जन्म. २४ एप्रिल १९४७ अरुण काकतकर हे एक चालते बोलते सांस्कृतिक केंद्र आहे. ते दूरदर्शन वर नोकरीत असताना त्यांचे मुंबईतले घर म्हणजे अनेक मराठी कलाकारांचे मुंबईत उतरण्याचे हक्काचे ठिकाण होते. अरुण काकतकर हे नांव आता पन्नाशीच्या अलिकडे पलिकडे असणाऱ्या सर्व मराठी माणसांच्या डोळ्यांपुढचं नांव. सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत दूरदर्शनच्या सुवर्णकाळातले ते निर्माते. प्रतिभा आणि प्रतिमा, सुंदर […]
चितळे ग्रुपचा अवघ्या ३१ वर्षांचा तरुण सी.ई.ओ. इंद्रनील गेली दहा वर्षे या ग्रुपचा कारभार पाहत आहे. चव, दर्जा आणि विश्वास या त्रिसूत्रीला पुढे नेत त्यात स्वतःच्या इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट स्किल्सची भर टाकून त्याने आपल्या एक दशकाच्या कारकिर्दीतील ग्रुपची उलाढाल (टर्नओव्हर) दुपटीहून अधिक वाढवली, शिवाय खाद्य पदार्थ टिकवण्याच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करून पुण्याची बाकरवडी अमेरिकेत पोहोचवली आणि वर्ष-वर्ष टिकवली. […]
‘सविता दामोदर परांजपे’, ‘तू फक्त हो म्हण’, ‘नकळत सारे घडले’ या सारखी नाटके शेखर ताम्हाणे यांनी लिहिली. तसेच त्यांनी ‘कलकी’, ‘ट्रॅक’ यासारख्या गाजलेल्या मालिकाचे लेखन केले होते.त्यांची ‘आगंतुक’ कादंबरीचा पण गाजली होती. […]
१९९७ साली सरनाईक राष्ट्रवादीचे सदस्य झाले आणि त्यांनी सक्रीय राजकरणामध्ये उडी घेतली. ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरातून ते तीन वेळा पालिकेवर निवडून गेले होते. २००८ मध्ये त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. लगेचच २००९ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले आणि ते ठाण्यातून आमदार झाले. […]
फेणे यांनी प्रामुख्याने कथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारांमध्ये अधिक लेखन केले आहे. सर्वसामान्य माणसाचे अनुभवविश्व प्रत्ययकारक रीतीने या लेखनातून प्रकट होते. व्यक्तीपेक्षा समूहाला केंद्रस्थानी ठेवणारे हे लेखन मराठी साहित्यामधील प्रवृत्तीप्रवाहांच्या पलीकडे वावरणारे आहे. त्यांच्या महत्त्वाच्या पुस्तकांमध्ये सेंट्रल बस स्टेशन, सहस्रचंद्रदर्शन, विश्वंभरे बोलविले या कादंबऱ्या तसेच देशांतर कथा, ध्वजा, हे झाड जगावेगळे, ज्याचा त्याचा क्रूस, मावळतीचे मृद्गंध, निर्वासित नाती, पहिला अध्याय, पाणसावल्यांची वसाहत, शतकान्तिका या कथासंग्रहांचा समावेश आहे. […]
माधव गोडबोले हे एक सचोटीचे, कर्तव्यदक्ष, नियमानुसार काम करणारे सनदी अधिकारी होते.. पक्के सेक्युलर पण सनदशीर लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. गृहसचिव म्हणून निवृत्त व्हावे लागल्यावर ‘द अनफिनिश्ड इनिंग्ज ‘ हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक चांगलेच गाजले. […]
पेठकरांच्या कामाच्या पद्धतीवर खूश होऊन मुंबईच्या प्रकाश पिक्चर्सच्या विजय भट्ट यांनी पेठकरांना मोठा मोबदला देऊन मुंबईला आणले व ‘शादी की रात’ हा हिंदी चित्रपट त्यांच्या हातात दिला. त्यात गीता बाली, रेहमान, अरुण यांसारखे आघाडीचे कलाकार होते. सुधीर फडके यांनी त्यांना ‘रत्नधर’ हा आपला चित्रपट दिला. चित्रपट उत्कृष्ट जमला होता, पण भागीदारांच्या भांडणामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही. ‘अपराधी’चा नायक असणाऱ्या राम सिंग यांनी पेठकरांना ‘सौ का नोट’ हा आपला चित्रपट दिग्दर्शनासाठी दिला. त्यात गीता बाली, करण दिवाण, बेगमपारा हे कलाकार होते. […]
भारतातील सर्व संगीत महोत्सवासह भारताबाहेर यूरोप, अमेरिका, इग्लंड, ऑस्ट्रेलिया, द दक्षिण अफ्रीका, रशिया, चीन आदी देशांमध्ये आपली कला सादर करुन रसिकांची वाहवाही मिळवली आहे. भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताचे फ्युजन करण्याचे अनेक प्रयोग इतर भार परदेशी कलाकारांच्या साथीने ‘Vibgyor’,’ताल यात्रा’, ‘साउंड ऑफ इंडिया ‘माईल्स फ्रॉम इंडिया’ अशा कार्यक्रमातून सादर करून त्यांनी संगीत क्षेत्रातील ही वेगळी वाट सुद्धा समर्थपणे हाती आहे जी रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. […]
त्यांना लहानपणापासूनच गांधीजींचे रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळेच त्यांना रिचर्ड ॲटनबरो यांच्या ‘गांधी’ (१९८२) या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी कॉश्चूम डिझाईन करण्याची संधी मिळाली. देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथय्या यांचा ऑस्कर प्रवास थक्क करणारा होता. […]
उल्हास कशाळकर, अजय पोहनकर, आशा खाडिलकर आणि इतर कलाकारांचे ते गुरू होत. नागपूर महानगरपालिकेने नागपूरच्या गोकुळ पेठेमध्ये रहात असलेल्या रस्त्यास त्यांचे नाव दिले आहे. […]