नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

सिलोन रेडिओचे निवेदक गोपाल शर्मा

‘गोपाल शर्मा’ यांनी काही खास शब्द वापरात आणले. ‘आवाज की दुनियाके दोस्तो’ हा शब्दप्रयोग त्यांचाच. (त्यांच्या आत्मचरित्राचं नावही हेच आहे. ) ‘शुभाशिष’, ‘शुभरात्री’, ‘बंधूवर’ हे शब्दही त्यांनीच प्रथम रेडीओवर आणले.
‘शहाजहाँ’ चित्रपटातील कुंदनलाल सैगल यांच्या एका गीतात, महंमद रफींचा अल्प सहभाग आहे. ‘अपनी पसंद’ या कार्यक्रमात गोपालजींनी हे गाणं लावलं आणि रफीचा आवाज असलेली ती ओळ त्यांनी श्रोत्यांना लागोपाठ तीन-चार वेळा ऐकवली. […]

वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई

त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात टाइम्स ऑफ इंडियापासून केली आणि वयाच्या २६ व्या वर्षी ते मुंबई आवृत्तीचे सिटी संपादक होते. सहा वर्षे टाईम्स ऑफ इंडिया मध्ये नोकरी केल्यावर राजदीप सरदेसाई यांनी १९९४ मध्ये न्यू दिल्ली टेलिविझन (एनडीटीव्ही) मध्ये संपादक म्हणून नोकरीला सुरुवात करून टेलिव्हीजन पत्रकारिता मध्ये त्यांनी पदार्पण केले. आपली स्वत: ची कंपनी ग्लोबल ब्रॉडकास्ट न्यूज (जीबीएन) तयार करण्यासाठी त्यांनी एनडीटीव्ही सोडली. […]

प्रख्यात मल्ल गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव

वस्ताद जुम्मादादांचे शिष्य व अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव करणाऱ्या माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक व शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमध्येही त्यांनी गावोगावी व्यायामशाळा स्थापन केल्या. […]

आकाशवाणीवरील वनिता मंडळ आणि नाटय़ विभागाच्या निर्मात्या उमा दीक्षित

सामाजिक, कौटुंबिक, आरोग्यदायी जाणिवांचे प्रतिबिंब वनितामंडळाच्या विविध कार्यक्रमांतून आणि नभोनाटय़ाच्या निर्मितीतून घडू लागले. ‘अहो प्रपंच’ ही कौटुंबिक मालिका, ‘मंत्र जगण्याचा’ ही ९५ भागांची दीर्घमालिका, रंगभूमीचा इतिहास सांगणारे ‘असं घडलं नाटक’ व ‘किस्से रंगभूमीचे,’ ‘या चिमण्यांनो परत फिरा रे,’ ‘पैठणी’, ‘मातृरूपेण’, ‘विठूच्या या तुळशीच्या मंजिऱ्या’, ‘लेकीचा गं जलम’, ‘स्वयंप्रकाशिता’ अशा असंख्य मालिकांतून अनेक विषय हाताळले. […]

भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री नितीन गडकरी

१९७६ मध्ये नितीन गडकरी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. वयाच्या २३व्या वर्षी ते भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) चे अध्यक्ष झाले. १९८९ मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेवर प्रथम निवडून गेले.२० वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले. […]

कवी मनोहर ओक

‘आयत्या कविता’ हा काव्यसंग्रह ‘अंतर्वेधी’ (१९७९) आणि ‘चरसी’ या दोन कादंबऱ्या’ प्रकाशित झाल्या आहेत. ओक यांच्या निधनानंतर त्यानंतर ३ वर्षांनी ज्येष्ठ कवी व समीक्षक चंद्रकांत पाटील आणि तुळसी परब यांनी ओक यांच्या कवितांचे संपादन करून ‘मनोहर ओकच्या ऐंशी कविता’ हा संग्रह तयार केला. […]

कथा लेखक ग. ल. ठोकळ

साताऱ्याकडील ग्रामीण पार्श्वभूमीवरची, बेचाळीसच्या क्रांतिपर्वावर आधारलेली त्यांची ‘गावगुंड’ ही कादंबरी खूप गाजली. काही विद्यापीठांनी तर तिचा आपल्या अभ्यासक्रमातही समावेश केला. या काळात र. वा. दिघे यांच्या साहित्याने आपण झपाटले गेलो होतो असे ठोकळ सांगतात. अर्धशतकापूर्वी लिहिलेल्या ‘कडू साखर’, ‘गोफणगुंडा’, ‘निळे डोळे’, ‘सुगंध’, ‘मोत्याचा चारा’सारख्या ठोकळांच्या कथा आजही तितक्याच हृद्य, वेधक वाटतात. दिघ्यांच्या कादंबऱ्यांमधले अद्‌भुतरम्य आणि रोमांचकारक वातावरण काही प्रमाणात ‘गावगुंड’ मध्ये अवतरले आहे.’ […]

अभिनेता दिलीप जोशी

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतीलच एक महत्त्वाचं पात्र म्हणजे जेठालाल गडा. ‘जेठालाल गडा’, ‘दया’ आणि त्यांच्या कुटुंबाभोवतीच या मालिकेचं कथानक फिरतं. १९९७ मध्ये क्या बात है या टी.व्ही. मालिकेतून दिलीप जोशी यांनी करिअरला सुरुवात केली. […]

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक

जागतिक मंदी आणि सामाजिक भारत, जागतिक मंदी आणि आपण, जागतिक मंदी आणि आपली गुंतवणूक, अर्थसंकल्पीय विष्लेषण, अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक, भारतीय भांडवल बाजार: २०१० आणि नंतर, आर्थिक घोटाळे आणि आम्ही, गुंतवणुकीचे समाजशास्त्र, गुंतवणूकीचे मानसशास्त्र, गुंतवणुकीतील धोक्यांचे नियोजन, स्वेच्छानिवृत्तीचे आव्हान, बदलते अर्थकारण – बदलते समाजकारण, जे.आर.डी. टाटा : शतकोत्तर विचार, आजच्या संदर्भात लोकमान्य टिळक, ‘वंदे मातरम्’चा कालखंड, आजच्या संदर्भात वंदे मातरम् , आजचे अध्यात्म, चला नवा भारत घडवूया, राष्ट्रनिर्मितीचे आव्हान, राष्ट्रवादाची बदलती संकल्पना, अल्केमिस्ट टू सी गल, व्हाया यू कॉन विन अशा विविध विषयांवर चंद्रशेखर यांची व्याख्याने झाली आहेत. […]

1 45 46 47 48 49 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..