खेळण्यांच्या दुनियेत दीर्घकाळ दबदबा असलेली आणि आबालवृद्धांना आजही मोहिनी घालणारी बार्बी बाहुली साठ वर्षांची झाली. सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्यांची अतिशय कमनीय बांध्याची ही बार्बी आजही बाहुली साम्राज्यातील सम्राज्ञी मानली जाते. या काळात तिची अनेक रूपे सामोरी आली. गोरीपान पासून काळी कुट्ट अश्या विविध वर्णात ती दिसली असली तरी आजही सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्याची तिची प्रतिमाच अधिक लोकप्रिय आहे. […]
रमाकांत देसाई हलकाच रनअप घेऊन क्रीझपाशी आल्यावर आपली करामत दाखवत असत. हनीफ मोहम्मद यांच्यासारख्या नावाजलेल्या फलंदाजाला एकाच मालिकेत देसाईंनी चार वेळा तंबूत धाडले होते. १९६०-६१च्या त्या मालिकेत पाकिस्तानच्या गोटात देसाईंनी खळबळ उडविली होती. एवढेच नव्हे तर हनीफ यांना ‘देसाईंचा बकरा’ म्हणून हिणवले जाऊ लागले. […]
सर्वस्वी प्रतिकूल परिस्थीतीला तोंड देत विखे-पाटील यांनी प्रवरानगर येथे शेतकऱ्यांच्या पहिल्या ‘प्रवरा सहकारी कारखान्या’ची ३१ डिसेंबर १९५० या दिवशी स्थापना केली आणि या कारखान्यातून साखर उत्पादन सुरू झाले. त्यावेळचे मुंबई राज्याचे वित्त व सहकार मंत्री वैकुंठभाई मेहता यांनी या कारखान्यास शासनाची मान्यता मिळवून देऊन सर्वतोपरीने सहकार्य केले. प्रवरानगराचा हा कारखाना आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील अग्रगण्य साखर कारखाना मानला जातो. पहिली अकरा वर्षे विखे−पाटील यांच्या आग्रहामुळेच डॉ. धनंजयराव गाडगीळ कारखान्याचे अध्यक्ष झाले. तर ते स्वतः उपाध्यक्ष म्हणून काम पहात असत. […]
“भारतीय ज्योतिषशास्त्र” हा त्यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ होय. तो नीट समजवून घेता यावा म्हणून पाश्चिमात्य शास्त्रज्ञ मराठी शिकले ! या ग्रंथाच्या सिद्धतेसाठी त्यांनी पाचशेहून अधिक संस्कृत ग्रंथांचे अध्ययन केले.दुर्बोध बनलेल्या अनेक विषयांचा उलगडा केला. पंचांगशोधन व तत्संबद्ध मतमतांतरे यांचा परामर्श घेतला व हे शास्त्र केवळ भारतीयांनीच सुविकसित केले हे सिद्ध केले. ‘कृत्तिका पूर्वेस उगवतात ; त्या तेथून चळत नाहीत’ या शतपथ ब्राह्मणातून घेतलेल्या वाक्यावरून त्यांनी शतपथ ब्राह्मणाचा काल इ.स.पूर्व २००० वर्षे असा ठरवला. […]
माणुसकी, हलाहल, तिखट मिरची घाटावरची, हिंदी चित्रपट ‘कानून का शिकार’ या चित्रपटातून राजाभाऊ मोठ्या पडद्यावरही झळकले. त्यांचे चिरंजीव राजेश चिटणीस व त्यांची नात राजसी राजेश चिटणीस यांना देखील आजोबांच्या कलेचे बाळकडू मिळाले आहे. […]
जयंतराव टिळक हे स्वातंत्र्योत्तर काळात तत्कालीन इंडियन नॅशनल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार झाले होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सोळा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीसाठी अध्यक्ष होते. […]
२००७ साली निखिल वागळे हे नेटवर्क १८ च्या IBN लोकमत या चॅनलचे संपादक झाले. २००७ ते २०१४ पर्यंत निखिल वागळे यांनी चॅनेल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक वादग्रस्त मुद्द्यांना हात घातला. या दरम्यान त्यांचा ‘आजचा सवाल’ हा डिबेट शो त्यांच्या आक्रमक पणामुळे चांगलाच चर्चेत राहिला पण त्यांची ही आक्रमकता कधी कधी उद्धट रूप धारण करते असा आरोप सुद्धा त्यांच्यावर होत राहिला. […]
मुंबईतील एका कार्यक्रमात साडेआठ किलोच्या या पायघोळा सह २० किलो वजनाचा जडसांभार अंगावर घेऊन त्यांनी सलग अडीच तास आपली कला सादर केली होती. गणेश वंदना, वासुदेव, नंदीबैल, कुडबुडय़ा जोशी, भविष्यकार आणि त्यांचे प्रख्यात भारुड या सर्व पात्रांना रसिकांनी भरभरून दाद दिली. या ७५ मीटर इंच घेर असलेल्या या पायघोळाच्या गिरकीची नोंद वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती. […]
त्यांचं बालसाहित्य, लोकसाहित्यसुद्धा प्रसिद्ध आहे. २०१६ साली बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांना महाराष्ट्र राज्य सरकार, कोकण मराठी साहित्य, भीमाबाई आंबेडकर, कविवर्य प्रा. कृ. ब. निकुम्ब, इंदिरा संत, प्रणव प्रतिष्ठान अशा अनेक मान्यवरांच्या नावाचे आणि नामांकित संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत. […]
वसंत खेर यांनी पाटर्नर, डॉ. तुम्हीसुद्धा, आमच्या या घरात आदी नाटकांच्या जाहिरातीही तयार केल्या. ‘मंगलगाणी, दंगलगाणी’, व ‘भले तरी देवू’ हा भक्तीरसपूर्ण कार्यक्रम याची त्यांनी निर्मिती केली. पु. ल. देशपांडे यांचे साहित्य, आचार्य अत्रे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूळ आवाजातील भाषणे कॅसेटच्या माध्यमातून त्यांनी रसिकांपर्यंत पोहोचविली. […]