रणजी ट्रॉफी कारकिर्दीत रजिंदर गोयल (६३७) यांच्यानंतर वेंकटराघवन यांनी ५३० विकेट्स घेतल्या होत्या. तर, प्रथम श्रेणी कारकिर्दीत बिशन बेदी (१५६०) यांच्यानंतर वेंकटराघवन यांनी १३९० विकेट्स घेतल्या होत्या. केवळ गोलंदाजीतच नव्हे तर वेंकटराघवन फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही सराईत होते. […]
साथ संगत व स्वतंत्र तबला वादन साठी त्यांनी १९८६ मध्ये दुबई व शारजा चा दौरा केला होता. आखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या तबला परीक्षांचे पेपर तपासणे, व परीक्षक म्हणूनही त्यांनी कार्य केले. किरपेकर यांनी २००१ मध्ये लिहिलेल्या ‘ताल-निनाद’ ह्या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद लाभला. […]
पद्मजाताई स्वतः पेटी, तबला, ढोलकी चांगली वाजवतात. नाथांच्या भारुडांबरोबरच बदलत्या सामाजिक समस्यांना न्याय देण्यासाठी स्वतःच्या पद्यरचना त्यांनी केल्या. संगीत,संवाद, नृत्यदिग्दर्शन असा सबकुछ ‘पद्मजा’ टच मिळाल्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणि लोकप्रियता वाढत गेली. गल्लीतल्या देवळापासून सुरू केलेला भारुडाचा कार्यक्रम दिल्लीपर्यंत म्हणजे केवळ देशातच नाही, तर देशाच्याही बाहेर गाजला. इंग्लंड, अमेरिका, श्रीलंका या देशांमध्येही भारुडाच्या कार्यक्रमाने लोकप्रियता मिळवली. […]
संगीतकार दशरथ पुजारी यांनी मधुकर जोशी यांची बरीचशी गीतं एच.एम.व्ही.त रेकॉर्ड केली होती. ती आठवण सांगताना संगीतकार दशरथ पुजारी आपल्या पुस्तकात म्हणतात त्यावेळी काही लोकांचा थोडासा गैरसमज झाला होता की, इतर इतके चांगले कवी असताना तुम्ही मधुकर जोशींचीच गाणी का घेता? त्यांना असं वाटणं स्वाभाविक होतं. त्यावेळचे एक नामवंत कवी मला म्हणाले, “पुजारी, तुमचे मधुकर जोशी हे ठरलेले कवी आहेत. तुम्ही दुसर्या कवीला संधी देत नाहीत. हा काय प्रकार आहे? मी एवढंच सागितलं, “प्रकार दुसरा-तिसरा काही नसून मला त्यांची गीतं आवडतात. त्यांचे शब्द साधे, सुटसुटीत, अर्थाला धरून- दादरा, केरवा, रूपकच्या मीटरमध्ये छान बसवलेले असतात. एका मात्रेचंही कमी-जास्त होत नाही. शिवाय काव्य पाहिल्याबरोबर जेव्हा संगितकाराला चाल चटकन सुचते ते काव्य फार चांगले, असे मी समजतो.” त्यांचं एक काव्य त्यावेळी फार लोकप्रिय होतं. […]
आनंद शिंदे यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी, पंजाबी, उर्दू, तामिळ आणि इतर अशा एकूण आठ भाषांमध्येही गायन केले आहे. होऊ दे जरासा उशीर हे टायटल गाणे असलेल्या चित्रपटाला ऑस्कर नॉमिनेशनही मिळाले होते. […]
गेली अनेक वर्षे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सई देवधरने बालकलाकार म्हणून करियरला सुरुवात केलीय. ‘लपंडाव ‘ या चित्रपटातील अभिनयासाठी तिला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. […]
चित्रे काढून अगर प्रारूपकाराचे (ड्राफ्ट्समन) काम करून तो जगत होता. ह्याच काळात हिटलरचा श्रमजीवी वर्गाशी संपर्क आला. ह्या वर्गाविषयी त्याला सहानुभूती वाटण्याऐवजी घृणा उत्पन्न झाली. साम्यवादविरोध तो येथेच शिकला. त्याचप्रमाणे त्यांचा ज्यूद्वेषही याच वेळी जागृत झाला. ज्यू लोकांच्या पापाचा इतिहास वाचून त्यांनी आपल्या ज्यूद्वेषाचा पाया बळकट केला. लोकशाही मार्गाचा अवलंब करणे हेही मूर्खपणाचे आहे, असे त्याचे मत बनले. हुकूमशाही सर्वश्रेष्ठ आहे हे पायाभूत सत्य हिटलर व्हिएन्ना येथेच शिकला. […]
चिंतामण विनायक वैद्य हे इतिहासाचे व्यासंगी व साक्षेपी संशोधक म्हणून ओळखले जात. ते ज्ञानमार्गी प्रज्ञावंत, ललित लेखकही होते. त्यांनी केलेले महाभारताचे भाषांतर हे त्यांचे प्रचंड वाङ्मयीन कर्तृत्व म्हणून ओळखले जाते. म्हणूनच त्यांना भारताचार्य अशी पदवी मिळाली. लोकमान्य टिळक यांनी त्यांना भारताचार्य या मानाच्या पदवीने गौरवले. वैद्य हे ‘दुर्दैवी रंगू’ ह्या त्यांच्या ऐतिहासिक कादंबरीमुळे गाजले. […]
मामासाहेबांच्या ठायी पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा गाढा व तुलनात्मक अभ्यास आणि अनुभव यांचा अपूर्व संगम झाला होता. त्यांनी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षांपर्यंत कॉलेजात विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले. दिवसा ते काम; व ते संपल्यावर श्रीज्ञानेश्वरी संबंधीच्या कीर्तनाद्वारे समाजात नैतिक व धार्मिक शिक्षण देण्याचे त्यांचे कार्य सुरू होई. ते आयुष्यभर अखंड चालू होते. शाळा-कॉलेजातील विद्यार्थी असोत, अशिक्षित वारकरी असोत किंवा व्यसनी, वाममार्गाला लागलेला मनुष्य असो, त्यांनी समाजाची पातळी उंचावण्याचे महान कार्य सातत्याने केले. […]
आमदारकीच्या आधी पुणे महापालिकेत २००७ मध्ये महात्मा फुले मंडई या वॉर्डातून नगरसेविका म्हणून त्या प्रथम निवडून आल्या होत्या. त्यानंतर २००९ मध्ये त्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या. २०१४ मध्ये त्या दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाल्या. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुणे पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळ यांनी विजयी मिळवला. […]