मराठीतील कोसला, वाडा चिरेबंदी, बलुतं अशा दर्जेदार पुस्तकांचा त्यांनी फ्रेंचमध्ये अनुवाद केला आहे तर वेटिंग फॉर गोदो, लस्ट फॉर लाइफ, हॅनाज सूटकेस अशी जगप्रसिद्ध पुस्तके मराठीत आणली आहेत. आमची शाळा, बाबाच्या मिश्या, हॅनाची सुटकेस, हात मोडला, जादुगार आणि इतर कथा, कोकरू, फ्लॅट नंबर थर्टी सिक्स, लिहावे नेटके, मासोळी आणि चिमुकलं पाखरू, मोठी शाळा, मुखवटे, पाचवी गल्ली, शाम्याची गंमत व इतर कथा, सिल्व्हर स्टार, सुपरबाबा, Yash Big School, Yash Guest, झाडं लावणारा माणूस, चित्रवाचन, कंटाळा, मामाच्या गावाला, मोतिया, सख्खे शेजारी, वाचू आनंदे, व्हिन्सेट व्हॅन गॉग, परी मी आणि हिप्पोपोटॅमस, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. […]
‘पॅपिलॉन’ या पहिल्याच अनुवादित पुस्तकामुळे अफाट प्रसिद्धी मिळालेल्या गुर्जरांची आजपावेतो ३५ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांनी केलेले सत्तर दिवस, गॉडफादर, सेकंड लेडी, बँको, कोमा, चार्ली चॅप्लिन, अल्बर्ट आइन्स्टाइन, इस्राइलची गरुडझेप, दी स्पाय हू केम इन फ्रॉम दी कोल्ड, दी पेलिकन ब्रीफ, फर्स्ट टू डाय, सुवर्णयोगी यांसारखे एकाहून एक सरस अनुवाद तुफान लोकप्रिय ठरले आहेत. […]
मुसोलिनीने विरोधकांना सोडले नाही. त्याने विरोधी पक्ष बरखास्त केले. त्यांच्या कार्यालयांना कुलूप ठोकले. त्यांचा इतका छळ केला की अनेक जण देश सोडून पळून गेले. एखाद्या विरोधकाला पकडले तर त्याला स्वतःचा बचाव करण्याचा, अपील करण्याचा हक्क देणारे कायदेच बदलून टाकले. कुणीही विरोधात बोलले की, मुसोलिनी ‘राष्ट्रवाद’चा मुद्दा सांगायचा. त्याने विरोधी पक्षाला तर संपवलेच, पण स्वतःच्या फॅसिस्ट पक्षातील त्याच्या विरोधकांच्या तोंडालाही कुलूप लावले. त्याच्या पक्षातील मातब्बर नेता दीनो ग्रांदीला राजदूत म्हणून लंडनला पाठविले, लिआंद्रो अर्पिनाती याला लिपारी बेटावर धाडले, सोफानी याला मंत्रिमंडळात स्थानही दिले नाही. अशा तऱ्हेने मुसोलिनीची कार्यपद्धती सुरू होती. […]
एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविलं होतं. सर्वप्रथम १९८५-९०, नंतर १९९०-९५ आणि नंतर १९९९-२००४ अशी त्यांची आमदारकीची कारकीर्द राहिली. धारावी मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केल. दरम्यान १९९३ ते ९५ या काळात ते राज्यमंत्री राहिले. यानंतर १९९९ ते २००४ त्यांनी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार, उच्च व तंत्रशिक्षण अशी विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. […]
सद्दाम हुसेन हे भारताचा मोठा फॅन होते. सद्दाम हुसेन प्रोग्रेसिव्ह विचाराचे होते. त्यांच्या काळात मुलीना शिक्षणासाठी बंदी नव्हती. मुली आधुनिक कपडे घालू शकत होत्या, नोकरी करू शकत होत्या. इंदिरा गांधीसारखी महिला भारतासारख्या मोठ्या देशावर राज्य करते याचे त्यांना आश्चर्य वाटायचं. इंदिराजी जेव्हा इराक दौऱ्यावर गेल्या होत्या तेव्हा त्यांची सुटकेस सुद्धा सद्दाम हुसेन यांनी उचलली होती. काश्मीर प्रश्नी पाकिस्तानच्या विरुद्ध भारताला पाठींबा देणारा सद्दाम हुसेनच होते. अस म्हणतात की भारताच्या प्रेमातुन त्यांनी आपल्या थोरल्या मुलाचं नाव उदय ठेवलं. […]
हिंदुत्व विचारसरणीचा पगडा असलेल्या अपर्णा रामतीर्थकर यांनी सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदाऱ्या’ यासारख्या विषयांवर २००८ पासून तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली होती. तुटणारी घरं वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे, या भावनेने त्या कार्य करत होत्या. […]
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सांगली आकाशवाणी येथे आवाजाची चाचणी दिली आणि निवेदिका हा त्यांचा प्रवास सुरु झाला. सुरवातीला त्यांना फक्त आकाशवाणीची उद्घोषणा, रूपरेषा इतकंच काम असायचं. पण नंतर स्मिता गवाणकर यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळाली व त्यामुळे निवेदन या कलेची छान ओळख झाली. त्याच दरम्यान स्मिता गवाणकर यांनी मुंबई दूरदर्शन मध्ये रीतसर परीक्षा देऊन नोकरीला सुरुवात केली. […]
ॲगव्हेन्यूजमध्ये असताना कुकडे यांनी अनेक ब्रॅण्ड्ससाठी जाहिराती केल्या, त्यांपैकी ओनिडा टीव्ही, पानपसंद ही पानाचा स्वाद असलेली गोळी, स्कायपॅक कुरियर्स, यूएफओ जीन्स, व्हीआयपी फ्रेंचीसारखी अंडरवेअर्स ही कामे विशेष गाजली. […]
मॅक्लीन यांच्या २८ कादंबऱ्या आणि काही कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. स्वत:च्या कादंबऱ्यावर आधारित काही पटकथाही त्यांनी लिहिल्या आहेत. १९८३ साली ग्लासगो विद्यापीठाकडून त्यांना साहित्यासाठी डॉक्टरेट देण्यात आली. […]
१९६५ च्या दरम्यान जिआन पाओलो डालारा, पाओलो स्टान्झानि आणि बॉब वॉलेस या लॅम्बोर्गिनीच्या तरुण इंजिनीअर्सना एक रेसिंग कार निर्माण करण्याची इच्छा होती. लॅम्बोर्गिनीने एक रेस कार तयार करावी यासाठी ते फेरुचिओ यांचा पिच्छा पुरवीत होते. मात्र फेरुचिओ यांचा रेस कार तयार करण्यासाठी सक्त विरोध होता. […]