घराण्यांच्या रूढ भिंतींना फारसे महत्त्व न देणाऱ्या बुद्धिमती किशोरीताईंनी कालांतराने सर्व घराण्यांच्या गायकीचा अभ्यास केला; आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. बंदीशी असोत किंवा ठुमरी गायिकीतला कुठलाही प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता. सिनेसंगीतालाही त्यांनी त्याज्य मानले नाही. १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या “गीत गाया पत्थरों ने’ या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वुगायन केले. चित्रपटसृष्टीत आलेल्या कटू अनुभवांमुळे त्या पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळल्या. मुंबईतल्या एलफिस्टन महाविद्यालयात शिकलेल्या किशोरीताईंना मुळात डॉक्टवर व्हायचे होते. परंतु त्यात मन रमल्याने त्यांनी शास्त्रीय संगीताला वाहून घेतले. “जाईन विचारीत रानफुला’ हे मराठीतील त्यांचे गीतही स्वरशिल्पाचा नमुना ठरला. त्यांनी ‘स्वरार्थरमणी – राग रससिद्धान्त’ हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. […]
प्रियांका बर्वेने ‘रमा माधव’, ‘मुंबई पुणे-मुंबई’, ‘डबल सीट’, ‘ऑनलाइन-बिनलाइन’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’,पानीपत या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. काही मालिकांची शीर्षकगीतं तिने गायली आहेत. ‘सागरिका म्युझिक कंपनी’ची तीन-चार गाणीही रेकॉर्ड केली आहेत. […]
किस्सा असा आहे की बिली बावडनला झालेला तो आजार म्हणजे rheumatoid arthritis म्हणजेच संधिवात. बिलीला संधिवाताने ग्रासले अणि त्याला स्नायूंच्या हालचाली करणे अवघड जाऊ लागले. त्यामुळे त्याला इतक्या तरुण वयात क्रिकेट सोडावे लागले. पुढे बिली अंपायर झाला अणि तिथे सुद्धा त्याला संधिवाताचा त्रास होऊ लागला. त्याला पटकन हात वरती करता येत नाहीत, एकाच ठिकाणी स्तब्ध उभे राहिले की त्याला परत हालचाल करणे कठीण जाते. अंग दुखू नये म्हणून त्याला थोड्या थोड्यावेळाने स्ट्रेचिंग करण्याचे डॉक्टरांचे निर्देश आहेत. आता बिली परत त्याचे काम सोडू शकत नव्हता. यावेळेस त्याने लढायचे ठरवले आणि त्याने त्याच्या अंपायरिंग मध्ये कराव्या लागणाऱ्या हालचालींमध्ये काही कल्पक बदल केले. […]
जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. […]
राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांनी कार्मिक व्यवस्थापनात काम केलं होतं. त्यांचे वडील, कामगार नेते पी. जी. सावंत हे सीटू या कामगार संघटनेत सक्रिय होते. मुंबईतील गिरणी कामगारांच्या चाळीतील हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी प्रयत्ने केले. मुंबईतील जुन्या चाळी आणि त्यांची पुनर्बांधणी व त्यावरील मालमत्ता करासाठी आंदोलनात पुढकार घेतला. […]
आकाशवाणीवर राम किंकर ह्यांनी काम केले होते तसेच पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूटच्या म्युझिक डिपार्टमेंटमध्येही त्यांनी काम केलं होते. धाकटी मेहुणी, जय तुळजा भवानी, अत्तराचा फाया, अशा चित्रपटांना राम किंकरांनी संगीत दिले. आशा भोसले, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, यांनी राम किंकर यांच्या कडे गाणी गायली आहेत. […]
त्यांनी माधवबुवा सुकाळे यांच्याकडे जवळपास १० वर्षे टाळवादनाचे शिक्षण घेतले, पुढे पखवाजवादनही शिकले, पण खरे ते रमले ते टाळवादनात. ते बालगंधर्वांबरोबर साथ करायचे. माऊली टाकळकर यांनी पंडित भीमसेन जोशींना ४० वर्षे टाळांची साथ केली. त्यांच्यामुळेच त्यांनी जगभर दौरे केले. आपल्या टाळ वादनाने अनेक दिग्गज व आंतरराष्ट्रीय कलाकारांना त्यांनी गेली ४ दशकाहून अधिक साथ केली आहे. […]
मुळगांवकर यांनी आपल्या कारकिर्दीत ६३ प्रकारची वेगवेगळी विमाने चालविली. त्यांपैकी २२ विमाने जेट होती. हा एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. वेगवेगळ्या प्रकारची विमाने चालविण्यासाठी प्रत्येक वेळी काही आठवड्यांचे कन्व्हर्जन ट्रेनिंग घ्यावे लागते, हे लक्षात घेतले तर त्यांचे अष्टपैलुत्व सहजपणे लक्षात येईल. मुळगांवकरांच्या नावे आणखी एक विक्रम जमा होतो. ‘मिग-२१’ हे स्वनातीत (ध्वनीच्या वेगापेक्षा जलद गतीचे) विमान चालविणारे ते पहिले भारतीय वैमानिक ठरले. वायुसेनाप्रमुख झाल्यानंतरही ते ‘मिग-२१’ चालवीत असत. वायुसेनेला स्वनातीत युगात नेणारे युगपुरुष असे त्यांचे सार्थ वर्णन केले जाते. […]
गायन संगीत, नृत्य, खेळ अशा अनेक कला वेगवेगळ्या स्तरांवर येत असलेल्या अमृता फडणवीस यांना फॅशन आणि लाईफस्टाईल दुनियेत प्रसिद्ध असलेल्या SAVVY या मॅगझीनच्या कव्हर पेजवर स्थान देण्यात आले आहे. अमृता फडणवीस यांनी न्युयॉर्क फॅशन विकमध्ये कॅटवॉक करत खादी ग्रामोद्योगाचा प्रचार आणि स्त्रीभ्रुणहत्या थांबवण्याचा मेसेज दिला होता. […]
त्यांनी आपल्या संतोषी थिएटर्स संस्थेच्या वतीने जय देवी संतोषी माता,बायका त्या बायकाच, नाते युगायुगाचे, मृत्युंजय, छावा,पंखांना ओढ़ पावलांची,नटसम्राट (यशवंत दत्त, सुलभा देशपांडे),राजसन्यास संगीत एकच प्याला, बेबंदशाही, लग्नाची बेडी आदी नाटकांची निर्मिती केली होती. १९८० च्या सुमारास माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉलमध्ये जनता दराने नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मराठी रसिकांना आपलीशी वाटणारी नाट्यगृहे कमी पडतात याचा अंदाज आल्यावर, घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या शेजारचे झवेरबेन नाट्यगृह मामांनी मराठी नाटक आणि रसिकांसाठी खुले केले. […]