ह्या काव्यवाचनाचे प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यांच्या काव्याला तरूण रसिकांचा उदंड प्रतिसाद आहे.
देवबाभळी या पुस्तकाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्राजक्त देशमुख हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेलं संगीत देवबाभळी हे नाटकही प्रसिद्ध झालं आणि लोकप्रिय ठरलं. […]
पतंग, चेंडू नि शिपला, फेनाली, अरेबियन नाइट्स, चंद्रफुले, एका पांघरुणाची गोष्ट, हॅन्स ॲन्डरसनच्या परीकथा, जिमी, लालझंडी छोटी नीरा, छोटा लाल बूट, किलबिल, गंमतीदार किटली, अलिबाबाची गुहा, पोपटदादाचे लग्न, असं त्याचं लेखन प्रसिद्ध आहे. […]
१९६९ साली म्युन्सिपल नाट्यस्पर्धेत ‘सुतक’ नावाची एकांकिका त्यांनी लिहिली. या स्पर्धेतत्यांच्या लिखाणाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्यानंतर वामन तावडे यांनी ‘छिन्न’ हे दोन अंकी नाटक लिहिले. हे नाटक सदाशिव अमरापूरकर यांच्या वाचनात आले आणि त्यांनी ते स्पर्धेसाठी घेतले. या नाटकाचा प्रवास पुढे वामन तावडे यांच्या नाट्यलेखनातील कारकिर्दीला पुढे घेऊन गेला. वामन तावडे यांच्या ‘छिन्न’ या नाटकाने अनेक पारितोषिके मिळवली. […]
महेश म्हात्रे यांनी आपले महविद्यालयीन शिक्षण मुंबईपासून शंभर किलोमीटर दूर असलेल्या वाडा गावात पूर्ण केले. तिस वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असणाऱ्या म्हात्रे यांचे शिक्षण एम ए (इतिहास) पर्यंत झाले असून, आज ते भारतातील ज्येष्ठ पत्रकार मानले जातात. महेश म्हात्रे यांचा पत्रकारितेचा प्रवास दैनिक मुंबई सकाळ मधुन सुरु झाला. तिथे त्यांनी केेलेल्या शोधपत्रकारितेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आदिवासीबहुल जव्हार-मोखाडा परिसरातील कुपोषण, गुजरात मधील अटक वॉरंट रॅकेट आदी बातम्यांमधून त्यांचे नाव राष्ट्रीय पातळीवर गेले. त्यानंतर म्हात्रे यांना राज्यातील राजकीय घडामोडींवर लिहिण्याची संधी ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकातून मिळाली. […]
२०१५ मध्ये श्री लंकेत पहिली टेस्ट खेळताना आठ कॅच पकडून त्याने विश्व विक्रम प्रस्थापित केला होता. रहाणेने या सामन्यातच्या पहिल्याि डावात करुणारत्ने, थिरिमाने, चांडीमल यांना झेलबाद केले. व दुस-या डावात प्रसाद, संगकारा, थिरिमाने, मुबारक आणि हेराथ यांनाही त्यााने झेलबाद करून तंबूत धाडले होते. नोव्हेंबर २०१९ रोजी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रहाणेने ८६ चेंडूंत १७२ धावा फटकावत ९ वेळा चौकार मारला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे २१ वे कसोटी अर्धशतक ठरले. […]
सायकली जमवता जमवता विक्रम यांच्या संग्रहात लहान मुलांच्या तीन चाकी सायकल, सायकलींचे विविध सुट्टे भाग, पेडल कार्स, कुलूपे,घड्याळे,रेडिओ, ग्रामोफोन,रेकॉर्ड प्लेअर, टाईप रायटर,टेलिफोन, विविध आकारांच्या आणि रंगाच्या काचेच्या बाटल्या, अडकित्ते आणि पानाचे डबे जुनी वजने व मापे आणि अनेक घरगुती वस्तू यांचादेखील समावेश झाला आहे. […]
अण्णासाहेब हि कंपनी सुरु करण्यासाठी तयार झाले मात्र त्यापूर्वी त्यांनी १९१० ते १९१२ पर्यंत या इन्शुरन्स व्यवसायांवरील पुस्तके अमेरिकेतून मागवून त्यांचा सांगोपांग अभ्यास केला. त्यांचे मित्र वामनराव गोवईकर यांनी त्या काळी पंचवीस हजार रुपयांचे रोखे कंपनीस दिले. त्या बळावर कंपनी मुंबईस रजिस्टर झाली आणि मगच १९१३ सातारा शहरात ‘वेस्टर्न इंडिया लाइफ इन्श्युरन्स कंपनी’ची (विलिको) अस्तित्वात आली. […]