वाङ्मयीन कथा ही चित्रपटासाठी आवश्यक असते कारण ती शाश्वत असते, ही वसंतरावांची महाराष्ट्र फिल्म कंपनीपासून पक्की झालेली भावना. त्यानुसार त्यांनी प्रसिद्ध ग्रामीण कादंबरीवर ‘टिळा लाविते मी रक्ताचा’ हा ग्रामीण चित्रपट दिग्दर्शित केला. जयश्री गडकर, सूर्यकांत, राजशेखर यांनी कामे केलेला हा चित्रपट गाजला. यानंतर परत अण्णाभाऊंच्या कादंबरीवर वसंतरावांनी ‘वारणेचा वाघ’ हा चित्रपट केला. तोही यशस्वी झाला. द. का. हसबनीस या साहित्यिकाने लिहिलेला, ४२च्या स्वातंत्र्य चळवळीवरील ‘सुगंधी कट्टा’ हा तमाशाप्रधान चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. पण ‘पाच नाजूक बोटे’ या लोकप्रिय लेखक बाबा कदम यांच्या कथेवरील रहस्यमय चित्रपट होय. यानंतर मात्र वसंतरावांनी स्वत:ची चित्रपटनिर्मिती सुरू केली. बाबा कदमांच्याच कथेवर त्यांनी ‘दगा’ हा चित्रपट काढला. ‘ग्यानबाची मेख’ हा विनोदी चित्रपट काढला. […]
अनेक स्पर्धांपैकी एका स्पर्धेचे परीक्षक म्हणून चंद्रकांत कुलकर्णी आले होते. त्यांनी त्यांचा अभिनय पाहिला आणि बिनधास्त चित्रपटासाठी विचारले. ह्या चित्रपटामुळे त्यांची अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. चित्रपटासाठी त्यांना व्हिडिओकॉन स्क्रीन आणि फिल्मफेअरची अभिनयाची पारितोषिके मिळाली. पण त्यांचा पहिला चित्रपट मात्र ‘सरकारनामा’ हा होय. १९९९ मधील चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘बिनधास्त’ चित्रपटानं तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटामधील ‘वैजयंता’ ही भूमिका गाजली. ‘मायबाप’, ‘पाश’, ‘कायद्याचं बोला’, ‘सरकारनामा’, ‘मिशन चॅम्पियन’, ‘सावरखेड एक गाव’ हे तिचे काही उल्लेखनीय चित्रपट. […]
भाऊंनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे, दुर्मीळ चित्रं, नाणी, ताम्रपट, शस्त्रे इ. वस्तूंचा संग्रह केला. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते व पुढे उपाध्यक्ष झाले. वेगवेगळ्या परिषदांत त्यांनी प्राच्यविद्येच्या संदर्भात अनेक शोधनिबंध सादर केले. मुकुंदराज, हेमाद्री, हेमचंद्र इ. व्यक्तींचे तसेच कालिदासांचा कालनिर्णय आणि शिलालेख व ताम्रपट यावरील त्यांचे शोधनिबंध अभ्यासपूर्ण होते. माक्स म्युलर व रा. गो. भांडारकर यांनी या शोधनिबंधांविषयी गौरवोउद्गार काढले आहेत. कालिदासाचे कुमारसंभव व मेरुतुंगाचार्याचा प्रबंध, चिंतामणी हे ग्रंथ त्यांनी संपादित केले. तथापि त्यांनी लिहिलेला एकही स्वतंत्र ग्रंथ नाही. त्यांच्या मरणोत्तर रामचंद्र घोष यांनी द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या शीर्षकाने त्यांचे संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिद्ध केले. […]
भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा या चित्रपटातील छोट्या सीतेच्या भूमिकेपासून त्यांच्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात झाली. थोरातांची कमळा या चित्रपटात त्यांनी प्रथमच नायिकेची भूमिका केली. त्यानंतर नायिका म्हणून त्यांनी सुमारे १५ वर्षे काम केले. मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावा, अंगाई, काका मला वाचवा, शेवटचा मालुसरा, मल्हारी मार्तंड, स्वयंवर झाले सीतेचे, भालू असे ८० हून अधिक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. अभिनेते-दिग्दर्शक प्रकाश भेंडे हे त्यांचे पती. लग्नानंतर प्रकाश भेंडे यांनी सुरू केलेल्या श्री प्रसाद चित्र या संस्थेच्या माध्यमातून भालू, चटक चांदणी, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार या चित्रपटांची त्यांनी निर्मिती व चित्रपटांमधून त्यांनी काम केले. […]
