नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

अभियंते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

दैदिप्यमान यशाची नोंद सरकारने घेऊन त्यांची लगेच सन १८८४ मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर थेट नेमणुक केली.येथेही त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एका अभिनव अशा स्वयंचलित गेटची निर्मिति केली. यामुळे विशिष्ठ पातळी वरील अतिरिक्त पाणीच वाहुन जाई. हे गेट भारतात प्रथमच झाले होते. या डिझाईनचे नावच पुढे विश्वैश्वरय्या गेट झाले. […]

होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनेमन

“निरोगी माणसात निर्माण झालेल्या लक्षणांप्रमाणेच लक्षणे असलेला रोगी आसल्यास ते औषध ती लक्षणे दूर करतं” असा सिद्धांत त्यांनी या अभ्यासाअंती मांडला आणि हा “सम लक्षण चिकित्सा ” होमिओपॅथीचा मूलभूत सिद्धांत ठरला. १७९६ मध्ये हानिमान यांनी या विषयांची माहिती प्रथम ‘हॉफलॅंड जर्नल’ मध्ये लिहिली . त्यानंतरच्या काळात त्यांनी स्वतःवर, मित्रांवर, कुटुंबीयांवर ९० औषधांचं सिद्धीकरण केलं. त्याची क्रमवार माहिती ” होमिओपॅथिक मटेरिया मेडिका ” या नावाच्या पुस्तकात संकलित केली .याच पुस्तकाचे पुढे १८११ ते १८२१ या काळात सहा भाग निघाले . […]

पुण्यातील निष्णात वैद्यकीय तज्ज्ञ ह. वि. सरदेसाई

एमबीबीएसला त्यांना प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आणि फॉरेन्सिक मेडिसिन या विषयांत डिस्टिंक्शन तर स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विषयात सुवर्णपदक मिळालं होतं. मेंदू, मज्जासंस्था आदींशी निगडित न्यूरॉलॉजी या विषयात एम.डी. करून १९६० ला ते भारतात परतले. […]

केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संस्थापक केसरी पाटील

केसरी टूर्स ची पहिली सहल राजस्थानला गेली होती. ज्यामध्ये तेरा पर्यटक होते. मध्यमवर्गीय आणि उच्च गध्यमवर्गीय अशा दोन स्तरांतले सर्व धर्मीय, देश-विदेशातील पर्यटक त्यांच्याबरोबर प्रवास करत असून पर्यटकांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे ते अधिकाधिक प्रगती करत आहेत. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील व झेलम चौबळ या त्यांच्या कन्या होत. २०१३ मध्ये केसरी टूर्स मधून वीणा पाटील बाहेर पडल्या व त्यांनी आपली कंपनी वीणा वर्ल्ड स्थापन केली. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ला ISO 9001-2000 आणि OHSAS18000-2007 ही प्रमाणपत्रे मिळाली होती. ही दोन्ही प्रमाणपत्रे मिळवणारी केरारी ही जगातील पहीलीच पर्यटन कंपनी होती. […]

ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि समालोचक रिची बेनो

ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि समालोचक रिची बेनो यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९३० रोजी झाला. बेनो हे ऑस्ट्रेलिया संघातील महान अष्टपैलू खेळाडू होते. ऑस्ट्रेलियाकडून ६३ कसोटी सामने खेळतानाच त्यांनी २८ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले. यात हजारांपेक्षा अधिक धावा तसेच २०० पेक्षा अधिक बळी मिळवण्याची कामगिरी केली. १९६४ मध्ये त्यांनी निवृत्ती स्वीकारली. तत्पूर्वी, कारकीर्दीत एकही मालिका गमावणारा कर्णधार म्हणून […]

भारताचे नामवंत अर्थशास्त्रज्ञ धनंजय रामचंद्र गाडगीळ

गोखले अर्थशास्त्र संस्थेने गाडगीळांचे मराठीतील समग्र लिखाण ध. रा. गाडगीळ लेखसंग्रहनामक दोन खंडांत (१९७३ -१९७४) प्रकाशित केले आहे. निव्वळ आर्थिक सिद्धांतांचे विश्लेषण करण्यावर भर न देता त्यांचा व्यावहारिक उपयोग करण्यावर गाडगीळांचा कटाक्ष असे. आर्थिक विकास लोकाभिमुख असावा, असे मत ते आग्रहाने मांडीत. लोकमान्यांचे शिष्यत्व पत्करणाऱ्या प्रा. धनंजयराव गाडगीळ यांची भूमिका उदारमतवादी आणि व्यापक स्वरूपाची होती. […]

पत्रकारितेतील गुरु जोसेफ पुलित्जर

पुलित्झर पुरस्कार हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. पत्रकारितेतील ऑस्किर समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार हा पहिल्यांदा १९१७ मध्ये देण्यात आला. हा पत्रकारितेतील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कारही मानला जातो. पुलित्झर पुरस्कार २१ श्रेणींमध्ये दिला जातो. प्रत्येक श्रेणीतील विजेत्याला $ 15,000 रोख दिले जातात. […]

मराठी ग्रंथकार आणि संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर

गुंजीकरांची मोचनगड ही मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी. शिवकालाच्या पार्श्वभूमीवर काल्पनिक पात्रे व प्रसंग निर्माण करून लिहिलेली ही कादंबरी आहे. शिवाजी महाराज ह्या कादंबरीत अगदी अखेरीअखेरीस येतात. कादंबरीच्या उद्दिष्टांविषयी गुंजीकरांच्या निश्चित कल्पना होत्या, असे दिसते. त्यांच्याशी प्रामाणिक राहून त्यांनी शिवकालीन इतिहासाची काटेकोर जाण ठेवली व शिवकालाचे जिवंत वातावरण निर्माण केले. ऐतिहासिक कादंबरीचा एक उत्कृष्ट आदर्श म्हणून अ. का. प्रियोळकरांसारख्या चिकित्सक विद्वानांनी ह्या कादंबरीला मान्यता दिली आहे. […]

बॉलिवूड अभिनेता अभिजित चव्हाण

अभिजीत चव्हाण यांनी रंपाट,गोजिरी,सायकल आणि बऱ्याच मराठी सिनेमात लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. अगली, रॉकी हँडसम आदी हिंदी सिनेमात सुद्धा त्यांनी उत्तम काम केले आहे. तसेच पु.ल. देशपांडे ह्यांच्यावर आलेल्या “भाई” ह्या बायोपिक मध्ये आचार्य अत्रे ह्यांची भूमिका अभिजीत सरांनी केली आहे. […]

शाहीर कुंतीनाथ करके

त्यांची अनेक देवतांच्या गाण्यांची कॅसेटसू प्रसिद्ध झाली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत गंगू बाजारला जाते,औदा लगीन करायचं, बोला दाजीबा, सख्या सजना, बायको आली बदलून, अन्याय, प्रतिकार, सुळावरची पोळी, सोंगाड्या इत्यादी चित्रपटात गाणी लिहिली. […]

1 56 57 58 59 60 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..