शिवाजी मंदिरच्या सांस्कृतिक कार्य परंपरेत त्यांचे मोलाचं योगदान होते. नाटक, मालिका, चित्रपट, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोठा मित्र परिवार होता.श्री शिवाजी मंदिरचे अध्यक्ष आणि कलर वाहिनीवरील कॉमेडी एक्स्प्रेस चे निर्माते, दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर आणि गीतसुगंध या संगीताच्या कार्यक्रमाची सर्वेसर्वा अक्षदा विचारे यांचे ते वडिल होत. […]
अग्निहोत्र तसेच कुंकू या मालिकेत प्रमुख भूमिकेत मृण्मयीने काम केले. कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, अनुराग, फर्जंद या चित्रपटातील तिच्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांनी कौतुक केले. तसेच एक कप च्या, मोकळा श्वास, संशय कल्लोळ, धाम धूम, आंधळी कोशिंबीर, पुणे व्हाया बिहार, साटं लोटं पण सगळं खोटं, मामाच्या गावाला जाऊया, कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, अनुराग, बेभान, फर्जंद आदी चित्रपटात मृण्मयीने अभिनय करुन प्रेक्षकांचं मन जिंकलं. […]
जन्म. ३० मे १९१५ बांदे सावंतवाडी संस्थान येथे. अप्पा गोवेकर यांचे शिक्षण बांदा येथेच झाले. १९३० ते मिडल स्कूल, बांदा येथून प्राथमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. १९२८ साली सावंतवाडी संस्थानच्या आंतरशालेय क्रीडास्पर्धेत १५ वर्षाखालील गटात पाच मैल धावस्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक त्यांनी पटकावले. १९३० साली या गटात सर्वोच्च बहुमान प्राप्त केला. त्यांचे वडील नारायणराव गोवेकर हे […]
साधारण २००० साली ‘निर्धार’या संस्थेच्या श्रीमती शीला पद्मनाभन यांनी नागरिकांना एक आवाहन केले की, त्यांना स्कूल गेट व्हॉलेंटियर हवेत. कल्पना अशी होती की, शाळा भरताना आणि सुटताना शाळेसमोरील रस्त्यावर हे कार्यकर्ते विद्यार्थ्यांची सुरक्षा सांभाळतील आणि ट्राफिक कंट्रोल करतील. प्रभा नेने या आजींनी आपले नाव त्यासाठी नोंदवले आणि त्यांनी ह्या सेवेस सुरवात केली. सकाळी ७-७.३० वाजता सिंबायोसिस शाळेबाहेर उभ्या राहून बेशिस्त वाहतुकीतून मुलांना सुखरूप शाळेत वा रिक्षेपर्यंत पोहचवणे. प्रसंगी वाहतूक थाबवून मुलांना रस्ता करून देणे हे सुरु झाले. […]
बादशाह पाचवे जॉर्ज हिंदुस्थान भेटीस ५ डिंसेबर १९११ रोजी आले, त्या वेळी त्यांच्यासाठी एलिफंटा (घारापुरी) बेटाची मार्गदर्शिका देवदत्तांनी तयार केली. अखंड शिळेतून एकसंघ कोरुन काढलेल्या त्रिमुर्ति-मंदिराचे वैशिष्ट्य तीत स्पष्ट केले आहे. देवदत्तांचे अत्यंत महत्त्वाचे संशोधन म्हणजे विदिशा जवळील बीसनगर येथील उत्खनन आणि त्यात सापडलेला ‘खाम् बाबा पिलर’ हा गोलाकार स्तंभ. ग्रीक राजदूत हीलिओडोरस याने आपल्या वासुदेवभक्तीचे आदरचिन्ह म्हणून हा स्तंभ उभारला. तो दोन पोलादी पट्टयांवर उभा आहे. आजूबाजूचे बांधकाम पक्क्या विटांचे, चुनखडीच्या गिलाव्याचे आहे. […]
दलाल १९३८च्या सुमारास बा. द. सातोस्कर यांच्या सागर प्रकाशनासाठी काम करू लागले. मामा वरेरकर यांच्या ‘वैमानिक हल्ला’ या पुस्तकासाठी दलालांनी पहिले मुखपृष्ठ केले. त्याच टिपणात नेमकेपणाने म्हटले आहे, पुस्तकाची मुखपृष्ठे आणि आतील चित्रे म्हणजे, फक्त सजावट नसते, तर पुस्तकाचा आशय दृश्य प्रतिमांनी समृद्ध करणारी, पुस्तकाला व्यक्तिमत्त्व देणारी, पुस्तकाशी संवादी अशी ती नवनिर्मिती असते. याची जाणीव दलालांच्या मुखपृष्ठांनी प्रथम दिली. […]